Weather Update: राज्यात पावसाला पोषक हवामान, या भागात पुन्हा पावसाचा अंदाज

Weather Alert : राज्याच्या किमान तापमानात आणखी घट झाल्याने गारठा वाढण्यास सुरूवात झाली आहे. यातच गेल्या आठवड्यात झालेल्या पावसानंतर राज्यात पुन्हा पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. २८) ढगाळ हवामानासह कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

श्रीलंका आणि लगतच्या कोमोरीन समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. यामुळे तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याजवळ जोरदार वारे वाहत आहेत. ही चक्राकार वाऱ्यांची स्थिती आज (ता. २८) अरबी समुद्राकडे सरकणार आहे. दक्षिण अंदमान समुद्रात सोमवारपर्यंत (ता. २९) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. पश्चिम आणि वायव्य दिशेकडे येताना या प्रणालीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.   

उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे किमान तापमानाचा पारा घसरण्यास सुरुवात झाली आहे. कोकण वगळता उर्वरीत राज्यात बहुतांशी ठिकाणी किमान तापमान १८ अंशांच्या खाली आले आहे. शनिवारी (ता. २७) नागपूर येथे नीचांकी १३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सांताक्रूझ येथे उच्चांकी ३४.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. 

शनिवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
पुणे ३२.२ (१६.१),

नगर ३२.३ (१६.८),

जळगाव ३२.७ (१५.३),

कोल्हापूर ३१.२ (१९.१),

महाबळेश्वर २६.१ (१५.४),

मालेगाव ३१.० (-),

नाशिक ३२.४ (१५.४),

निफाड २९.० (१५.१),

सांगली ३२.२ (१८.२),

सातारा ३०.४(१८.९),

सोलापूर ३३.२ (१७.२),

सांताक्रूझ ३४.७(२२.८),

अलिबाग ३४.२ (-),

डहाणू ३२.५ (२१.६),

रत्नागिरी – (२१.७),

औरंगाबाद ३२.० (१५.०),

नांदेड ३१.८ (१८.०),

परभणी ३१.५ (१७.१),

अकोला ३३.२ (१७.८),

अमरावती ३१.८ (१५.१),

ब्रह्मपुरी ३३.५ (१६.५),

बुलडाणा ३०.० (१५.८),

चंद्रपूर ३०.६ (१७.०),

गडचिरोली ३०.४(१७.८),

गोंदिया ३०.४ (१५.०),

नागपूर ३१.८ (१३.६),

वर्धा ३१.५(१५.०),

वाशीम ३२.५ (१५.०),

यवतमाळ ३२.० (१५.०).

राज्याच्या किमान तापमानात आणखी घट झाल्याने गारठा वाढण्यास सुरूवात झाली आहे. यातच गेल्या आठवड्यात झालेल्या पावसानंतर राज्यात पुन्हा पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. २८) ढगाळ हवामानासह कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. 

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment