राज्य सरकारचे ‘पुनश्‍च हरीओम्’ : बाधितक्षेत्र वगळता अन्य झोन नाहीत

मुंबई : कोरोनाच्या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेला लाँकडाउन टप्प्याटप्प्याने शिथिल करण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे. येत्या ३० जूनपर्यंत ‘लॉकडाउन’चा कालावधी वाढविला असला तरी ३, ५ आणि ८ जूनपासून वेगवेगळे निर्बंध शिथिल करण्यास सुरूवात होत आहे. केंद्र सरकारने धार्मिक स्थळे आणि इतरकाही गोष्टी सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी राज्याने मात्र तूर्तास ते बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या ‘अनलॉकिंग’च्या प्रक्रियेला ‘मिशन बिगीन अगेन’ असे म्हणण्यात आले आहे.

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनच्या पाचव्या टप्प्यातील मार्गदर्शक सूचना आज शासनाने जाहीर केल्या. त्यामध्ये बाधितक्षेत्र (कंटेनमेंट झोन वगळता) मुंबई महापालिकेसह मुंबई महानगर प्रदेश परिसरातील सर्व महापालिका,  पुणे,  सोलापूर,  औरंगाबाद,  मालेगाव,  नाशिक,  धुळे,  जळगाव,  अकोला आणि अमरावती या महापालिका क्षेत्रात बाधितक्षेत्र वगळता काही सवलती दिल्या आहेत.

यामधे तीन टप्पे करण्यत आले असून तीन विविध टप्यात सवलती अधिकअधिक वाढवत नेल्या आहेत. मागील टप्यात दिलेल्या सवलती या टप्यात कायम आहेत.
राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार येत्या ३ जूनपासून राज्यात आणखी काहीशी मोकळीक देण्यात येणार आहे. राज्यातील कंटेंन्मेंट झोन वगळता जनजीवन सुरू करण्यात येणार आहे.

लॉकडाउनचे राज्यातील टप्पे

 • पहिला  – २५ मार्च ते १४ एप्रिल
 • दुसरा – १५ एप्रिल ते ३ मे
 • तिसरा – ४ मे ते १७ मे
 • चौथा – १८ मे ते ३१ मे
 • पाचवा (‘मिशन बिगीन अगेन’) – १ जून ते ३० जून 

राज्य सरकारच्या सूचना
पहिला टप्पा (तीन जूनपासून लागू)

 • सायकलिंग, जॉगिंग, रनिंग, चालणे यासाठी कोणतेही निर्बंध नसतील. बीच, सरकारी-खासगी मैदाने, सोसायट्यांची मैदाने, बागा अशा ठिकाणी आरोग्याच्या दृष्टीने व्यायामासाठी सायकलिंग, जॉगिंग, रनिंग, वॉक यांना परवानगी असेल. पण हे केवळ सकाळी ५ ते संध्याकाळी ७ याच काळात करता येईल. सामूहिकपणे कोणतीच कृती करता येणार नाही. लहान मुलांसोबल एका मोठ्या व्यक्तिला राहता येईल.
 • प्लंबर, इलेक्ट्रिशयन, पेस्ट-कंट्रोल आणि टेक्निशियन्स यांना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून कामाला सुरूवात करता येईल.
 • गॅरेज सुरू करता येतील. पणत्यासाठी पूर्वनियोजित वेळ घेणे गरजेचे.
 • अत्यावश्यक सेवेमध्ये येणारी सरकारी कार्यालये वगळून इतर सरकारी कार्यालयांमध्ये १५ टक्के किंवा कमीतकमी १५ कर्मचाऱ्यांवर काम सुरू करता येईल.

दुसरा टप्पा (पाच जूनपासून)

 • सर्व दुकाने सुरू करण्यास ५ जूनपासून परवानगी असेल. मात्र, मार्केट कॉम्प्लेक्स आणि मॉल्स यांना परवानगी नसेल. परंतु यासाठी पी१ आणि पी२ असा नियम असेल. म्हणजेच रस्त्याच्या एका बाजूची दुकाने एका दिवशी सुरू असतील तर, दुसऱ्या बाजूची दुकाने दुसऱ्या दिवशी सुरू असतील. दुकानांची वेळ केवळ सकाळी ९ ते संध्याकाळी ५ एवढीच असेल.
 • कपड्यांच्या दुकानातील ट्रायल रूम वापरण्याची परवानगी नसेल. कारण त्यातून करोना संसर्ग पसरण्याचा धोका आहे. तसेच कोणत्याही प्रकारचे कपडे एक्स्चेंज किंवा रिटर्न करण्याची परवानगी नसेल.
 • लोकांनी दुकानांत किंवा मार्केटमध्ये जाताना पायी किंवा सायकलवर जावे. शक्यतो जवळच्याच दुकानांचा वापर करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. अत्यावश्यक नसलेल्या वस्तूंसाठी दूरचा प्रवास करण्यास परवानगी नसेल. शिवाय, यासाठी वाहनही वापरता येणार नाही.
 • एखाद्या बाजारात सोशल डिस्टंन्सिंगचा वापर केला जात नसल्याचे आढळल्यास, तो बाजार तत्काळ बंद करण्याचे अधिकार संबंधित अधिकाऱ्यांकडे असतील.
 • टॅक्सी, कॅब, रिक्षा आणि दुचाकी यांना केवळ अत्यावश्यक कामासाटी परवानगी. मात्र त्यासाठी चालक अधिक दोन प्रवासी असे बंधन असेल. चार चाकी वाहनांसाठीही हाच नियम असेल. मात्र दुचाकीवरून एकाच व्यक्तिला प्रवास करता येईल.

