लाल कांद्याला उन्हाळच्या  तुलनेत मिळतोय अधिकभाव 

नाशिक : दिवाळीनंतर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या आवकेने आवार पुन्हा गजबजले आहेत. तुलनेत उन्हाळ कांद्याची आवक टिकून तर खरीप लाल कांद्याची आवक चालू नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत अगदी नगण्य होत असल्याची स्थिती आहे. मात्र दराच्या अनुषंगाने उन्हाळच्या तुलनेत लाल कांद्याला मागणी वाढती असल्याने त्यास अधिक दर मिळत आहे. 

            चालू वर्षी अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादक पट्ट्यात प्रामुख्याने नांदगाव, चांदवड, देवळा व येवला तालुक्यांतील अनेक शेतकऱ्यांच्या खरीप कांद्याच्या रोपवाटिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. परिणामी दर वर्षी प्रमाणे अनेक शेतकऱ्यांच्या अपेक्षित कांदा लागवडी होऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळे आगाप लागवडीची आवक कमीच आहे. काही शेतकऱ्यांनी पुन्हा रोपे तयार करून लागवडी केल्या; मात्र हे पीक लांबणीवर गेले आहे. लाल कांद्याची आवक कमी तर उन्हाळ कांद्याची आवक प्रमुख बाजार समित्यांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत टिकून आहे. 

   जिल्ह्यातील प्रमुख असलेल्या पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील वर्षी १४ ऑक्टोबरपासून नवीन खरीप लाल कांद्याची आवक सुरू झाली होती. तर चालू वर्षी ही आवक २२ नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. त्यामुळे जवळपास एक महिना उशिराने आवक या वर्षी आहे. 
शुक्रवारी (ता.२६) रोजी उन्हाळ कांद्याची सरासरी आवक १२ हजार क्विंटल इतकी होत असताना लाल कांद्याची आवक ही १,२९२ क्विंटल झाली. गेल्या सप्ताहापासून त्यात वाढ होत आहे. उन्हाळ कांद्याला प्रति क्विंटलला सरासरी १,७७५ रुपये तर खरीप लाल कांद्याला २,३५१ रुपये दर मिळाला. मात्र तरीही मागील वर्षीच्या तुलनेत लाल कांद्याचे दर कमी आहेत. 

      लासलगाव बाजार समितीत ४ ऑक्टोबरपासून सुरू नवीन खरीप कांद्याची आवक सुरू झाली. मागील महिन्यात उन्हाळ कांद्याची आवक १५ हजार क्विंटल असताना अवघ्या १,०० क्विंटलवर ही आवक होती. त्यावेळी दोन्ही कांद्याचे दर सारखेच राहिले. मात्र चालू महिन्यात उन्हाळ कांद्याची आवक ६० टक्के कमी झाली आहे. गुरुवारी (ता.२५) रोजी उन्हाळ कांद्याची आवक ४ हजार ५०० क्विंटल तर लाल खरीप कांद्याची आवक २०० क्विंटल झाली. त्यास अनुक्रमे सरासरी दर १,८०० ते २,२०० रुपये असा सरासरी दर राहिला. 
 
दराची स्थिती… उन्हाळ कांदा…खरीप कांदा (ता.२७) 
पिंपळगाव बसवंत…१९००….२७०० 
लासलगाव…१८००…२२०० 
चांदवड…१६००…२२०० 
नांदगाव…१६००…१५०० 

प्रतिक्रिया: 
चालू वर्षी आगाप खरीप कांद्याची आवक कमी झालेली आहे. अजूनही उन्हाळ कांद्याची आवक टिकून आहे. मात्र प्रतवारी गुणवत्तेची नाही. त्यात काही खरेदीदारांकडून बीजोत्पादन करण्यासाठी नव्या खरीप कांद्याची मागणी होत असल्याचे दर उंचावत आहेत. 
-मनोज जैन, कांदा व्यापारी व निर्यातदार, लासलगाव, ता. निफाड 

प्रतिक्रिया: 
सध्या लाल कांद्याला मागणी वाढती आहे. तुलनेत उन्हाळ कांद्याची मागणी कमी आहे. लाल कांद्याची आवक कमी असल्याने पश्चिम बंगाल, आसाम राज्यात चांगली मागणी असल्याने उन्हाळ कांद्याच्या तुलनेत लाल कांद्याला दर अधिक आहे. 
-सुनील ठक्कर, कांदा व्यापारी, पिंपळगाव बसवंत, ता. निफाड

News Item ID: 
820-news_story-1638026874-awsecm-474
Mobile Device Headline: 
लाल कांद्याला उन्हाळच्या  तुलनेत मिळतोय अधिकभाव 
Appearance Status Tags: 
Mukhya News
Summer red onions Comparison is getting higher priceSummer red onions Comparison is getting higher price
Mobile Body: 

नाशिक : दिवाळीनंतर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या आवकेने आवार पुन्हा गजबजले आहेत. तुलनेत उन्हाळ कांद्याची आवक टिकून तर खरीप लाल कांद्याची आवक चालू नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत अगदी नगण्य होत असल्याची स्थिती आहे. मात्र दराच्या अनुषंगाने उन्हाळच्या तुलनेत लाल कांद्याला मागणी वाढती असल्याने त्यास अधिक दर मिळत आहे. 

