रोपवाटिकेत आच्छादन, पीक संजीवकांचा वापर

रोपवाटिका व्यवस्थापनासाठी अभिवृद्धी स्वच्छता, निचरा, वळण-छाटणी इत्यादी बाबी महत्त्वाच्या आहेत. प्रस्तुत लेखामध्ये रोपवाटिकेतील आच्छादन पद्धती आणि पीक संजीवकांच्या वापर याविषयी माहिती घेऊ.

रोपवाटिकेतील आच्छादन 
रोपवाटिकेतील जमीन झाकणे किंवा आच्छादित करणे यालाच मल्चिंग करणे असेही म्हणतात. साधारणपणे आच्छादनासाठी सेंद्रिय आणि असेंद्रिय घटकांचा वापर केला जातो. रोपवाटिकेसाठी आच्छादनाची निवड करताना वाजवी किमतीमध्ये ते उपलब्ध असल्याची खात्री करावी. तसेच आच्छादन वापरास सुलभ आणि टिकाऊ असावे.

आच्छादनाचे प्रकार 
सेंद्रिय आच्छादन 

गवत, तणे, वनस्पतीचे अवशेष, कोळसा/राख, पोयटा माती या सेंद्रिय घटकांचा आच्छादनासाठी वापर होतो.

असेंद्रिय किंवा रासायनिक आच्छादन 
काळा किंवा पांढऱ्या रंगाचा पॉलिथिन कागद, खडे, वाळू, खडी यांचा वापर असेंद्रिय आच्छादनामध्ये केला जातो.

आच्छादन वापरताना घ्यावयाची काळजी 

 • बी पेरणी किंवा टोकणीनंतर त्वरित आच्छादन करावे. बियाण्याची उगवण झाल्यानंतर आच्छादन बाजूला करावे.
 • आच्छादन करतेवेळी रोप किंवा कलम सोडून त्याच्या बाजूची मोकळी जमीन झाकली जाईल, याची काळजी घ्यावी.
 • आच्छादन एकसारख्या प्रमाणात करावे. यामुळे आच्छादनाची परिणामकारकता अधिक वाढते.

आच्छादनाचे फायदे 

 • मातीतील ओलावा टिकवून ठेवला जातो.
 • जमिनीत वाफसा जास्त काळ ठेवण्यासाठी मदत होते.
 • तणांचा बंदोबस्त होतो.
 • जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढते.
 • मातीतील उपयुक्त जिवाणूंची संख्या वाढते.

रोपवाटिकेत पीक संजीवकांचा वापर 
पीक संजीवके म्हणजेच वनस्पती संप्रेरके आणि वनस्पती वाढ नियंत्रक होय. वनस्पतीमध्ये काही रासायनिक द्रव्ये अल्प प्रमाणात तयार होऊन वनस्पतींच्या अंतर्गत कार्यपद्धतीत बदल घडवून आणतात, त्यांना ‘पीक संजीवके’ असे म्हणतात. वनस्पतीमध्ये तयार होणाऱ्या संजीवकांना ‘नैसर्गिक संजीवके’ म्हणतात. तर प्रयोगशाळेमध्ये तयार केल्या जाणाऱ्या संजीवकांना ‘कृत्रिम संजीवके’ म्हणतात.

वनस्पतीच्या वेगवेगळ्या शरिरक्रियेमध्ये संजीवके सहभागी होतात किंवा सहयोगी म्हणून काम करतात. संजीवकांच्या कार्यावरून त्यांचे खालील प्रमाणे प्रकार पडतात.

नियंत्रके : वनस्पतीमध्ये होणाऱ्या विविध क्रियांवर नियंत्रण करतात.
वर्धके (प्रमोटर्स) : वनस्पतीच्या जैव रासायनिक क्रियांमध्ये वाढ करतात.
रिटार्डण्टंस : वनस्पतीची वाढ खुंटीत करणारे.

पीक संजीवकांचे उपप्रकार 

 • जिबरेलिन्स (जीए-३, जीए-७)
 • ऑकझीन्स (इंडोल ॲसिटिक ॲसिड (आयएए), नॅप्थील ॲसिटिक ॲसिड (एनएए)
 • सायटोकायनीन्स (कायनेटीन, झियाटीन)
 • अ‍ॅबसिसीन्स (अ‍ॅबसिसिक आम्ल, सायकोसिल)
 • इथिलिन्स

संजीवके वापराना घ्यावयाची काळजी 

 • पिकांनुसार योग्य प्रकारच्या संजीवकाची निवड करावी.
 • योग्य माध्यमामध्ये संजीवके विरघळून घ्यावीत.
 • योग्य तीव्रतेचे द्रावण तयार करावे.
 • तयार द्रावण किंवा पेस्ट किंवा भुकटीची योग्य पद्धतीने हाताळणे करावी.

– दर्शना मोरे, ९६८९२१७७९०
(सहायक प्राध्यापिका, के. के. वाघ उद्यानविद्या महाविद्यालय, नाशिक)

News Item ID: 
820-news_story-1635423199-awsecm-463
Mobile Device Headline: 
रोपवाटिकेत आच्छादन, पीक संजीवकांचा वापर
Appearance Status Tags: 
Section News
Organic mulch helps to increase the amount of organic matter in the soil and the number of useful bacteria.Organic mulch helps to increase the amount of organic matter in the soil and the number of useful bacteria.
Mobile Body: 

रोपवाटिका व्यवस्थापनासाठी अभिवृद्धी स्वच्छता, निचरा, वळण-छाटणी इत्यादी बाबी महत्त्वाच्या आहेत. प्रस्तुत लेखामध्ये रोपवाटिकेतील आच्छादन पद्धती आणि पीक संजीवकांच्या वापर याविषयी माहिती घेऊ.

