राज्यात १०५ लाख टन ऊसगाळप 

पुणे : राज्यात आतापर्यंत १३९ साखर कारखान्यांची धुराडी पेटलेली आहेत. त्यात ६७ सहकारी व ७२ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. या दोन्ही क्षेत्रांतील कारखान्यांनी १५ नोव्हेंबरपर्यंत १०५ लाख टन ऊस गाळप केला. त्यापासून ९१ लाख क्विंटल साखर तयार झाली आहे. उतारा मात्र ८.६ टक्के मिळाला आहे. 

‘‘२०२१-२२ चा गाळप हंगाम कोणत्याही स्थितीत १५ ऑक्टोबरपूर्वी चालू करू नये. कारखाने त्यापूर्वी सुरू केल्यास फौजदारी गुन्हे दाखल करावेत,’’ असे आदेश राज्य सरकारने यंदा मंत्री समितीच्या बैठकीत दिले होते. त्यामुळे आदेश मोडून १५ ऑक्टोबरपूर्वी उसाची पळवापळवी करीत कारखान्याचे धुराडे पेटवण्याचे धाडस यंदा कारखान्यांनी केले नाही. आयुक्तालयातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार, ‘‘सरकारच्या आदेशानुसार उत्तम नियोजन करीत १५ऑक्टोबरपासून धुराडी पेटविणाऱ्या कारखान्यांची संख्या अवघी तीन आहे. त्यात तात्यासाहेब कोरे ससाका (पन्हाळा), संत कूर्मदास ससाका (माढा) आणि कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ ससाका (अंबड) या कारखान्यांचा समावेश आहे.’’ 

कोल्हापूर विभागात २९ कारखान्यांनी २९.८४ लाख टन ऊसगाळप करून २९.७ लाख क्विंटल साखर तयार केली आहे. पुणे विभागात २६ कारखान्यांनी २६.०९ लाख टनाचे गाळप करून २४.०५ लाख क्विंटल, तर सोलापूर पट्ट्यातील ३१ कारखान्यांनी १९.०१ लाख क्विंटल साखर तयार केली आहे. त्यासाठी २३.९१ लाख टन उसाचे गाळप सोलापूर भागात केले गेले. 

गाळपात नगर जिल्हा पिछाडीवर दिसतो आहे. नगर विभागात १९ कारखाने सुरू झालेले आहेत. त्यांनी १३.३६ लाख टन उसाचे गाळप करून १०.५३ लाख क्विंटल साखर तयार केली आहे. दरम्यान, राज्यात काही साखर कारखान्यांनी विनापरवाना गाळपाला सुरुवात केली आहे. या कारखान्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची तयारी सध्या आयुक्तालयात चालू आहे. 

प्रतिक्रिया 
राज्यातील शेतकरी यंदा एक हजार लाख टनांच्या आसपास ऊस गाळपाला देण्याचा अंदाज आहे. आतापर्यंत १० टक्के गाळप यशस्वीपणे झाली आहे. काही कारखान्यांनी मागील एफआरपी न दिल्याने आम्ही गाळप परवाना दिलेली नाही. मात्र काही कारखान्यांनी विनापरवाना गाळप सुरू केले आहे. त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. 
– शेखर गायकवाड, साखर आयुक्त 

साखरनिर्मितीत जागतिक स्पर्धक असलेल्या ब्राझिलमध्ये यंदा हवामान प्रतिकूल आहे. त्यामुळे तेथील उत्पादन घटणार आहे. त्याचा फायदा भारताला होईल. मात्र दुसऱ्या बाजूला राज्यात यंदा भरपूर ऊस आहे. त्यामुळे अतिरिक्त साखरेची समस्या तयार होईल. या समस्येवर मात करण्यासाठी सर्व कारखाने इथेनॉलनिर्मिती वाढविण्यावर भर देत आहेत. 
– पी. आर. पाटील, अध्यक्ष, राजारामबापू सहकारी साखर कारखाना, सांगली 

News Item ID: 
820-news_story-1637073344-awsecm-799
Mobile Device Headline: 
राज्यात १०५ लाख टन ऊसगाळप 
Appearance Status Tags: 
Mukhya News
105 lakh tonnes of sugarcane in the state105 lakh tonnes of sugarcane in the state
Mobile Body: 

पुणे : राज्यात आतापर्यंत १३९ साखर कारखान्यांची धुराडी पेटलेली आहेत. त्यात ६७ सहकारी व ७२ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. या दोन्ही क्षेत्रांतील कारखान्यांनी १५ नोव्हेंबरपर्यंत १०५ लाख टन ऊस गाळप केला. त्यापासून ९१ लाख क्विंटल साखर तयार झाली आहे. उतारा मात्र ८.६ टक्के मिळाला आहे. 

