राज्यात मे महिन्यात आतापर्यंत ४८ लाख ५३ हजार ९३५ क्विंटल अन्नधान्याचे वाटप


राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे 7 कोटी आहे.  या लाभार्थ्यांना 52 हजार 422 स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो.

शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या पाठीत पुन्हा खंजीर खूपसला – भाजपची टीका

राज्यात या योजनेमधून सुमारे 17 लाख 18 हजार 33 क्विंटल गहू, 13 लाख 18 हजार 420 क्विंटल तांदूळ, तर  18 हजार 361 क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरित झालेले परंतु लॉकडाऊनमुळे राज्यात  अडकलेल्या सुमारे 4 लाख 16 हजार 197 शिधापत्रिका धारकांनी ते जेथे राहत आहे त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.

बुलढाण्यातील ५९ हजार शेतकऱ्यांच्या पीक कर्जासाठी विशेष मोहिम

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जूनपर्यंत प्रति लाभार्थी प्रति महिना 5 किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. दि. 4 मेपासून एकूण 51 लाख 2 हजार 470 रेशनकार्ड ला मोफत तांदूळ वाटप केले आहे. या रेशनकार्ड वरील 2 कोटी 25 लाख 10 हजार 447 लोकसंख्येला 11 लाख 25 हजार 520 क्विंटल तांदळाचे वाटप झाले आहे.

10 लाख शेतकऱ्यांचं प्रमाणीकरण झाले असून, 7 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत – उद्धव ठाकरे

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेत प्रति रेशनकार्ड 1 किलो मोफत डाळ (तूर किंवा चणा डाळ) देण्यात येते. या योजनेतून सुमारे 14 हजार 97 क्विंटल डाळीचे वाटप केले आहे.

राज्य शासनाने कोविड-19 संकटावरील  उपाययोजनेसाठी 3 कोटी 08 लाख 44 हजार 076 एपीएल केशरी कार्डधारक लाभार्थ्यांना मे व जून 2020 या 2 महिन्यासाठी प्रति व्यक्ती 5 किलो धान्य सवलतीच्या दराने (गहू 8 रुपये प्रति किलो व तांदूळ 12 रुपये प्रति किलो) देण्याचा निर्णय घेतला आहे. या धान्याचे वाटप दि.24 एप्रिल 2020 पासून सुरू होऊन आता पर्यंत 6 लाख 91 हजार 960 क्विंटल धान्याचे वाटप केले आहे. तसेच टंचाई भासवून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येत आहे.

शेती, बेरोजगारीच्या समस्येवर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना – सुभाष देसाई

महत्वाच्या बातम्या –

मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये थंडी ओसरली तर अमरावती, गोंदिया आणि नागपूर येथे पाऊस

कर्जमुक्ती योजनेच्या व्हिडिओतील छेडछाडीची शासनाकडून गंभीर दखल; चौकशीचे आदेशSource link

Leave a Comment

X