राज्यात पावसाची उघडीप शक्य 


पुणे : राज्यात ढगाळ हवामानासह पावसाने हजेरी लावली आहे. थंडी गायब झाली असून, उकाड्यासह कमाल तापमानात चढ-उतार होत आहे. आजपासून (ता. २४) राज्यात सुरू असलेला पाऊस उघडीप देण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

पावसाला पोषक हवामान असल्याने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलक्या ते मध्यम पावासाने हजेरी लावली आहे. मंगळवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्रातील राहुरी येथे ५० मिलिमीटर, सोलापूर २० मिलिमीटर, माढा आणि शिरपूरमध्ये प्रत्येकी १० मिलिमीटर पाऊस पडला. तर मराठवाड्यातील जाफाराबाद येथे ३० मिलिमीटर, बदनापूर, निलंगा, जिंतूर येथे प्रत्येकी १० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरूच आहेत. मंगळवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे उच्चांकी ३४ अंश सल्सिअस तापमान नोंदले गेले. तर बहुतांश ठिकाणी किमान तापमानातील वाढ कायम असून, महाबळेश्‍वर येथे नीचांकी १७.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

मंगळवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३१.२ (२०.४), नगर ३० (२२.३), जळगाव ३२.४ (२२.३), कोल्हापूर २९.२ (२१.९), महाबळेश्‍वर २३.३ (१७.१), मालेगाव ३०.२ (२४), नाशिक ३१.१ (२१.८), निफाड ३०.१ (२०.१), सांगली ३०.७ (२१.५), सातारा ३१.५ (२१.६), सोलापूर ३२ (२१.२), सांताक्रूझ ३१.५ (२५.२), अलिबाग ३२.४ (२३.६), डहाणू ३१.७ (२६.३), रत्नागिरी ३३ (२५.४), औरंगाबाद ३२.५ (२१.८), नांदेड २९.८ (२३.६), उस्मानाबाद – (२१), परभणी ३२.५ (२३.४), अकोला ३४ (२३.१), अमरावती ३१.६ (२०.७), ब्रह्मपुरी ३३.१ (२३), बुलडाणा २९.५ (२१.३), चंद्रपूर ३२.० (२२.५), गडचिरोली ३२.४ (२०.४), गोंदिया ३०.४ (२०.२), नागपूर ३१.४ (२२), वर्धा ३२ (२३.५), वाशीम ३२.५ (१९), यवतमाळ – (२२). 

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे संकेत 
अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र निवळून गेले आहे. यातच दक्षिण बंगालच्या उपसागरामध्ये असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे आज (ता. २४) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. ही प्रणाली तमिळनाडू आणि श्रीलंकेच्या किनाऱ्याकडे येण्याचे संकेत आहेत. 
 

News Item ID: 
820-news_story-1637678540-awsecm-149
Mobile Device Headline: 
राज्यात पावसाची उघडीप शक्य 
Appearance Status Tags: 
Mukhya News
Possible rains in the statePossible rains in the state
Mobile Body: 

पुणे : राज्यात ढगाळ हवामानासह पावसाने हजेरी लावली आहे. थंडी गायब झाली असून, उकाड्यासह कमाल तापमानात चढ-उतार होत आहे. आजपासून (ता. २४) राज्यात सुरू असलेला पाऊस उघडीप देण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

पावसाला पोषक हवामान असल्याने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलक्या ते मध्यम पावासाने हजेरी लावली आहे. मंगळवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्रातील राहुरी येथे ५० मिलिमीटर, सोलापूर २० मिलिमीटर, माढा आणि शिरपूरमध्ये प्रत्येकी १० मिलिमीटर पाऊस पडला. तर मराठवाड्यातील जाफाराबाद येथे ३० मिलिमीटर, बदनापूर, निलंगा, जिंतूर येथे प्रत्येकी १० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरूच आहेत. मंगळवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे उच्चांकी ३४ अंश सल्सिअस तापमान नोंदले गेले. तर बहुतांश ठिकाणी किमान तापमानातील वाढ कायम असून, महाबळेश्‍वर येथे नीचांकी १७.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

मंगळवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३१.२ (२०.४), नगर ३० (२२.३), जळगाव ३२.४ (२२.३), कोल्हापूर २९.२ (२१.९), महाबळेश्‍वर २३.३ (१७.१), मालेगाव ३०.२ (२४), नाशिक ३१.१ (२१.८), निफाड ३०.१ (२०.१), सांगली ३०.७ (२१.५), सातारा ३१.५ (२१.६), सोलापूर ३२ (२१.२), सांताक्रूझ ३१.५ (२५.२), अलिबाग ३२.४ (२३.६), डहाणू ३१.७ (२६.३), रत्नागिरी ३३ (२५.४), औरंगाबाद ३२.५ (२१.८), नांदेड २९.८ (२३.६), उस्मानाबाद – (२१), परभणी ३२.५ (२३.४), अकोला ३४ (२३.१), अमरावती ३१.६ (२०.७), ब्रह्मपुरी ३३.१ (२३), बुलडाणा २९.५ (२१.३), चंद्रपूर ३२.० (२२.५), गडचिरोली ३२.४ (२०.४), गोंदिया ३०.४ (२०.२), नागपूर ३१.४ (२२), वर्धा ३२ (२३.५), वाशीम ३२.५ (१९), यवतमाळ – (२२). 

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे संकेत 
अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र निवळून गेले आहे. यातच दक्षिण बंगालच्या उपसागरामध्ये असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे आज (ता. २४) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. ही प्रणाली तमिळनाडू आणि श्रीलंकेच्या किनाऱ्याकडे येण्याचे संकेत आहेत. 
 

English Headline: 
Agriculture News in Marathi Possible rains in the state
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
हवामान ऊस पाऊस पुणे कोकण konkan महाराष्ट्र maharashtra विभाग sections सोलापूर पूर floods अकोला akola नगर जळगाव jangaon कोल्हापूर मालेगाव malegaon नाशिक nashik निफाड niphad सांगली sangli अलिबाग औरंगाबाद aurangabad नांदेड nanded उस्मानाबाद usmanabad परभणी parbhabi अमरावती चंद्रपूर नागपूर nagpur वाशीम यवतमाळ yavatmal अरबी समुद्र समुद्र तमिळनाडू
Search Functional Tags: 
हवामान, ऊस, पाऊस, पुणे, कोकण, Konkan, महाराष्ट्र, Maharashtra, विभाग, Sections, सोलापूर, पूर, Floods, अकोला, Akola, नगर, जळगाव, Jangaon, कोल्हापूर, मालेगाव, Malegaon, नाशिक, Nashik, निफाड, Niphad, सांगली, Sangli, अलिबाग, औरंगाबाद, Aurangabad, नांदेड, Nanded, उस्मानाबाद, Usmanabad, परभणी, Parbhabi, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, Nagpur, वाशीम, यवतमाळ, Yavatmal, अरबी समुद्र, समुद्र, तमिळनाडू
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Possible rains in the state
Meta Description: 
Possible rains in the state
राज्यात ढगाळ हवामानासह पावसाने हजेरी लावली आहे. थंडी गायब झाली असून, उकाड्यासह कमाल तापमानात चढ-उतार होत आहे. आजपासून (ता. २४) राज्यात सुरू असलेला पाऊस उघडीप देण्याची शक्यता आहे.



Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X