राष्ट्रीय स्तरावरील साखर उद्योगातील गुणवत्ता पारितोषिके जाहीर

कोल्हापूर : नवी दिल्लीच्या राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीने देशातील साखर कारखान्यांना देण्यात येणारे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये राज्यातील कारखान्यांनी मोहोर उठविली आहे. राज्याला १० पारितोषिके मिळाली आहेत. दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश असून, त्यांना चार पारितोषिके प्राप्त झाली आहेत. गुजरात, हरियाना व तमिळनाडूने प्रत्येकी दोन पारितोषिके मिळविली आहेत. मध्य प्रदेशाला एक मिळाले आहे. 

यंदाच्या वर्षाचे संपूर्ण देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्यासाठीचे मानाचे वसंतदादा पाटील पारितोषिक पांडुरंग सहकारी साखर कारखाना लि., सोलापूर यांना मिळाले आहे. उच्च उतारा विभागात अति उत्कृष्ट साखर कारखाना म्हणून कागलच्या श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास गौरविण्यात येणार आहे.
विक्रमी ऊस गाळपात हुपरीच्या (जि. कोल्हापूर) जवाहर, तर उत्कृष्ट ऊस उत्पादकतेत शिरोळच्या श्री दत्त साखर कारखान्याने पहिला क्रमांक मिळवला. यंदाच्या (२०२१) वर्षीच्या गुणवत्ता पारितोषिकासाठी देशातून १०८ सहकारी साखर कारखान्यांनी सहभाग घेतला. त्यात महाराष्ट्र (४६), उत्तर प्रदेश (१३), तमिळनाडू (११), हरियाना (१०), गुजरात (१०), पंजाब (९) कर्नाटक (७) आणि मध्य प्रदेश व आंध्र प्रदेश (प्रत्येकी एक) कारखाने सहभागी झाले होते. 

संस्थेमार्फत दर वर्षी देशातील सहकारी साखर कारखान्यांचे मूल्यांकन करण्यात येते व त्याआधारे ऊस उत्पादकता, तांत्रिक गुणवत्ता, वित्तीय व्यवस्थापन, अधिकतम ऊस गाळप, सर्वोत्तम साखर उतारा, सर्वांत जास्त साखरनिर्यात, अशा विविध क्षेत्रात देदीप्यमान कामगिरी करणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांचे काटेकोर मूल्यमापन करून त्याआधारे केंद्रीय मुख्य संचालक (साखर) यांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे वर्ष २०२१साठीची निश्‍चित केलेली एकूण २१ पारितोषिके राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी जाहीर केली. या प्रसंगी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे उपस्थित होते.  

दांडेगावकर म्हणाले, ‘‘पारितोषिक योजनेच्या धोरणानुसार देशातील उच्च साखर उतारा (किमान सरासरी १० टक्के) असणाऱ्या महाराष्ट्र, गुजरात व कर्नाटक या राज्यांचा एक गट तयार करण्यात आला. या गटात देशातील एकूण ६३ सहकारी साखर कारखान्यांचा सहभाग होता. उर्वरित (सरासरी १० टक्क्यांपेक्षा कमी उतारा) राज्यांचा दुसरा गट तयार करण्यात आला. या गटात देशातील एकूण ४५ सहकारी साखर कारखान्यांचा समावेश करण्यात आला. त्यात उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाना तमिळनाडू, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश इत्यादी राज्यांचा समावेश करण्यात आला होता. तसेच ‘एका कारखान्याला एक पारितोषिक’ असे धोरण ठरविण्यात आले.’’

