राष्ट्रीय पात्रता परीक्षेत परभणी कृषी विद्यापीठाचा डंका

परभणी ः नवी दिल्‍ली येथील कृषी शास्‍त्रज्ञ निवड मंडळातर्फे ऑगस्‍ट २०२१ मध्‍ये घेण्‍यात आलेल्‍या राष्‍ट्रीय पातळीवरील राष्‍ट्रीय पात्रता परीक्षेत (नेट) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विविध विद्याशाखांतील १५१ विद्यार्थ्‍यांनी यश संपादन केले आहे. कृषी विद्यापीठाच्‍या ५० वर्षांच्‍या इतिहासात यंदा प्रथमच उत्तीर्ण विद्यार्थ्‍यांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

विविध राज्‍यांतील कृषी विद्यापीठे तथा कृषी महाविद्यालयातील सहायक प्राध्‍यापक व समकक्ष पदाकरिता राष्‍ट्रीय पात्रता परीक्षा अनिवार्य आहे. परभणी कृषी महाविद्यालयाच्या ८५ यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये कृषी विद्या विषयाचे २९, कृषी हवामानशास्‍त्र १२, कृषी कीटकशास्त्र ११, विस्‍तार शिक्षण १०, कृषी वनस्पतिशास्त्र ८, मृद्‌विज्ञान व रसायनशास्‍त्र ५, उद्यानविद्या ४, कृषी अर्थशास्‍त्र ४, वनस्‍पती रोगशास्‍त्र २ विद्यार्थ्‍यांनी यश संपादन केले आहे. लातूर कृषी महाविद्यालयाच्या ३४ विद्यार्थ्यांमध्ये कृषी कीटकशास्त्र विषयाचे १५, कृषिविद्या ११, मृदा विज्ञान व रसायनशास्‍त्र ४, कृषी वनस्पतिशास्त्र २, कृषी अर्थशास्‍त्र १, उद्यानविद्या १ विद्यार्थ्‍यांनी यश संपादन केले आहे. बदनापूर कृषी महाविद्यालयाच्या १२ विद्यार्थ्यांमध्ये कृषिविद्या विषयाचे ८ तर कृषी कीटकशास्त्र ४ विद्यार्थ्‍यांनी यश संपादन केले आहे.

यातील तीन विद्यार्थी कृषी संशोधन सेवा भरती परीक्षेच्‍या लेखी परीक्षेत उत्‍तीर्ण झाले आहेत. परभणी येथील अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयाचे १६ विद्यार्थी नेट परीक्षेत उत्‍तीर्ण  झाले असून, यात प्रशांत पावसे आणि वीर शैलेश हे विद्यार्थी कृषी संशोधन सेवा भरती परीक्षेच्‍या लेखी परीक्षा उत्‍तीर्ण झाले आहेत. कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे पाच विद्यार्थी नेट परीक्षेत उत्तीर्ण झाले असून, अजय सातपुते हा कृषी संशोधन सेवा भरती परीक्षेच्‍या लेखी परीक्षा उत्तीर्ण झाला 
आहे. कुलगुरू डॉ. अशोक ढवण, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, कुलसचिव डॉ. धीरजकुमार कदम आदींसह विविध महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी यशस्वितांचे अभिनंदन केले. यशस्वी विद्यार्थ्यांची १५१ ही संख्या अंतिम नाही. त्यात आणखीन भर पडू शकते.

विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्‍सवी वर्षात नेट परीक्षेत विद्यार्थ्यांना मिळालेले घवघवीत यश मानाचा तुरा आहे. विद्यापीठाचा शैक्षणिक स्‍तर उंचावल्‍याचे हे द्योतक आहे. 
– डॉ. अशोक ढवण, कुलगुरू, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

News Item ID: 
820-news_story-1635690651-awsecm-364
Mobile Device Headline: 
राष्ट्रीय पात्रता परीक्षेत परभणी कृषी विद्यापीठाचा डंका
Appearance Status Tags: 
Section News
Danka of Parbhani Agricultural University in National Eligibility TestDanka of Parbhani Agricultural University in National Eligibility Test
Mobile Body: 

परभणी ः नवी दिल्‍ली येथील कृषी शास्‍त्रज्ञ निवड मंडळातर्फे ऑगस्‍ट २०२१ मध्‍ये घेण्‍यात आलेल्‍या राष्‍ट्रीय पातळीवरील राष्‍ट्रीय पात्रता परीक्षेत (नेट) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विविध विद्याशाखांतील १५१ विद्यार्थ्‍यांनी यश संपादन केले आहे. कृषी विद्यापीठाच्‍या ५० वर्षांच्‍या इतिहासात यंदा प्रथमच उत्तीर्ण विद्यार्थ्‍यांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

