लाखाहून अधिक शेतकरी पीक कर्जापासून वंचित

अमरावती  : कोरोना संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर खरीप हंगामात पीककर्जासाठी बँकांच्या चकरा मारून, त्रास सहन करीत जिल्ह्यातील १ लाख २३ हजार ६८१  शेतकऱ्यांना कर्ज मिळू शकले, तर १ लाख ४१ हजार १२ शेतकरी कर्जापासून वंचित राहिले आहेत. खरीप हंगामात १ हजार ७२० कोटी रुपयांच्या कर्जवाटपाचे लक्ष्य निश्‍चित करण्यात आले होते.

त्यापैकी १ हजार ७३ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले. यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी ६९ हजार २१ शेतकऱ्यांना ६७६ कोटी ७० लाख रुपये, खासगी क्षेत्रातील बँकांनी १ हजार ५१८ शेतकऱ्यांना ३६ कोटी २३ लाख रुपयांचे, तर ग्रामीण बँकांनी १ हजार ३९४ शेतकऱ्यांना १६ कोटी ५५ लाख व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ५१ हजार ७४८ शेतकऱ्यांना ३४४ कोटी ४६ लाख रुपये कर्ज वितरण केले आहे. कर्जवाटपाची सरासरी ६२ टक्के इतकी आहे.

खरीप हंगामात पीककर्जासाठी २ लाख ६४ हजार ६९३ शेतकऱ्यांचे लक्ष्य होते. त्यापैकी १ लाख २३ हजार ६८१ शेतकरी कर्जासाठी पात्र ठरले. कोरोना संक्रमणामुळे कर्जप्रकरणे बँकांकडे पाठवताना सहकार विभागाकडून विलंब झाला. त्यातही कर्जमाफीसाठी प्रकरणे तयार करून बँकांना पाठविण्याचा भार सहकार विभागावर होता.

यामध्ये शेतकऱ्यांचे खाते क्रमांक, आधार प्रमाणीकरण अशा तांत्रिक अडचणींसोबत कोरोनामुळे कर्मचाऱ्यांचा तुटवडा होता. कमी मनुष्यबळातही या विभागाने कर्जमाफी व पीककर्जाची प्रकरणे केली आणि कर्जवाटपाची टक्केवारी गेल्या पाच वर्षांत प्रथमच ६२ टक्‍क्‍यांवर गेली आहे.

खरीप हंगामात पीककर्जासाठी २ लाख ६४ हजार ६९३ शेतकऱ्यांचे लक्ष्य होते. त्यापैकी १ लाख २३ हजार ६८१ शेतकरी कर्जासाठी पात्र ठरले. कोरोना संक्रमणामुळे कर्जप्रकरणे बँकांकडे पाठवताना सहकार विभागाकडून विलंब झाला.

अमरावतीतील पीककर्ज स्थिती

 •     १ लाख २३ हजार ६८१  शेतकऱ्यांना कर्ज 
 •     १ लाख ४१ हजार १२ शेतकरी कर्जापासून वंचित
 •     खरिपासाठी १ हजार ७२० कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्य
 •     १ हजार ७३ कोटी रुपयांचे कर्जवाटप
 •     सरकारी बँकांकडून ६९ हजार २१ शेतकऱ्यांना ६७६ कोटी ७० लाखांचे कर्ज
 •     खासगी बँकांकडून १ हजार ५१८ शेतकऱ्यांना ३६ कोटी २३ लाखांचे कर्ज
 •     ग्रामीण बँकांकडून १ हजार ३९४ शेतकऱ्यांना १६ कोटी ५५ लाखांचे कर्ज 
 •     डीसीसीकडून ५१ हजार ७४८ शेतकऱ्यांना ३४४ कोटी ४६ लाखांचे कर्ज
 •      कर्जवाटपाची एकूण सरासरी ६२ टक्के
News Item ID: 
820-news_story-1609339930-awsecm-783
Mobile Device Headline: 
लाखाहून अधिक शेतकरी पीक कर्जापासून वंचित
Appearance Status Tags: 
Tajya News
लाखाहून अधिक शेतकरी पीक कर्जापासून वंचितलाखाहून अधिक शेतकरी पीक कर्जापासून वंचित
Mobile Body: 

अमरावती  : कोरोना संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर खरीप हंगामात पीककर्जासाठी बँकांच्या चकरा मारून, त्रास सहन करीत जिल्ह्यातील १ लाख २३ हजार ६८१  शेतकऱ्यांना कर्ज मिळू शकले, तर १ लाख ४१ हजार १२ शेतकरी कर्जापासून वंचित राहिले आहेत. खरीप हंगामात १ हजार ७२० कोटी रुपयांच्या कर्जवाटपाचे लक्ष्य निश्‍चित करण्यात आले होते.