गट १ 
उच्च उतारा विभाग 
उत्कृष्ट ऊस उत्पादकता : श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना, शिरोळ, जि. कोल्हापूर, राजारामबापू पाटील, स. सा. का., सांगली
तांत्रिक कार्यक्षमता 
उच्च उतारा विभाग : विघ्नहर स. सा. का., पुणे, डॉ. पतंगराव कदम सोनहिरा स. सा. का., सांगली.
उत्कृष्ट वित्तीय व्यवस्थापन   
उच्च उतारा विभाग : श्री नर्मदा खाण्ड उद्योग मंडळी लि. गुजरात, श्री खेडूत सहकारी खांड उद्योग मंडळी लि. बारडोली, गुजरात.
विक्रमी ऊस गाळप
जवाहर शेतकरी स. सा. का., कोल्हापूर
विक्रमी ऊस उतारा
अजिंक्यतारा स.सा.का., सातारा 
अति उत्कृष्ट साखर कारखाना 
उच्च उतारा विभाग ः श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना लि. कागल, कोल्हापूर.
विक्रमी साखर निर्यात : विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना लि., पिंपळनेर. सह्याद्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना लि., सोलापूर. 
गट २
उर्वरित विभाग
उत्कृष्ट ऊस उत्पादकता : दि कैथल सहकारी साखर कारखाना, हरियाना
किसान शेतकरी चिनी मिल्स लि., नाजीबाबाद, उत्तर प्रदेश
तांत्रिक कार्यक्षमता
दि शहाबाद सहकारी चिनी मिल्स, हरियाना
दि किसान सहकारी चिनी मिल्स लि. साथिऑन, आझमगड, उत्तर प्रदेश
उत्कृष्ट वित्तीय व्यवस्थापन
डी. एस. सुब्रमण्या शिवा सहकारी साखर मिल्स लि. तमिळनाडू
श्री नवलसिंग सहकारी शक्कर कारखाना मर्यादित, बुऱ्हाणपूर, मध्य प्रदेश
विक्रमी ऊसगाळप
रामाला सहकारी चिनी मिल्स लि., उत्तर प्रदेश
विक्रमी ऊस उतारा
दि किसान सहकारी चिनी मिल्स लि. गजरौला, उत्तर प्रदेश
अति उत्कृष्ट साखर कारखाना
कल्लाकुरीची सहकारी साखर मिल्स, तमिळनाडू

News Item ID: 
820-news_story-1634999934-awsecm-424
Mobile Device Headline: 
राष्ट्रीय स्तरावरील साखर उद्योगातील गुणवत्ता पारितोषिके जाहीर
Appearance Status Tags: 
Mukhya News
राष्ट्रीय स्तरावरील साखर उद्योगातील गुणवत्ता पारितोषिके जाहीर National level sugar industry quality awards announcedराष्ट्रीय स्तरावरील साखर उद्योगातील गुणवत्ता पारितोषिके जाहीर National level sugar industry quality awards announced
Mobile Body: 

कोल्हापूर : नवी दिल्लीच्या राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीने देशातील साखर कारखान्यांना देण्यात येणारे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये राज्यातील कारखान्यांनी मोहोर उठविली आहे. राज्याला १० पारितोषिके मिळाली आहेत. दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश असून, त्यांना चार पारितोषिके प्राप्त झाली आहेत. गुजरात, हरियाना व तमिळनाडूने प्रत्येकी दोन पारितोषिके मिळविली आहेत. मध्य प्रदेशाला एक मिळाले आहे. 

यंदाच्या वर्षाचे संपूर्ण देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्यासाठीचे मानाचे वसंतदादा पाटील पारितोषिक पांडुरंग सहकारी साखर कारखाना लि., सोलापूर यांना मिळाले आहे. उच्च उतारा विभागात अति उत्कृष्ट साखर कारखाना म्हणून कागलच्या श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास गौरविण्यात येणार आहे.
विक्रमी ऊस गाळपात हुपरीच्या (जि. कोल्हापूर) जवाहर, तर उत्कृष्ट ऊस उत्पादकतेत शिरोळच्या श्री दत्त साखर कारखान्याने पहिला क्रमांक मिळवला. यंदाच्या (२०२१) वर्षीच्या गुणवत्ता पारितोषिकासाठी देशातून १०८ सहकारी साखर कारखान्यांनी सहभाग घेतला. त्यात महाराष्ट्र (४६), उत्तर प्रदेश (१३), तमिळनाडू (११), हरियाना (१०), गुजरात (१०), पंजाब (९) कर्नाटक (७) आणि मध्य प्रदेश व आंध्र प्रदेश (प्रत्येकी एक) कारखाने सहभागी झाले होते. 

संस्थेमार्फत दर वर्षी देशातील सहकारी साखर कारखान्यांचे मूल्यांकन करण्यात येते व त्याआधारे ऊस उत्पादकता, तांत्रिक गुणवत्ता, वित्तीय व्यवस्थापन, अधिकतम ऊस गाळप, सर्वोत्तम साखर उतारा, सर्वांत जास्त साखरनिर्यात, अशा विविध क्षेत्रात देदीप्यमान कामगिरी करणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांचे काटेकोर मूल्यमापन करून त्याआधारे केंद्रीय मुख्य संचालक (साखर) यांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे वर्ष २०२१साठीची निश्‍चित केलेली एकूण २१ पारितोषिके राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी जाहीर केली. या प्रसंगी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे उपस्थित होते.  