            चालू वर्षी अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादक पट्ट्यात प्रामुख्याने नांदगाव, चांदवड, देवळा व येवला तालुक्यांतील अनेक शेतकऱ्यांच्या खरीप कांद्याच्या रोपवाटिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. परिणामी दर वर्षी प्रमाणे अनेक शेतकऱ्यांच्या अपेक्षित कांदा लागवडी होऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळे आगाप लागवडीची आवक कमीच आहे. काही शेतकऱ्यांनी पुन्हा रोपे तयार करून लागवडी केल्या; मात्र हे पीक लांबणीवर गेले आहे. लाल कांद्याची आवक कमी तर उन्हाळ कांद्याची आवक प्रमुख बाजार समित्यांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत टिकून आहे. 

   जिल्ह्यातील प्रमुख असलेल्या पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील वर्षी १४ ऑक्टोबरपासून नवीन खरीप लाल कांद्याची आवक सुरू झाली होती. तर चालू वर्षी ही आवक २२ नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. त्यामुळे जवळपास एक महिना उशिराने आवक या वर्षी आहे. 
शुक्रवारी (ता.२६) रोजी उन्हाळ कांद्याची सरासरी आवक १२ हजार क्विंटल इतकी होत असताना लाल कांद्याची आवक ही १,२९२ क्विंटल झाली. गेल्या सप्ताहापासून त्यात वाढ होत आहे. उन्हाळ कांद्याला प्रति क्विंटलला सरासरी १,७७५ रुपये तर खरीप लाल कांद्याला २,३५१ रुपये दर मिळाला. मात्र तरीही मागील वर्षीच्या तुलनेत लाल कांद्याचे दर कमी आहेत. 

      लासलगाव बाजार समितीत ४ ऑक्टोबरपासून सुरू नवीन खरीप कांद्याची आवक सुरू झाली. मागील महिन्यात उन्हाळ कांद्याची आवक १५ हजार क्विंटल असताना अवघ्या १,०० क्विंटलवर ही आवक होती. त्यावेळी दोन्ही कांद्याचे दर सारखेच राहिले. मात्र चालू महिन्यात उन्हाळ कांद्याची आवक ६० टक्के कमी झाली आहे. गुरुवारी (ता.२५) रोजी उन्हाळ कांद्याची आवक ४ हजार ५०० क्विंटल तर लाल खरीप कांद्याची आवक २०० क्विंटल झाली. त्यास अनुक्रमे सरासरी दर १,८०० ते २,२०० रुपये असा सरासरी दर राहिला. 
 
दराची स्थिती… उन्हाळ कांदा…खरीप कांदा (ता.२७) 
पिंपळगाव बसवंत…१९००….२७०० 
लासलगाव…१८००…२२०० 
चांदवड…१६००…२२०० 
नांदगाव…१६००…१५०० 

प्रतिक्रिया: 
चालू वर्षी आगाप खरीप कांद्याची आवक कमी झालेली आहे. अजूनही उन्हाळ कांद्याची आवक टिकून आहे. मात्र प्रतवारी गुणवत्तेची नाही. त्यात काही खरेदीदारांकडून बीजोत्पादन करण्यासाठी नव्या खरीप कांद्याची मागणी होत असल्याचे दर उंचावत आहेत. 
-मनोज जैन, कांदा व्यापारी व निर्यातदार, लासलगाव, ता. निफाड 

प्रतिक्रिया: 
सध्या लाल कांद्याला मागणी वाढती आहे. तुलनेत उन्हाळ कांद्याची मागणी कमी आहे. लाल कांद्याची आवक कमी असल्याने पश्चिम बंगाल, आसाम राज्यात चांगली मागणी असल्याने उन्हाळ कांद्याच्या तुलनेत लाल कांद्याला दर अधिक आहे. 
-सुनील ठक्कर, कांदा व्यापारी, पिंपळगाव बसवंत, ता. निफाड

English Headline: 
Agriculture News in Marathi Summer red onions Comparison is getting higher price
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
दिवाळी उत्पन्न खरीप अतिवृष्टी आग बाजार समिती agriculture market committee बीजोत्पादन seed production जैन व्यापार निफाड niphad पश्चिम बंगाल आसाम
Search Functional Tags: 
दिवाळी, उत्पन्न, खरीप, अतिवृष्टी, आग, बाजार समिती, agriculture Market Committee, बीजोत्पादन, Seed Production, जैन, व्यापार, निफाड, Niphad, पश्चिम बंगाल, आसाम
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Summer red onions Comparison is getting higher price
Meta Description: 
Summer red onions
Comparison is getting higher price
दिवाळीनंतर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या आवकेने आवार पुन्हा गजबजले आहेत. तुलनेत उन्हाळ कांद्याची आवक टिकून तर खरीप लाल कांद्याची आवक चालू नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत अगदी नगण्य होत असल्याची स्थिती आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment