वर्धा : बाजार समित्यांचा ई-नाम मध्ये समावेश

वर्धा : जिल्ह्यातील वर्धा, सिंदी, हिंगणघाट व आर्वी कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा समावेश करण्यात आला आहे. योजने अंतर्गत कृषी मालाचे ई-ऑक्शन होणार असून त्यासाठी या समित्यांना अत्याधुनिक साहित्यांचा पुरवठा करण्यात आला आहे. शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या या योजनेची व्यापक अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिले आहे.

केंद्र शासनाच्या वतीने ई-नाम ही योजना सुरू करण्यात आली असून राज्यातही ती मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत बाजार समित्यांमध्ये प्राप्त होणाऱ्या शेतकऱ्यांच्या कृषी मालाची ऑनलाइन नोंदणी बाजार समितीच्या प्रवेशाच्या वेळीच घेतली जाते. प्रवेशाच्या वेळीच शेतकऱ्यांच्या मालाला लॉट नंबर दिला जातो. यामध्ये कोणत्या शेतकऱ्याचा कोणता आणि किती माल विक्रीस असणार आहे. याचा उल्लेख केला जातो. त्याप्रमाणे शेतक-याचे कृषी मालाचे लॉट ऑनलाइन ई-नाम प्रणालीवर विक्रीस उपलब्ध करून दिल्या जाते. 

बाजार समितीतील खरेदीदार व्यापारी ऑनलाइन दर नोंदवितात. ज्या व्यापाऱ्याचे दर अधिक असतात त्या व्यापाऱ्यास सदर लॉट विकल्या जातो. यामध्ये शेतकऱ्याचे देणे सुद्धा ऑनलाइन देण्याची सुद्धा सुविधा आहे. या योजनेसाठी वर्धा, सिंदी, हिंगणघाट व आर्वी या कृषी उत्पन्न बाजार समित्यांची  निवड झाली आहे. या समित्यांना ई-ऑक्शनसाठी संगणक, यूपीएस, टॅबलेट, प्रिंटर, प्रतवारी साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. या योजनेमुळे चार बाजार समित्यांमधील शेतकऱ्यांच्या कृषी मालाच्या खरेदी विक्रीचे व्यवहार अधिक पारदर्शक व गतिमान होणार आहे. याचा शेतकरी व विक्रेते दोघांनाही लाभ होईल व वेळेची बचत होतील. 

वेगवेगळ्या कृषी मालाची प्रतवारी बाजार समितीच्या आवारात नियुक्त असलेल्या ग्रेडरकडून केली जाते. प्रतवारीसाठी या योजनेअंतर्गत या चार बाजार समित्यांमध्ये लॅबची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये मालाची आद्रता तसेच धान्याची प्रतवारी करण्याच्या यंत्रांचा समावेश आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची ही हिताची योजना चारही बाजार समित्यांमध्ये चांगल्या पद्धतीने राबविण्याचे निर्देश दिले आहे.

News Item ID: 
820-news_story-1636981966-awsecm-237
Mobile Device Headline: 
वर्धा : बाजार समित्यांचा ई-नाम मध्ये समावेश
Appearance Status Tags: 
Section News
Inclusion of market committees in e-namInclusion of market committees in e-nam
Mobile Body: 

वर्धा : जिल्ह्यातील वर्धा, सिंदी, हिंगणघाट व आर्वी कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा समावेश करण्यात आला आहे. योजने अंतर्गत कृषी मालाचे ई-ऑक्शन होणार असून त्यासाठी या समित्यांना अत्याधुनिक साहित्यांचा पुरवठा करण्यात आला आहे. शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या या योजनेची व्यापक अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिले आहे.

केंद्र शासनाच्या वतीने ई-नाम ही योजना सुरू करण्यात आली असून राज्यातही ती मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत बाजार समित्यांमध्ये प्राप्त होणाऱ्या शेतकऱ्यांच्या कृषी मालाची ऑनलाइन नोंदणी बाजार समितीच्या प्रवेशाच्या वेळीच घेतली जाते. प्रवेशाच्या वेळीच शेतकऱ्यांच्या मालाला लॉट नंबर दिला जातो. यामध्ये कोणत्या शेतकऱ्याचा कोणता आणि किती माल विक्रीस असणार आहे. याचा उल्लेख केला जातो. त्याप्रमाणे शेतक-याचे कृषी मालाचे लॉट ऑनलाइन ई-नाम प्रणालीवर विक्रीस उपलब्ध करून दिल्या जाते. 

बाजार समितीतील खरेदीदार व्यापारी ऑनलाइन दर नोंदवितात. ज्या व्यापाऱ्याचे दर अधिक असतात त्या व्यापाऱ्यास सदर लॉट विकल्या जातो. यामध्ये शेतकऱ्याचे देणे सुद्धा ऑनलाइन देण्याची सुद्धा सुविधा आहे. या योजनेसाठी वर्धा, सिंदी, हिंगणघाट व आर्वी या कृषी उत्पन्न बाजार समित्यांची  निवड झाली आहे. या समित्यांना ई-ऑक्शनसाठी संगणक, यूपीएस, टॅबलेट, प्रिंटर, प्रतवारी साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. या योजनेमुळे चार बाजार समित्यांमधील शेतकऱ्यांच्या कृषी मालाच्या खरेदी विक्रीचे व्यवहार अधिक पारदर्शक व गतिमान होणार आहे. याचा शेतकरी व विक्रेते दोघांनाही लाभ होईल व वेळेची बचत होतील. 

वेगवेगळ्या कृषी मालाची प्रतवारी बाजार समितीच्या आवारात नियुक्त असलेल्या ग्रेडरकडून केली जाते. प्रतवारीसाठी या योजनेअंतर्गत या चार बाजार समित्यांमध्ये लॅबची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये मालाची आद्रता तसेच धान्याची प्रतवारी करण्याच्या यंत्रांचा समावेश आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची ही हिताची योजना चारही बाजार समित्यांमध्ये चांगल्या पद्धतीने राबविण्याचे निर्देश दिले आहे.

English Headline: 
Agriculture news in Marathi Inclusion of market committees in e-nam
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
उत्पन्न साहित्य literature ई-नाम e-nam बाजार समिती agriculture market committee व्यापार यंत्र machine
Search Functional Tags: 
उत्पन्न, साहित्य, Literature, ई-नाम, e-NAM, बाजार समिती, agriculture Market Committee, व्यापार, यंत्र, Machine
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Inclusion of market committees in e-nam
Meta Description: 
Inclusion of market committees in e-nam
जिल्ह्यातील वर्धा, सिंदी, हिंगणघाट व आर्वी कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा समावेश करण्यात आला आहे. योजने अंतर्गत कृषी मालाचे ई-ऑक्शन होणार असून त्यासाठी या समित्यांना अत्याधुनिक साहित्यांचा पुरवठा करण्यात आला आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X