दांडेगावकर म्हणाले, ‘‘पारितोषिक योजनेच्या धोरणानुसार देशातील उच्च साखर उतारा (किमान सरासरी १० टक्के) असणाऱ्या महाराष्ट्र, गुजरात व कर्नाटक या राज्यांचा एक गट तयार करण्यात आला. या गटात देशातील एकूण ६३ सहकारी साखर कारखान्यांचा सहभाग होता. उर्वरित (सरासरी १० टक्क्यांपेक्षा कमी उतारा) राज्यांचा दुसरा गट तयार करण्यात आला. या गटात देशातील एकूण ४५ सहकारी साखर कारखान्यांचा समावेश करण्यात आला. त्यात उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाना तमिळनाडू, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश इत्यादी राज्यांचा समावेश करण्यात आला होता. तसेच ‘एका कारखान्याला एक पारितोषिक’ असे धोरण ठरविण्यात आले.’’

गट १ 
उच्च उतारा विभाग 
उत्कृष्ट ऊस उत्पादकता : श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना, शिरोळ, जि. कोल्हापूर, राजारामबापू पाटील, स. सा. का., सांगली
तांत्रिक कार्यक्षमता 
उच्च उतारा विभाग : विघ्नहर स. सा. का., पुणे, डॉ. पतंगराव कदम सोनहिरा स. सा. का., सांगली.
उत्कृष्ट वित्तीय व्यवस्थापन   
उच्च उतारा विभाग : श्री नर्मदा खाण्ड उद्योग मंडळी लि. गुजरात, श्री खेडूत सहकारी खांड उद्योग मंडळी लि. बारडोली, गुजरात.
विक्रमी ऊस गाळप
जवाहर शेतकरी स. सा. का., कोल्हापूर
विक्रमी ऊस उतारा
अजिंक्यतारा स.सा.का., सातारा 
अति उत्कृष्ट साखर कारखाना 
उच्च उतारा विभाग ः श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना लि. कागल, कोल्हापूर.
विक्रमी साखर निर्यात : विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना लि., पिंपळनेर. सह्याद्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना लि., सोलापूर. 
गट २
उर्वरित विभाग
उत्कृष्ट ऊस उत्पादकता : दि कैथल सहकारी साखर कारखाना, हरियाना
किसान शेतकरी चिनी मिल्स लि., नाजीबाबाद, उत्तर प्रदेश
तांत्रिक कार्यक्षमता
दि शहाबाद सहकारी चिनी मिल्स, हरियाना
दि किसान सहकारी चिनी मिल्स लि. साथिऑन, आझमगड, उत्तर प्रदेश
उत्कृष्ट वित्तीय व्यवस्थापन
डी. एस. सुब्रमण्या शिवा सहकारी साखर मिल्स लि. तमिळनाडू
श्री नवलसिंग सहकारी शक्कर कारखाना मर्यादित, बुऱ्हाणपूर, मध्य प्रदेश
विक्रमी ऊसगाळप
रामाला सहकारी चिनी मिल्स लि., उत्तर प्रदेश
विक्रमी ऊस उतारा
दि किसान सहकारी चिनी मिल्स लि. गजरौला, उत्तर प्रदेश
अति उत्कृष्ट साखर कारखाना
कल्लाकुरीची सहकारी साखर मिल्स, तमिळनाडू

English Headline: 
Agriculture News in Marathi National level sugar industry quality awards announced
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
दिल्ली साखर पुरस्कार awards कोल्हापूर पूर floods उत्तर प्रदेश गुजरात तमिळनाडू मध्य प्रदेश madhya pradesh वर्षा varsha सोलापूर विभाग sections कागल ऊस महाराष्ट्र maharashtra पंजाब कर्नाटक आंध्र प्रदेश पुणे पतंगराव कदम साखर निर्यात बाबा baba
Search Functional Tags: 
दिल्ली, साखर, पुरस्कार, Awards, कोल्हापूर, पूर, Floods, उत्तर प्रदेश, गुजरात, तमिळनाडू, मध्य प्रदेश, Madhya Pradesh, वर्षा, Varsha, सोलापूर, विभाग, Sections, कागल, ऊस, महाराष्ट्र, Maharashtra, पंजाब, कर्नाटक, आंध्र प्रदेश, पुणे, पतंगराव कदम, साखर निर्यात, बाबा, Baba
Twitter Publish: 
Meta Keyword: 
National level sugar industry quality awards announced
Meta Description: 
National level sugar industry quality awards announced
नवी दिल्लीच्या राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीने देशातील साखर कारखान्यांना देण्यात येणारे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये राज्यातील कारखान्यांनी मोहोर उठविली आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X