‘‘२०२१-२२ चा गाळप हंगाम कोणत्याही स्थितीत १५ ऑक्टोबरपूर्वी चालू करू नये. कारखाने त्यापूर्वी सुरू केल्यास फौजदारी गुन्हे दाखल करावेत,’’ असे आदेश राज्य सरकारने यंदा मंत्री समितीच्या बैठकीत दिले होते. त्यामुळे आदेश मोडून १५ ऑक्टोबरपूर्वी उसाची पळवापळवी करीत कारखान्याचे धुराडे पेटवण्याचे धाडस यंदा कारखान्यांनी केले नाही. आयुक्तालयातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार, ‘‘सरकारच्या आदेशानुसार उत्तम नियोजन करीत १५ऑक्टोबरपासून धुराडी पेटविणाऱ्या कारखान्यांची संख्या अवघी तीन आहे. त्यात तात्यासाहेब कोरे ससाका (पन्हाळा), संत कूर्मदास ससाका (माढा) आणि कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ ससाका (अंबड) या कारखान्यांचा समावेश आहे.’’ 

कोल्हापूर विभागात २९ कारखान्यांनी २९.८४ लाख टन ऊसगाळप करून २९.७ लाख क्विंटल साखर तयार केली आहे. पुणे विभागात २६ कारखान्यांनी २६.०९ लाख टनाचे गाळप करून २४.०५ लाख क्विंटल, तर सोलापूर पट्ट्यातील ३१ कारखान्यांनी १९.०१ लाख क्विंटल साखर तयार केली आहे. त्यासाठी २३.९१ लाख टन उसाचे गाळप सोलापूर भागात केले गेले. 

गाळपात नगर जिल्हा पिछाडीवर दिसतो आहे. नगर विभागात १९ कारखाने सुरू झालेले आहेत. त्यांनी १३.३६ लाख टन उसाचे गाळप करून १०.५३ लाख क्विंटल साखर तयार केली आहे. दरम्यान, राज्यात काही साखर कारखान्यांनी विनापरवाना गाळपाला सुरुवात केली आहे. या कारखान्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची तयारी सध्या आयुक्तालयात चालू आहे. 

प्रतिक्रिया 
राज्यातील शेतकरी यंदा एक हजार लाख टनांच्या आसपास ऊस गाळपाला देण्याचा अंदाज आहे. आतापर्यंत १० टक्के गाळप यशस्वीपणे झाली आहे. काही कारखान्यांनी मागील एफआरपी न दिल्याने आम्ही गाळप परवाना दिलेली नाही. मात्र काही कारखान्यांनी विनापरवाना गाळप सुरू केले आहे. त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. 
– शेखर गायकवाड, साखर आयुक्त 

साखरनिर्मितीत जागतिक स्पर्धक असलेल्या ब्राझिलमध्ये यंदा हवामान प्रतिकूल आहे. त्यामुळे तेथील उत्पादन घटणार आहे. त्याचा फायदा भारताला होईल. मात्र दुसऱ्या बाजूला राज्यात यंदा भरपूर ऊस आहे. त्यामुळे अतिरिक्त साखरेची समस्या तयार होईल. या समस्येवर मात करण्यासाठी सर्व कारखाने इथेनॉलनिर्मिती वाढविण्यावर भर देत आहेत. 
– पी. आर. पाटील, अध्यक्ष, राजारामबापू सहकारी साखर कारखाना, सांगली 

English Headline: 
Agriculture News in Marathi 105 lakh tonnes of sugarcane in the state
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
साखर ऊस पुणे गाळप हंगाम पूर floods कोल्हापूर विभाग sections सोलापूर नगर हवामान भारत मात mate
Search Functional Tags: 
साखर, ऊस, पुणे, गाळप हंगाम, पूर, Floods, कोल्हापूर, विभाग, Sections, सोलापूर, नगर, हवामान, भारत, मात, mate
Twitter Publish: 
Meta Keyword: 
105 lakh tonnes of sugarcane in the state
Meta Description: 
105 lakh tonnes of sugarcane in the state
राज्यात आतापर्यंत १३९ साखर कारखान्यांची धुराडी पेटलेली आहेत. त्यात ६७ सहकारी व ७२ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. या दोन्ही क्षेत्रांतील कारखान्यांनी १५ नोव्हेंबरपर्यंत १०५ लाख टन ऊस गाळप केला. त्यापासून ९१ लाख क्विंटल साखर तयार झाली आहे. उतारा मात्र ८.६ टक्के मिळाला आहे. Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X