Take a fresh look at your lifestyle.

वर्धा जिल्ह्याचा सिंचन आराखडा निश्चित

0

वर्धा : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे प्रयत्न केले जात आहे. जिल्ह्यात १ लाख १४ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणल्या जाणार आहे. यासाठी तालुकानिहाय सिंचन आराखडा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत निश्चित करण्यात आला.

जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी सर्व संबंधित विभागांची विशेष आढावा बैठक नुकतीच घेतली. बैठकीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, निम्न वर्धा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता रवी वऱ्हाडे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सी. ससाने, पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता नीतू चव्हाण, आत्माच्या प्रकल्प संचालक डॉ. विद्या मानकर आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून दिल्यास कृषी उत्पादन वाढून शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. बैठकीत चर्चेनंतर जिल्ह्याचा सिंचन आराखडा निश्चित करण्यात आला. या आराखड्याप्रमाणे जिल्ह्यात १ लाख १४ हजार हेक्टर क्षेत्र प्रत्यक्ष सिंचनाखाली येणार आहे. 

सिंचन आराखड्याप्रमाणे तालुकानिहाय सिंचनाखाली येणाऱ्या क्षेत्रामध्ये वर्धा तालुका १६ हजार ५७१ हेक्टर, सेलू २० हजार ५८० हेक्टर, देवळी ३३ हजार ९९७ हेक्टर, आर्वी  १४ हजार  ७८२ हेक्टर, आष्टी ९ हजार ५१६ हेक्टर, कारंजा ३ हजार २८ हेक्टर, हिंगणघाट ७ हजार ९८० हेक्टर तर समुद्रपूर तालुक्यात ८ हजार ८२ हेक्टर प्रत्यक्ष सिंचनाखाली येणार आहे. जिल्ह्यातील मोठे, मध्यम, लघु  प्रकल्प तसेच लघु पाटबंधारे योजना, कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे, साठवण तलाव, सिमेंट नाला बांधकाम या सर्व प्रकल्पाची उपलब्ध सिंचन क्षमता ओलीतासाठी वापरण्यात येणार आहे.

विहिरींमधून ४५ हजार हेक्टर ओलीत
सिंचनासाठी सुलभ पर्याय म्हणून आजही मोठ्या प्रमाणावर विहिरींचा वापर केल्या जातो. जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे आजमितीस सिंचनासाठी ४५ हजार इतक्या विहिरी आहेत. एका विहिरीमधून सरासरी १ हेक्टर इतके क्षेत्र ओलीत केल्या जाते. याप्रमाणे विहिरींमधून ४५ हजार हेक्टर क्षेत्र ओलीताखाली आणले जाते. जिल्ह्यात सर्वाधिक ७ हजार ९४० विहीरी हिंगणघाट तालुक्यात आहे.

News Item ID: 
820-news_story-1636981738-awsecm-736
Mobile Device Headline: 
वर्धा जिल्ह्याचा सिंचन आराखडा निश्चित
Appearance Status Tags: 
Section News
Irrigation plan of Wardha district fixedIrrigation plan of Wardha district fixed
Mobile Body: 

वर्धा : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे प्रयत्न केले जात आहे. जिल्ह्यात १ लाख १४ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणल्या जाणार आहे. यासाठी तालुकानिहाय सिंचन आराखडा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत निश्चित करण्यात आला.

जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी सर्व संबंधित विभागांची विशेष आढावा बैठक नुकतीच घेतली. बैठकीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, निम्न वर्धा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता रवी वऱ्हाडे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सी. ससाने, पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता नीतू चव्हाण, आत्माच्या प्रकल्प संचालक डॉ. विद्या मानकर आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून दिल्यास कृषी उत्पादन वाढून शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. बैठकीत चर्चेनंतर जिल्ह्याचा सिंचन आराखडा निश्चित करण्यात आला. या आराखड्याप्रमाणे जिल्ह्यात १ लाख १४ हजार हेक्टर क्षेत्र प्रत्यक्ष सिंचनाखाली येणार आहे. 

सिंचन आराखड्याप्रमाणे तालुकानिहाय सिंचनाखाली येणाऱ्या क्षेत्रामध्ये वर्धा तालुका १६ हजार ५७१ हेक्टर, सेलू २० हजार ५८० हेक्टर, देवळी ३३ हजार ९९७ हेक्टर, आर्वी  १४ हजार  ७८२ हेक्टर, आष्टी ९ हजार ५१६ हेक्टर, कारंजा ३ हजार २८ हेक्टर, हिंगणघाट ७ हजार ९८० हेक्टर तर समुद्रपूर तालुक्यात ८ हजार ८२ हेक्टर प्रत्यक्ष सिंचनाखाली येणार आहे. जिल्ह्यातील मोठे, मध्यम, लघु  प्रकल्प तसेच लघु पाटबंधारे योजना, कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे, साठवण तलाव, सिमेंट नाला बांधकाम या सर्व प्रकल्पाची उपलब्ध सिंचन क्षमता ओलीतासाठी वापरण्यात येणार आहे.

विहिरींमधून ४५ हजार हेक्टर ओलीत
सिंचनासाठी सुलभ पर्याय म्हणून आजही मोठ्या प्रमाणावर विहिरींचा वापर केल्या जातो. जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे आजमितीस सिंचनासाठी ४५ हजार इतक्या विहिरी आहेत. एका विहिरीमधून सरासरी १ हेक्टर इतके क्षेत्र ओलीत केल्या जाते. याप्रमाणे विहिरींमधून ४५ हजार हेक्टर क्षेत्र ओलीताखाली आणले जाते. जिल्ह्यात सर्वाधिक ७ हजार ९४० विहीरी हिंगणघाट तालुक्यात आहे.

English Headline: 
Agriculture news in Marathi Irrigation plan of Wardha district fixed
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
उत्पन्न सिंचन विभाग sections जलसंपदा विभाग
Search Functional Tags: 
उत्पन्न, सिंचन, विभाग, Sections, जलसंपदा विभाग
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Irrigation plan of Wardha district fixed
Meta Description: 
Irrigation plan of Wardha district fixed
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे प्रयत्न केले जात आहे. जिल्ह्यात १ लाख १४ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणल्या जाणार आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

X