लॉकडाऊन ५.० अर्थात अनलॉक १.० काय आहे? वाचा..!


नवी दिल्ली। देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला  आहे. त्या (Lockdown Extension) पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून देशातील कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन ३० जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयांकडून याचे दिशानिर्देश जारी करण्यात आले आहे.  (Lockdown 5.0 Rules Regulation)

या गाईडलाईननुसार कंटेन्मेंट झोनच्या बाहेर केंद्र सरकारकडून शिथीलता देण्यात आली आहे. येत्या १ जूनपासून ३० जूनपर्यंत या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. या नव्या गाईडलाईन्सला अनलॉक १.० असे नाव देण्यात आले आहे. या गाईडलाईन्स नुसार प्रत्येकाला मास्क वापराची सक्ती करण्यात आली आहे. त्याशिवाय सोशल डिस्टन्सिंग पाळणे सक्तीचे करण्यात आले आहे.

केंद्र सरकारकडून नवीन नियम जारी करण्यात आले आहेत. या लॉकडाऊनमध्ये (Lockdown 5.0 Rules Regulation) अनेक नियम शिथील करण्यात आले आहे. प्रतिबंधित भाग सोडून इतर भागात प्रार्थना स्थळ, हाॅटेल, रेस्टाॅरंट सुरु होणार आहे. या विविध नियमाचं पालन करून पुढील गोष्टी सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. येत्या ८ जूनपासून या सर्व गोष्टी सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

नव्या गाईड लाईन्स काय?

 1. कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाऊन कायम असणार
 2. कंटेनमेंट झोनमध्ये 1 जून ते 30 जूनपर्यंत लॉकडाऊन
 3. रेड झोन बाहेर 8 जूनपासून मंदीर, मशिद, धार्मिक स्थळं उघडणार
 4. रेड झोन बाहेर 8 जूनपासून रेस्टॉरंट, हॉटेल्सही उघडणार
 5. रेड झोन बाहेर  8 जूनपासून शॉपिंग मॉल्सही उघडण्याची परवानगी
 6. राज्यांतर्गत वा राज्या-राज्यात सर्व दळणवळणावर बंदी नाही
 7. कसलीही परवानगी, मंजुरी व ई-परमिटची गरज नाही
 8. दळणवळणासंबंधी राज्यांना अंतिम निर्णयाचे अधिकार
 9. प्रतिबंधित क्षेत्रे राज्यांनी ठरवावी
 10. प्रतिबंधित क्षेत्रात फक्त अत्यावश्यक सेवा सुरु
 11. शाळा सुरु करण्यासंबंधी जुलैमध्ये निर्णय, राज्यांशी चर्चा करुन शाळांबाबत निर्णय घेणार
 12. सार्वजनिक ठिकाणी 6 फूट अंतर राखणं बंधनकारक. दुकानांमध्ये हे अंतर राखण्याची जबाबदारी दुकानदारांची. एका वेळी 5 लोकांनाच दुकानात प्रवेश द्यावा. 
 13. लग्न समारंभात केवळ 50 लोकांनाच बोलवता येणार तर अंत्यसंस्कारांसाठी केवळ 20 लोकांनाच बोलवता येणार
 14. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यावर राज्य सरकार दंड आकारणार. 
 15. सार्वजिक ठिकाणी दारू, पान, गुटखा, तंबाखू खाण्यावर बंदी. 
 16. शक्य असेल तर घरूनच काम करा. 
 17. एका वेळी ऑफिसांत किंवा दुकानांत किंवा कारखान्यात गर्दी होऊ नये म्हणून तासांनुसार माणसांचं विकेंद्रीकरण करा. 
 18. रात्रीच्या कर्फ्यूची वेळ बदलली. आता रात्री 9 ते सकाळी 5 पर्यंत कर्फ्यू. 

राजकीय, सांस्कृतिक तसंच कोणत्याही स्वरुपाच्या कार्यक्रमाला परवानी देण्यात आलेली नाही. दुसऱ्या टप्प्यात शाळा-महाविद्यालयं, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लास हे सुरू करण्याबाबत राज्य सरकारांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असं स्पष्ट करण्यात आलं आहे. ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.  

Previous articleमोदी सरकार कडून शेतकऱ्यांना मिळणार मोठी कर्जमाफी; १ लाख कोटींच कर्ज होणार माफ?

Source link

Leave a Comment

X