विविध राज्‍यांतील कृषी विद्यापीठे तथा कृषी महाविद्यालयातील सहायक प्राध्‍यापक व समकक्ष पदाकरिता राष्‍ट्रीय पात्रता परीक्षा अनिवार्य आहे. परभणी कृषी महाविद्यालयाच्या ८५ यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये कृषी विद्या विषयाचे २९, कृषी हवामानशास्‍त्र १२, कृषी कीटकशास्त्र ११, विस्‍तार शिक्षण १०, कृषी वनस्पतिशास्त्र ८, मृद्‌विज्ञान व रसायनशास्‍त्र ५, उद्यानविद्या ४, कृषी अर्थशास्‍त्र ४, वनस्‍पती रोगशास्‍त्र २ विद्यार्थ्‍यांनी यश संपादन केले आहे. लातूर कृषी महाविद्यालयाच्या ३४ विद्यार्थ्यांमध्ये कृषी कीटकशास्त्र विषयाचे १५, कृषिविद्या ११, मृदा विज्ञान व रसायनशास्‍त्र ४, कृषी वनस्पतिशास्त्र २, कृषी अर्थशास्‍त्र १, उद्यानविद्या १ विद्यार्थ्‍यांनी यश संपादन केले आहे. बदनापूर कृषी महाविद्यालयाच्या १२ विद्यार्थ्यांमध्ये कृषिविद्या विषयाचे ८ तर कृषी कीटकशास्त्र ४ विद्यार्थ्‍यांनी यश संपादन केले आहे.

यातील तीन विद्यार्थी कृषी संशोधन सेवा भरती परीक्षेच्‍या लेखी परीक्षेत उत्‍तीर्ण झाले आहेत. परभणी येथील अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयाचे १६ विद्यार्थी नेट परीक्षेत उत्‍तीर्ण  झाले असून, यात प्रशांत पावसे आणि वीर शैलेश हे विद्यार्थी कृषी संशोधन सेवा भरती परीक्षेच्‍या लेखी परीक्षा उत्‍तीर्ण झाले आहेत. कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे पाच विद्यार्थी नेट परीक्षेत उत्तीर्ण झाले असून, अजय सातपुते हा कृषी संशोधन सेवा भरती परीक्षेच्‍या लेखी परीक्षा उत्तीर्ण झाला 
आहे. कुलगुरू डॉ. अशोक ढवण, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, कुलसचिव डॉ. धीरजकुमार कदम आदींसह विविध महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी यशस्वितांचे अभिनंदन केले. यशस्वी विद्यार्थ्यांची १५१ ही संख्या अंतिम नाही. त्यात आणखीन भर पडू शकते.

विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्‍सवी वर्षात नेट परीक्षेत विद्यार्थ्यांना मिळालेले घवघवीत यश मानाचा तुरा आहे. विद्यापीठाचा शैक्षणिक स्‍तर उंचावल्‍याचे हे द्योतक आहे. 
– डॉ. अशोक ढवण, कुलगुरू, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

English Headline: 
Agriculture news in Marathi Danka of Parbhani Agricultural University in National Eligibility Test
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
परभणी parbhabi कृषी विद्यापीठ agriculture university संप वर्षा varsha विषय topics शिक्षण education लातूर latur तूर पूर floods अभियांत्रिकी
Search Functional Tags: 
परभणी, Parbhabi, कृषी विद्यापीठ, Agriculture University, संप, वर्षा, Varsha, विषय, Topics, शिक्षण, Education, लातूर, Latur, तूर, पूर, Floods, अभियांत्रिकी
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Danka of Parbhani Agricultural University in National Eligibility Test
Meta Description: 
Danka of Parbhani Agricultural University in National Eligibility Test
नवी दिल्‍ली येथील कृषी शास्‍त्रज्ञ निवड मंडळातर्फे ऑगस्‍ट २०२१ मध्‍ये घेण्‍यात आलेल्‍या राष्‍ट्रीय पातळीवरील राष्‍ट्रीय पात्रता परीक्षेत (नेट) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विविध विद्याशाखांतील १५१ विद्यार्थ्‍यांनी यश संपादन केले आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X