राज्यात ५५ साखर कारखान्यांचे गाळप सुरू

नगर : नगर विभागात सात साखर कारखान्यांचे गाळप सुरू झाले आहे. तर राज्यात सद्यःस्थितीत ५५ साखर कारखान्यांनी ऊस गाळपाला सुरुवात केली असून, आतापर्यंत १९ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. आठ दिवसांत शंभराच्या पुढे कारखान्यांचे गाळप सुरू होण्याची शक्यता आहे. 

प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयातूनही माहिती देण्यात आली. राज्यात सुमारे दोनशेच्या जवळपास साखर कारखाने आहेत. यंदाचा ऊस गाळप हंगामात आतापर्यंत सहकारी ३२ आणि खासगी २३ असे ५५ साखर कारखान्यांनी उसाचे गाळप सुरू केले आहे. आतापर्यंत कोल्हापूर विभागात सात लाख, पुणे विभागात साडेपाच लाख, सोलापूर विभागात पाच लाख, नगर विभागात पावणेदोन लाख उसाचे गाळप झाले आहे. राज्यात गेल्या वर्षी संपूर्ण हंगामात १० कोटी २० लाख टनांच्या जवळपास गाळप झाले आहे. यंदा उसाचे क्षेत्र अधिक असल्याने हा आकडाही वाढण्याचा अंदाज आहे. 

दिवाळीचा सण असल्याने अजून बहुतांश भागातील कारखान्यावर मजूर आलेले नाहीत. ऐन दिवाळीच मजूर कारखाना परिसरात येतात. सध्याही घर सोडण्याची मजुरांची लगबग सुरू आहे. त्यामुळे आठ दिवसांत बहुतांश कारखाने सुरू होण्याची शक्यता आहे. नगर विभागात आतापर्यंत सात कारखान्याचे गाळप सुरू झाले असून, आतापर्यंत पावणेदोन लाख टन उसाचे गाळप झाले आहे. नगर, नाशिक विभागांत १ लाख २३ हजार टन ऊस गाळप क्षमता आहे. गेल्या वर्षी १७ लाख २ हजार टन उसाचे गाळप झाले होते. यंदा ऊसक्षेत्र अधिक असल्याने गाळपही वाढणार असल्याचा अंदाज आहे. नगर जिल्ह्यात अजून चार साखर कारखान्यांना गाळप परवाना आयुक्तालयातून मिळाला नाही. 

नगर विभागात सुरू झालेले कारखाने 
कर्मवीर शंकरराव काळे (कोळपेवाडी), सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात (संगमनेर), ज्ञानेश्वश्‍वर सहकारी (भेंडा), अंबिका शुगर (राशीन), साईकृपा (देवदैठण), जयश्रीराम शुगर (जामखेड). मुळा सहकारी (सोनई).

राज्यात विभागनिहाय सुरू झालेले साखर कारखाने 
कोल्हापूर : १६,  पुणे : १४, सोलापुर : १२, नगर : ७, औरंगाबाद : २, नांदेड : ३, अमरावती : १, नागपूर : 0

News Item ID: 
820-news_story-1635918444-awsecm-677
Mobile Device Headline: 
राज्यात ५५ साखर कारखान्यांचे गाळप सुरू
Appearance Status Tags: 
Mukhya News
राज्यात ५५ साखर कारखान्यांचे गाळप सुरूराज्यात ५५ साखर कारखान्यांचे गाळप सुरू
Mobile Body: 

नगर : नगर विभागात सात साखर कारखान्यांचे गाळप सुरू झाले आहे. तर राज्यात सद्यःस्थितीत ५५ साखर कारखान्यांनी ऊस गाळपाला सुरुवात केली असून, आतापर्यंत १९ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. आठ दिवसांत शंभराच्या पुढे कारखान्यांचे गाळप सुरू होण्याची शक्यता आहे. 

प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयातूनही माहिती देण्यात आली. राज्यात सुमारे दोनशेच्या जवळपास साखर कारखाने आहेत. यंदाचा ऊस गाळप हंगामात आतापर्यंत सहकारी ३२ आणि खासगी २३ असे ५५ साखर कारखान्यांनी उसाचे गाळप सुरू केले आहे. आतापर्यंत कोल्हापूर विभागात सात लाख, पुणे विभागात साडेपाच लाख, सोलापूर विभागात पाच लाख, नगर विभागात पावणेदोन लाख उसाचे गाळप झाले आहे. राज्यात गेल्या वर्षी संपूर्ण हंगामात १० कोटी २० लाख टनांच्या जवळपास गाळप झाले आहे. यंदा उसाचे क्षेत्र अधिक असल्याने हा आकडाही वाढण्याचा अंदाज आहे. 

दिवाळीचा सण असल्याने अजून बहुतांश भागातील कारखान्यावर मजूर आलेले नाहीत. ऐन दिवाळीच मजूर कारखाना परिसरात येतात. सध्याही घर सोडण्याची मजुरांची लगबग सुरू आहे. त्यामुळे आठ दिवसांत बहुतांश कारखाने सुरू होण्याची शक्यता आहे. नगर विभागात आतापर्यंत सात कारखान्याचे गाळप सुरू झाले असून, आतापर्यंत पावणेदोन लाख टन उसाचे गाळप झाले आहे. नगर, नाशिक विभागांत १ लाख २३ हजार टन ऊस गाळप क्षमता आहे. गेल्या वर्षी १७ लाख २ हजार टन उसाचे गाळप झाले होते. यंदा ऊसक्षेत्र अधिक असल्याने गाळपही वाढणार असल्याचा अंदाज आहे. नगर जिल्ह्यात अजून चार साखर कारखान्यांना गाळप परवाना आयुक्तालयातून मिळाला नाही. 

नगर विभागात सुरू झालेले कारखाने 
कर्मवीर शंकरराव काळे (कोळपेवाडी), सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात (संगमनेर), ज्ञानेश्वश्‍वर सहकारी (भेंडा), अंबिका शुगर (राशीन), साईकृपा (देवदैठण), जयश्रीराम शुगर (जामखेड). मुळा सहकारी (सोनई).

राज्यात विभागनिहाय सुरू झालेले साखर कारखाने 
कोल्हापूर : १६,  पुणे : १४, सोलापुर : १२, नगर : ७, औरंगाबाद : २, नांदेड : ३, अमरावती : १, नागपूर : 0

English Headline: 
agriculture news in marathi Crushing of 55 sugar factories started in the state
Author Type: 
External Author
सूर्यकांत नेटके : अॅग्रोवन वृत्तसेवा 
नगर साखर ऊस गाळप हंगाम कोल्हापूर पूर floods पुणे सोलापूर दिवाळी नाशिक nashik संगमनेर औरंगाबाद aurangabad नांदेड nanded नागपूर nagpur
Search Functional Tags: 
नगर, साखर, ऊस, गाळप हंगाम, कोल्हापूर, पूर, Floods, पुणे, सोलापूर, दिवाळी, नाशिक, Nashik, संगमनेर, औरंगाबाद, Aurangabad, नांदेड, Nanded, नागपूर, Nagpur
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Crushing of 55 sugar factories started in the state
Meta Description: 
Crushing of 55 sugar factories started in the state
नगर विभागात सात साखर कारखान्यांचे गाळप सुरू झाले आहे. तर राज्यात सद्यःस्थितीत ५५ साखर कारखान्यांनी ऊस गाळपाला सुरुवात केली असून, आतापर्यंत १९ लाख टन उसाचे गाळप झाले आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X