तिसरा टप्पा (आठ जूनपासून)

 • खासगी कार्यालयांना परवानगी असेल. मात्र कामाच्या ठिकाणी केवळ दहा टक्केच कर्मचारी असावेत. इतर कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करावे लागेल. जे कर्मचारी ऑफिसमध्ये येतील त्यांनी सॅनेटायझेशनची सर्व खबरदारी घेणे आवश्यक.

महत्त्वाचे

 • ६५ वर्षांवरील ज्येष्ठ व्यक्ती, गर्भवती आणि दहा वर्षांखालील मुलांनी अत्यावश्यक कामासाठी अथवा वैद्यकीय कारणाव्यतरिक्त घराबाहेर पडू नये असा सल्ला देण्यात आला आहे.
 • रात्री ९ ते पहाटे पाच वाजेपर्यंत संचारबंदी कायम असेल. अत्यावश्यक सेवांना त्यातून सूट असेल.
 • जिल्हांतर्गत बस सेवा ५० टक्के क्षमतेसह सुरू करता येईल.
 • आंतरजिल्हा बस सेवेला परवानगी नाही

हे बंदच राहणार

 • शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लास
 • आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक
 • मेट्रो
 • चित्रपटगृहे, नाट्यगृहे, जलतरण तलाव, एन्टरटेनमेंट पार्क, बार, सभागृहे,
 • सामाजिक, राजकीय, क्रीडा, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक कार्यक्रम आणि मोठे समारंभ
 • सर्व धार्मिक स्थळे
 • केशकर्तनालये, स्पा, सलून, ब्युटी पार्लर
 • शॉपिंग मॉल, हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर हॉस्पिटॅलिटी सेवा

(टप्प्याटप्प्याने व सर्वसाधारण कार्यपद्धती निश्चित करून या गोष्टी सुरू करण्याचा विचार केला जाणार आहे) 
 
News Item ID: 
820-news_story-1590948744-374
Mobile Device Headline: 
राज्य सरकारचे ‘पुनश्‍च हरीओम्’ : बाधितक्षेत्र वगळता अन्य झोन नाहीत
Appearance Status Tags: 
Mukhya News
राज्य सरकारचे ‘पुनश्‍च हरीओम्’ : बाधितक्षेत्र वगळता अन्य झोन नाहीत : मुख्यमंत्री ठाकरेराज्य सरकारचे ‘पुनश्‍च हरीओम्’ : बाधितक्षेत्र वगळता अन्य झोन नाहीत : मुख्यमंत्री ठाकरे
Mobile Body: 

English Headline: 
agriculture news in marathi 'Mission Begin Again' is aimed at restarting our lives again.: CM Uddhav Thackeray
Author Type: 
External Author
सकाळ न्यूज नेटवर्क
मुंबई mumbai कोरोना corona सरकार government धार्मिक नगर पुणे सोलापूर पूर floods औरंगाबाद aurangabad धुळे dhule जळगाव jangaon अकोला akola अमरावती महापालिका वन forest सायकल आरोग्य health सकाळ चालक वर्षा varsha जलतरण swimming शॉपिंग shopping हॉटेल रेस्टॉरंट
Search Functional Tags: 
मुंबई, Mumbai, कोरोना, Corona, सरकार, Government, धार्मिक, नगर, पुणे, सोलापूर, पूर, Floods, औरंगाबाद, Aurangabad, धुळे, Dhule, जळगाव, Jangaon, अकोला, Akola, अमरावती, महापालिका, वन, forest, सायकल, आरोग्य, Health, सकाळ, चालक, वर्षा, Varsha, जलतरण, swimming, शॉपिंग, shopping, हॉटेल, रेस्टॉरंट
Twitter Publish: 
Meta Keyword: 
'Mission Begin Again' is aimed at restarting our lives again
Meta Description: 
'Mission Begin Again' is aimed at restarting our lives again
येत्या ३० जूनपर्यंत ‘लॉकडाउन’चा कालावधी वाढविला असला तरी ३, ५ आणि ८ जूनपासून वेगवेगळे निर्बंध शिथिल करण्यास सुरूवात होत आहे.Source link

Leave a Comment

X