[ad_1]
नगर ः पारनेर तालुक्यात वन विभागाने केलेल्या गॅबियन बंधाऱ्यांच्या कामात भ्रष्टाचार झाला आहे. यातील दोषी उपवनसंरक्षक रमेश देवखिळे व प्रताप जगताप यांची चौकशी करून त्यांना तत्काळ निलंबित करावे. त्यांचा सध्याचा व सेवानिवृत्तीनंतरचा पगार थांबवावा, अशी सूचना आमदार नीलेश लंके यांनी विधानसभेत मांडली. त्यावर आठ दिवसांत चौकशी करून कारवाई करू, असे आश्वासन वन विभागाचे राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी दिले.
पारनेर तालुक्यात वन विभागाने केलेल्या जलसंधारणाच्या कामात गैरव्यवहार झाल्याची तक्रार लंके यांनी केली होती. त्यानंतर ज्या कामाची तक्रार केली, त्या कामावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून पुरावे दिले. गुरुवारी (ता.२४) या गैरव्यवहारप्रकरणी लंके विधानसभेत चांगलेच आक्रमक झाले.
लंके म्हणाले, ‘‘सहा महिन्यांपासून मी या बाबत तक्रार करूनही संबंधित विभाग मात्र दुर्लक्ष करत आहे. दोनही अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.’’
विधानसभेत काही काळ गोंधळही झाला. येत्या आठ दिवसांत नाशिक प्रादेशिक वनसंरक्षक अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमून तातडीने कारवाईचे आश्वासन भरणे यांनी दिले. वन विभागाने जिल्हास्तरीय बिगर आदिवासी योजनेंतर्गत तालुक्यात वाळवणे, रुई, पळवे या ठिकाणी मृद व जलसंधारणाची कामे केली आहेत. त्यात लाखोंचा गैरव्यवहार झाला आहे. या बाबतची तक्रार लंके यांनी यापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती.
सूचनेवर वनमंत्र्यांनी येत्या आठ दिवसांत चौकशी करून संबंधितांवर कारवाईचे आश्वासन दिले. असे झाले नाही, तर वनमंत्र्यांच्या दालनात धरणे आंदोलन करू.
– नीलेश लंके, आमदार.

[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.