रोपवाटिकेतील आच्छादन 
रोपवाटिकेतील जमीन झाकणे किंवा आच्छादित करणे यालाच मल्चिंग करणे असेही म्हणतात. साधारणपणे आच्छादनासाठी सेंद्रिय आणि असेंद्रिय घटकांचा वापर केला जातो. रोपवाटिकेसाठी आच्छादनाची निवड करताना वाजवी किमतीमध्ये ते उपलब्ध असल्याची खात्री करावी. तसेच आच्छादन वापरास सुलभ आणि टिकाऊ असावे.

आच्छादनाचे प्रकार 
सेंद्रिय आच्छादन 

गवत, तणे, वनस्पतीचे अवशेष, कोळसा/राख, पोयटा माती या सेंद्रिय घटकांचा आच्छादनासाठी वापर होतो.

असेंद्रिय किंवा रासायनिक आच्छादन 
काळा किंवा पांढऱ्या रंगाचा पॉलिथिन कागद, खडे, वाळू, खडी यांचा वापर असेंद्रिय आच्छादनामध्ये केला जातो.

आच्छादन वापरताना घ्यावयाची काळजी 

 • बी पेरणी किंवा टोकणीनंतर त्वरित आच्छादन करावे. बियाण्याची उगवण झाल्यानंतर आच्छादन बाजूला करावे.
 • आच्छादन करतेवेळी रोप किंवा कलम सोडून त्याच्या बाजूची मोकळी जमीन झाकली जाईल, याची काळजी घ्यावी.
 • आच्छादन एकसारख्या प्रमाणात करावे. यामुळे आच्छादनाची परिणामकारकता अधिक वाढते.

आच्छादनाचे फायदे 

 • मातीतील ओलावा टिकवून ठेवला जातो.
 • जमिनीत वाफसा जास्त काळ ठेवण्यासाठी मदत होते.
 • तणांचा बंदोबस्त होतो.
 • जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढते.
 • मातीतील उपयुक्त जिवाणूंची संख्या वाढते.

रोपवाटिकेत पीक संजीवकांचा वापर 
पीक संजीवके म्हणजेच वनस्पती संप्रेरके आणि वनस्पती वाढ नियंत्रक होय. वनस्पतीमध्ये काही रासायनिक द्रव्ये अल्प प्रमाणात तयार होऊन वनस्पतींच्या अंतर्गत कार्यपद्धतीत बदल घडवून आणतात, त्यांना ‘पीक संजीवके’ असे म्हणतात. वनस्पतीमध्ये तयार होणाऱ्या संजीवकांना ‘नैसर्गिक संजीवके’ म्हणतात. तर प्रयोगशाळेमध्ये तयार केल्या जाणाऱ्या संजीवकांना ‘कृत्रिम संजीवके’ म्हणतात.

वनस्पतीच्या वेगवेगळ्या शरिरक्रियेमध्ये संजीवके सहभागी होतात किंवा सहयोगी म्हणून काम करतात. संजीवकांच्या कार्यावरून त्यांचे खालील प्रमाणे प्रकार पडतात.

नियंत्रके : वनस्पतीमध्ये होणाऱ्या विविध क्रियांवर नियंत्रण करतात.
वर्धके (प्रमोटर्स) : वनस्पतीच्या जैव रासायनिक क्रियांमध्ये वाढ करतात.
रिटार्डण्टंस : वनस्पतीची वाढ खुंटीत करणारे.

पीक संजीवकांचे उपप्रकार 

 • जिबरेलिन्स (जीए-३, जीए-७)
 • ऑकझीन्स (इंडोल ॲसिटिक ॲसिड (आयएए), नॅप्थील ॲसिटिक ॲसिड (एनएए)
 • सायटोकायनीन्स (कायनेटीन, झियाटीन)
 • अ‍ॅबसिसीन्स (अ‍ॅबसिसिक आम्ल, सायकोसिल)
 • इथिलिन्स

संजीवके वापराना घ्यावयाची काळजी 

 • पिकांनुसार योग्य प्रकारच्या संजीवकाची निवड करावी.
 • योग्य माध्यमामध्ये संजीवके विरघळून घ्यावीत.
 • योग्य तीव्रतेचे द्रावण तयार करावे.
 • तयार द्रावण किंवा पेस्ट किंवा भुकटीची योग्य पद्धतीने हाताळणे करावी.

– दर्शना मोरे, ९६८९२१७७९०
(सहायक प्राध्यापिका, के. के. वाघ उद्यानविद्या महाविद्यालय, नाशिक)

English Headline: 
agricultural news in marathi article regarding Nursery management
Author Type: 
External Author
दर्शना मोरे, पल्लवी घुले, संदिप विधाते
विषय topics तण weed मका maize ओला वाघ
Search Functional Tags: 
विषय, Topics, तण, weed, मका, Maize, ओला, वाघ
Twitter Publish: 
Meta Keyword: 
article regarding Nursery management
Meta Description: 
article regarding Nursery management
रोपवाटिका व्यवस्थापनासाठी अभिवृद्धी स्वच्छता, निचरा, वळण-छाटणी इत्यादी बाबी महत्त्वाच्या आहेत. प्रस्तुत लेखामध्ये रोपवाटिकेतील आच्छादन पद्धती आणि पीक संजीवकांच्या वापर याविषयी माहिती घेऊ.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X