वर्ष संपायला आले तरी पीकविम्याचा लाभ मिळेना

अकोला ः अतिवृष्टी, संततधार पावसाने यंदाच्या हंगामातील मूग, उडदाचे पीक १०० टक्के शेतकऱ्यांच्या हातातून गेले आहे. या शेतकऱ्यांना डिसेंबर महिना संपायला आला तरी अद्याप पीकविम्याचा एक छदामही मिळालेला नसल्याचे समोर आले आहे. ही नुकसानभरपाई कधी मिळेल? अशी विचारणा शेतकरी यंत्रणांकडे करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, यावर्षी मूग आणि उडदाचे पीक पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातून गेले. जिल्ह्यात सुमारे ३३ हजार हेक्टर मूग आणि १८ हजार हेक्टरवर उडिदाची लागवड झाली होती. यापैकी बहुतांश क्षेत्राचा पीकविमा उतरविण्यात आलेला आहे. या शेतकऱ्यांना पीकविमा १०० टक्के मिळणे अपेक्षित आहे.  आजवर मात्र काहीही हातात आलेले नाही. मध्यंतरी पीक नुकसानीची २५ टक्के भरपाई म्हणून ६८ कोटी रुपये मिळाले होते. ही रक्कम १ लाख सात हजार शेतकऱ्यांना वितरीत केल्या गेली. जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी याबाबत केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्यात पहिल्यांदा अकोला जिल्ह्याने अशा प्रकारचा प्रस्ताव पाठवला होता. त्यानंतर ही रक्कम मिळाली होती. यामध्ये मूग, उडीद उत्पादकांचा समावेश नव्हता. मूग उडदाच्या सुमारे ५० हजार हेक्टर क्षेत्राला संपूर्ण नुकसान भरपाईमुळे मदतीची शेतकरी अपेक्षा बाळगून आहेत. ही मदत कधी मिळेल याचे उत्तर कुठलाही अधिकारी मात्र, द्यायला तयार नाही.

या हंगामात लागवड केलेल्या उडीद पिकाचे १०० टक्के नुकसान झाल्याने एकही रुपयाचा खर्च निघाला नव्हता. याबाबत कृषी विभाग, विमा कंपनीकडे कळवलेले आहे. अद्याप मदत आलेली नाही. आम्ही चौकशी करून थकलो.- सारंगधर मोतीराम बोदडे, तळेगाव बाजार, तेल्हारा  जि. अकोला

मी १० एकरांचा मूग, उडदासाठी पीकविमा काढला होता. पावसामुळे पीक हातातून गेले. पुराच्या पाण्यातही पीक खरडले होते. यंदा मूग, उडदाचे काहीही उत्पादन आलेले नाही. त्यामुळे मदतीची अपेक्षा बाळगून आहोत.
– ज्ञानेश्‍वर वाघोडे, सांगवी हिवरे, ता. तेल्हारा, जि. अकोला

News Item ID: 
820-news_story-1640699232-awsecm-259
Mobile Device Headline: 
वर्ष संपायला आले तरी पीकविम्याचा लाभ मिळेना
Appearance Status Tags: 
Mukhya News
Even though the year came to an end, I did not get the benefit of crop insuranceEven though the year came to an end, I did not get the benefit of crop insurance
Mobile Body: 

अकोला ः अतिवृष्टी, संततधार पावसाने यंदाच्या हंगामातील मूग, उडदाचे पीक १०० टक्के शेतकऱ्यांच्या हातातून गेले आहे. या शेतकऱ्यांना डिसेंबर महिना संपायला आला तरी अद्याप पीकविम्याचा एक छदामही मिळालेला नसल्याचे समोर आले आहे. ही नुकसानभरपाई कधी मिळेल? अशी विचारणा शेतकरी यंत्रणांकडे करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, यावर्षी मूग आणि उडदाचे पीक पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातून गेले. जिल्ह्यात सुमारे ३३ हजार हेक्टर मूग आणि १८ हजार हेक्टरवर उडिदाची लागवड झाली होती. यापैकी बहुतांश क्षेत्राचा पीकविमा उतरविण्यात आलेला आहे. या शेतकऱ्यांना पीकविमा १०० टक्के मिळणे अपेक्षित आहे.  आजवर मात्र काहीही हातात आलेले नाही. मध्यंतरी पीक नुकसानीची २५ टक्के भरपाई म्हणून ६८ कोटी रुपये मिळाले होते. ही रक्कम १ लाख सात हजार शेतकऱ्यांना वितरीत केल्या गेली. जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी याबाबत केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्यात पहिल्यांदा अकोला जिल्ह्याने अशा प्रकारचा प्रस्ताव पाठवला होता. त्यानंतर ही रक्कम मिळाली होती. यामध्ये मूग, उडीद उत्पादकांचा समावेश नव्हता. मूग उडदाच्या सुमारे ५० हजार हेक्टर क्षेत्राला संपूर्ण नुकसान भरपाईमुळे मदतीची शेतकरी अपेक्षा बाळगून आहेत. ही मदत कधी मिळेल याचे उत्तर कुठलाही अधिकारी मात्र, द्यायला तयार नाही.

या हंगामात लागवड केलेल्या उडीद पिकाचे १०० टक्के नुकसान झाल्याने एकही रुपयाचा खर्च निघाला नव्हता. याबाबत कृषी विभाग, विमा कंपनीकडे कळवलेले आहे. अद्याप मदत आलेली नाही. आम्ही चौकशी करून थकलो.- सारंगधर मोतीराम बोदडे, तळेगाव बाजार, तेल्हारा  जि. अकोला

मी १० एकरांचा मूग, उडदासाठी पीकविमा काढला होता. पावसामुळे पीक हातातून गेले. पुराच्या पाण्यातही पीक खरडले होते. यंदा मूग, उडदाचे काहीही उत्पादन आलेले नाही. त्यामुळे मदतीची अपेक्षा बाळगून आहोत.
– ज्ञानेश्‍वर वाघोडे, सांगवी हिवरे, ता. तेल्हारा, जि. अकोला

English Headline: 
Agriculture news in Marathi Even though the year came to an end, I did not get the benefit of crop insurance
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
अकोला akola मूग संप उडीद मात mate कृषी विभाग agriculture department विभाग sections विमा कंपनी कंपनी company तळेगाव वाघ
Search Functional Tags: 
अकोला, Akola, मूग, संप, उडीद, मात, mate, कृषी विभाग, Agriculture Department, विभाग, Sections, विमा कंपनी, कंपनी, Company, तळेगाव, वाघ
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Even though the year came to an end, I did not get the benefit of crop insurance
Meta Description: 
Even though the year came to an end, I did not get the benefit of crop insurance
अतिवृष्टी, संततधार पावसाने यंदाच्या हंगामातील मूग, उडदाचे पीक १०० टक्के शेतकऱ्यांच्या हातातून गेले आहे. या शेतकऱ्यांना डिसेंबर महिना संपायला आला तरी अद्याप पीकविम्याचा एक छदामही मिळालेला नसल्याचे समोर आले आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment