Take a fresh look at your lifestyle.

वऱ्हाडात सोयाबीनची बाजारात हजारो क्विंटल आवक

0

अकोला ः वऱ्हाडातील सर्वच बाजार समित्यांमध्ये दररोज सोयाबीनची आवक वाढत आहे. सरासरी चार ते पाच हजारांदरम्यान दर मिळत आहे. वाशीम, खामगाव बाजार समित्यांमध्ये दर दिवसाला सात ते आठ हजार पोत्यांची आव आहे. अकोल्यातही दीड हजार पोत्यांवर आवक पोचली आहे. 

सध्या सोयाबीन काढणीला वेग आला आहे. तयार झालेला माल थेट बाजार समित्यांमध्ये येत आहे. यामुळे सोयाबीनमध्ये आर्द्रतेचे प्रमाणही २५ पर्यंत असल्याचे सांगितले जाते. या दर्जाचा माल चार हजारांपर्यंत विकला जात आहे. चांगल्या दर्जाच्या सोयाबीनला ४८०० ते ५१०० दरम्यान भाव मिळत आहे.
गेल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे नुकसान झाले. अनेकांचा शेतीमाल ओला झाला. आता पाऊस थांबल्यानंतर सोयाबीन मळणीने वेग घेतला.

तयार झालेले सोयाबीन अनेक जण तसेच विकून मोकळे होत आहेत. गावखेड्यात सोयाबीनची खरेदी ३५०० पासून ते ४५०० हजारांदरम्यान व्यापारी करीत आहेत. सोयाबीनमध्ये जितका ओलावा असेल, तितक्या प्रमाणात दर कमी होत आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी वाढलेले सोयाबीनचे दर पाच हजारांपर्यंत घसरले. त्यामुळे अनेक शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहेत. येत्या आठवड्यात सोयाबीनची आवक आणखी वाढेल. दिवाळीपूर्वीच बाजार सोयाबीनच्या पोत्यांनी भरू लागले आहेत. गुरुवारी (ता. २१) खामगाव बाजार समितीत जवळपास आठ हजार पोत्यांची आवक होती.

वाशीममध्ये बुधवारी (ता. २०) सोयाबीनची ७८९५ क्विंटलची उलाढाल झाली. अकोल्यात १९८० पोत्यांची आवक होऊन ४२०० ते ४९०० दरम्यान दर भेटला. कारंजा, मूर्तिजापूर, अकोट, चिखली, मेहकर, देऊळगावराजा, शेगाव, बाजार समित्यांमध्ये दररोज आवक वाढत आहे. 

News Item ID: 
820-news_story-1634822339-awsecm-1000
Mobile Device Headline: 
वऱ्हाडात सोयाबीनची बाजारात हजारो क्विंटल आवक
Appearance Status Tags: 
Section News
Thousands of quintals of soybeans in the marketThousands of quintals of soybeans in the market
Mobile Body: 

अकोला ः वऱ्हाडातील सर्वच बाजार समित्यांमध्ये दररोज सोयाबीनची आवक वाढत आहे. सरासरी चार ते पाच हजारांदरम्यान दर मिळत आहे. वाशीम, खामगाव बाजार समित्यांमध्ये दर दिवसाला सात ते आठ हजार पोत्यांची आव आहे. अकोल्यातही दीड हजार पोत्यांवर आवक पोचली आहे. 

सध्या सोयाबीन काढणीला वेग आला आहे. तयार झालेला माल थेट बाजार समित्यांमध्ये येत आहे. यामुळे सोयाबीनमध्ये आर्द्रतेचे प्रमाणही २५ पर्यंत असल्याचे सांगितले जाते. या दर्जाचा माल चार हजारांपर्यंत विकला जात आहे. चांगल्या दर्जाच्या सोयाबीनला ४८०० ते ५१०० दरम्यान भाव मिळत आहे.
गेल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे नुकसान झाले. अनेकांचा शेतीमाल ओला झाला. आता पाऊस थांबल्यानंतर सोयाबीन मळणीने वेग घेतला.

तयार झालेले सोयाबीन अनेक जण तसेच विकून मोकळे होत आहेत. गावखेड्यात सोयाबीनची खरेदी ३५०० पासून ते ४५०० हजारांदरम्यान व्यापारी करीत आहेत. सोयाबीनमध्ये जितका ओलावा असेल, तितक्या प्रमाणात दर कमी होत आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी वाढलेले सोयाबीनचे दर पाच हजारांपर्यंत घसरले. त्यामुळे अनेक शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहेत. येत्या आठवड्यात सोयाबीनची आवक आणखी वाढेल. दिवाळीपूर्वीच बाजार सोयाबीनच्या पोत्यांनी भरू लागले आहेत. गुरुवारी (ता. २१) खामगाव बाजार समितीत जवळपास आठ हजार पोत्यांची आवक होती.

वाशीममध्ये बुधवारी (ता. २०) सोयाबीनची ७८९५ क्विंटलची उलाढाल झाली. अकोल्यात १९८० पोत्यांची आवक होऊन ४२०० ते ४९०० दरम्यान दर भेटला. कारंजा, मूर्तिजापूर, अकोट, चिखली, मेहकर, देऊळगावराजा, शेगाव, बाजार समित्यांमध्ये दररोज आवक वाढत आहे. 

English Headline: 
Agriculture news in marathi, Thousands of quintals of soybeans in the market
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
सोयाबीन वाशीम खामगाव khamgaon अतिवृष्टी शेती farming ओला ऊस पाऊस व्यापार पूर floods दिवाळी बाजार समिती agriculture market committee अकोट
Search Functional Tags: 
सोयाबीन, वाशीम, खामगाव, Khamgaon, अतिवृष्टी, शेती, farming, ओला, ऊस, पाऊस, व्यापार, पूर, Floods, दिवाळी, बाजार समिती, agriculture Market Committee, अकोट
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Thousands of quintals of soybeans in the market
Meta Description: 
Thousands of quintals of soybeans in the market
अकोला ः वऱ्हाडातील सर्वच बाजार समित्यांमध्ये दररोज सोयाबीनची आवक वाढत आहे. सरासरी चार ते पाच हजारांदरम्यान दर मिळत आहे. वाशीम, खामगाव बाजार समित्यांमध्ये दर दिवसाला सात ते आठ हजार पोत्यांची आव आहे. अकोल्यातही दीड हजार पोत्यांवर आवक पोचली आहे. Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

X