Take a fresh look at your lifestyle.

वाघांनो, असं रडताय काय? मी आहे ना! बस् साहेबांचे आशीर्वाद आहेत – पंकजा मुंडेचे बंडखोरीचे संकेत

0


मुंबई। महाराष्ट्र भाजपने विधान परिषद निवडणुकीसाठी दिग्गजांना डावलून उमेदवार जाहीर केले आणि राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली.गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते-पाटील, प्रवीण दटके आणि डॉ. अजित गोपछडे यांना संधी देण्यात आली. भाजपकडून विधानपरिषदेसाठी पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांना संधी मिळेल अशी अटकळ बांधली जात असताना उमेदवारीच्या या निर्णयाने महाराष्ट्र भाजपमधील राजकारण चांगलेच तापले आहे.

यावर एकनाथ खडसे यांनी त्वरित माध्यमांकडे आपली नाराजी व्यक्त केली. तर, सुरवातीला बराच वेळ मौन बाळगलेल्या पंकजा मुंडे यांनी देखील रात्री उशिरा एक वाजण्याच्या सुमारास ट्वीट करून आपल्या नाराजीरूपी भावनांना वाट मोकळी करून दिली. पंकजा मुंडेनी या निर्णयाचा मला धक्का बसला नसल्याचे म्हणटले असले तरी केलेल्या ट्विट मधून त्यांची नाराजी स्पष्टपणे दिसून येत आहे. पंकजा मुंडे यांनी भाजपच्या नव्या उमेदवारांना ‘आशीर्वाद’ दिले असेल तरी यामध्ये नाराजीचा सूर अधिक आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय, “आईंना, ताईंना फोन करून दुःख व्यक्त करताय, ठीक आहे. पण वाघांनो, असं रडताय काय? मी आहे ना! ‘तुमच्यासाठी मी, आणि माझ्यासाठी तुम्ही’ बस साहेबांचे आशीर्वाद आहेत. दिवसभर फोन उचलले नाही, कुणाकुणाला उत्तर देऊ? या निर्णयाचा मला अजिबात धक्का बसला नाही. भाजपच्या ‘त्या’ चार ही उमेदवारांना आशीर्वाद!”

पंकजा मुंडे यांनी केवळ आपल्याला उमेदवारी न मिळाल्यानं नाराजी व्यक्त केली नाहीय, तर जाहीर झालेल्या उमेदवारांबाबतही नाराजी दर्शवलीय. ‘त्या चार उमेदवारांना’ असं म्हणत त्यांनी या नाराजीचे संकेत दिलेत. पंकजा मुंडे यांनी माध्यमांसमोर येत विस्तृत मत मांडलं नसलं, तरी त्यांच्या ट्वीटमधून त्यांची नाराजी प्रकर्षानं दिसून आलीय. याआधीही म्हणजे विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर पंकजा मुंडे यांनी स्वपक्षातील नेत्यांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता. त्यांच्या निशाण्यावर राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, हे आता लपून राहिलेलं नाही.

विधानसभा निवडणुकीनंतर पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये झालेल्या मेळाव्यात जाहीर नाराजी व्यक्त करत, पक्षासाठी काम करणार असल्याचं म्हटलं. मात्र, त्यानंतर त्या काहीशा अज्ञातवासातच गेल्या. पक्षाच्या बैठकींनाही त्या हजर नव्हत्या.Source link

X