त्यापैकी १ हजार ७३ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले. यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी ६९ हजार २१ शेतकऱ्यांना ६७६ कोटी ७० लाख रुपये, खासगी क्षेत्रातील बँकांनी १ हजार ५१८ शेतकऱ्यांना ३६ कोटी २३ लाख रुपयांचे, तर ग्रामीण बँकांनी १ हजार ३९४ शेतकऱ्यांना १६ कोटी ५५ लाख व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ५१ हजार ७४८ शेतकऱ्यांना ३४४ कोटी ४६ लाख रुपये कर्ज वितरण केले आहे. कर्जवाटपाची सरासरी ६२ टक्के इतकी आहे.

खरीप हंगामात पीककर्जासाठी २ लाख ६४ हजार ६९३ शेतकऱ्यांचे लक्ष्य होते. त्यापैकी १ लाख २३ हजार ६८१ शेतकरी कर्जासाठी पात्र ठरले. कोरोना संक्रमणामुळे कर्जप्रकरणे बँकांकडे पाठवताना सहकार विभागाकडून विलंब झाला. त्यातही कर्जमाफीसाठी प्रकरणे तयार करून बँकांना पाठविण्याचा भार सहकार विभागावर होता.

यामध्ये शेतकऱ्यांचे खाते क्रमांक, आधार प्रमाणीकरण अशा तांत्रिक अडचणींसोबत कोरोनामुळे कर्मचाऱ्यांचा तुटवडा होता. कमी मनुष्यबळातही या विभागाने कर्जमाफी व पीककर्जाची प्रकरणे केली आणि कर्जवाटपाची टक्केवारी गेल्या पाच वर्षांत प्रथमच ६२ टक्‍क्‍यांवर गेली आहे.

खरीप हंगामात पीककर्जासाठी २ लाख ६४ हजार ६९३ शेतकऱ्यांचे लक्ष्य होते. त्यापैकी १ लाख २३ हजार ६८१ शेतकरी कर्जासाठी पात्र ठरले. कोरोना संक्रमणामुळे कर्जप्रकरणे बँकांकडे पाठवताना सहकार विभागाकडून विलंब झाला.

अमरावतीतील पीककर्ज स्थिती

 •     १ लाख २३ हजार ६८१  शेतकऱ्यांना कर्ज 
 •     १ लाख ४१ हजार १२ शेतकरी कर्जापासून वंचित
 •     खरिपासाठी १ हजार ७२० कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्य
 •     १ हजार ७३ कोटी रुपयांचे कर्जवाटप
 •     सरकारी बँकांकडून ६९ हजार २१ शेतकऱ्यांना ६७६ कोटी ७० लाखांचे कर्ज
 •     खासगी बँकांकडून १ हजार ५१८ शेतकऱ्यांना ३६ कोटी २३ लाखांचे कर्ज
 •     ग्रामीण बँकांकडून १ हजार ३९४ शेतकऱ्यांना १६ कोटी ५५ लाखांचे कर्ज 
 •     डीसीसीकडून ५१ हजार ७४८ शेतकऱ्यांना ३४४ कोटी ४६ लाखांचे कर्ज
 •      कर्जवाटपाची एकूण सरासरी ६२ टक्के
English Headline: 
Agriculture news in marathi More than one lakh farmers are deprived of crop loans
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
कोरोना corona खरीप मात mate पीककर्ज कर्ज अमरावती विभाग sections कर्जमाफी वर्षा varsha सरकार government
Search Functional Tags: 
कोरोना, Corona, खरीप, मात, mate, पीककर्ज, कर्ज, अमरावती, विभाग, Sections, कर्जमाफी, वर्षा, Varsha, सरकार, Government
Twitter Publish: 
Meta Keyword: 
लाखाहून अधिक शेतकरी पीक कर्जापासून वंचित More than one lakh farmers are deprived of crop loans
Meta Description: 
More than one lakh farmers are deprived of crop loans
कोरोना संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर खरीप हंगामात पीककर्जासाठी बँकांच्या चकरा मारून, त्रास सहन करीत जिल्ह्यातील १ लाख २३ हजार ६८१  शेतकऱ्यांना कर्ज मिळू शकले, तर १ लाख ४१ हजार १२ शेतकरी कर्जापासून वंचित राहिले आहेत.Source link

Leave a Comment

X