वाशीम जिल्हा परिषदेवर  राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा

वाशीम : येथील जिल्हा परिषदेमध्ये चंद्रकांत ठाकरे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. नऊ महिन्यांपूर्वी ते या पदावरून पायउतार झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेस व शिवसेनेला सोबत घेऊन वाशीम जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा रोवला आहे. 

गेल्या महिन्यात झालेल्या पोटनिवडणुकीनंतर ३१ संख्याबळ झालेल्या महाविकास आघाडीची निर्विवाद सत्ता स्थापन होणे निश्‍चित होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव निघाल्यामुळे मिनी मंत्रालयात सत्ता स्थापनेच्या दिशेने एक आठवड्यापासून राजकीय हालचाली सुरू होत्या.
वाशीम जिल्हा परिषदेच्या ५२ आणि सहा पंचायत समितीमधील १०४ जागासाठी ७ जानेवारी २०२० रोजी निवडणूक झाली होती.

त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक १२ जागा जिंकून जिल्हा परिषदेत आपला दबदबा कायम ठेवला. त्या खालोखाल काँग्रेसने ९, शिवसेना ६, भाजप ७, वंचित ८, अपक्ष ३, जन विकास आघाडी ६ आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एका जागेवर विजय प्राप्त केला होता.

महाराष्ट्राच्या राजकारणात उदयास आलेल्या महाविकास आघाडीचा प्रयोग त्या वेळी वाशीम जिल्हा परिषदेत सुद्धा बघायला मिळाला. फार्म्यूल्याच्या आधारे त्या वेळी अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत ठाकरे, तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे डॉ. श्‍याम गाभणे यांची वर्णी लागली होती. महाविकास आघाडीच्या या टीमने सुमारे चौदा महिने जिल्हा परिषदेची सत्ता उपभोगली. दरम्यान, ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाने खारीज झालेल्या जिल्हा परिषदेच्या ओबीसी प्रवर्गातील १४ आणि पंचायत समितीमधील २७ जागांसाठी ऑक्टोबर २०२१ मध्ये निवडणूक पार पडली. त्यानंतर जिल्हा परिषदेत सध्या राष्ट्रवादी काँग्रेस १४, काँग्रेस ११, शिवसेना ६, भाजप ७, वंचित ६, जन विकास आघाडी ५, अपक्ष २ आणि स्वाभिमानी एक असे पक्षीय बलाबल झाले आहे.

अध्यक्षपदासाठी शुक्रवारी (ता. १९) निवडणूक प्रक्रिया 
राबवण्यात आली. अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून चंद्रकांत ठाकरे यांचा एकमेव अर्ज आला. निर्धारित वेळेनंतर पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत यांनी ठाकरे बिनविरोध निवडून आल्याची घोषणा केली. या वेळी जिल्हा परिषद सभागृहासमोर ठाकरे समर्थकांनी गुलाल उधळून व फटाके फोडून आनंद साजरा केला.

News Item ID: 
820-news_story-1637419473-awsecm-605
Mobile Device Headline: 
वाशीम जिल्हा परिषदेवर  राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा
Appearance Status Tags: 
Section News
On Washim Zilla Parishad The flag of the Nationalist CongressOn Washim Zilla Parishad The flag of the Nationalist Congress
Mobile Body: 

वाशीम : येथील जिल्हा परिषदेमध्ये चंद्रकांत ठाकरे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. नऊ महिन्यांपूर्वी ते या पदावरून पायउतार झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेस व शिवसेनेला सोबत घेऊन वाशीम जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा रोवला आहे. 

गेल्या महिन्यात झालेल्या पोटनिवडणुकीनंतर ३१ संख्याबळ झालेल्या महाविकास आघाडीची निर्विवाद सत्ता स्थापन होणे निश्‍चित होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव निघाल्यामुळे मिनी मंत्रालयात सत्ता स्थापनेच्या दिशेने एक आठवड्यापासून राजकीय हालचाली सुरू होत्या.
वाशीम जिल्हा परिषदेच्या ५२ आणि सहा पंचायत समितीमधील १०४ जागासाठी ७ जानेवारी २०२० रोजी निवडणूक झाली होती.

त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक १२ जागा जिंकून जिल्हा परिषदेत आपला दबदबा कायम ठेवला. त्या खालोखाल काँग्रेसने ९, शिवसेना ६, भाजप ७, वंचित ८, अपक्ष ३, जन विकास आघाडी ६ आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एका जागेवर विजय प्राप्त केला होता.

महाराष्ट्राच्या राजकारणात उदयास आलेल्या महाविकास आघाडीचा प्रयोग त्या वेळी वाशीम जिल्हा परिषदेत सुद्धा बघायला मिळाला. फार्म्यूल्याच्या आधारे त्या वेळी अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत ठाकरे, तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे डॉ. श्‍याम गाभणे यांची वर्णी लागली होती. महाविकास आघाडीच्या या टीमने सुमारे चौदा महिने जिल्हा परिषदेची सत्ता उपभोगली. दरम्यान, ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाने खारीज झालेल्या जिल्हा परिषदेच्या ओबीसी प्रवर्गातील १४ आणि पंचायत समितीमधील २७ जागांसाठी ऑक्टोबर २०२१ मध्ये निवडणूक पार पडली. त्यानंतर जिल्हा परिषदेत सध्या राष्ट्रवादी काँग्रेस १४, काँग्रेस ११, शिवसेना ६, भाजप ७, वंचित ६, जन विकास आघाडी ५, अपक्ष २ आणि स्वाभिमानी एक असे पक्षीय बलाबल झाले आहे.

अध्यक्षपदासाठी शुक्रवारी (ता. १९) निवडणूक प्रक्रिया 
राबवण्यात आली. अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून चंद्रकांत ठाकरे यांचा एकमेव अर्ज आला. निर्धारित वेळेनंतर पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत यांनी ठाकरे बिनविरोध निवडून आल्याची घोषणा केली. या वेळी जिल्हा परिषद सभागृहासमोर ठाकरे समर्थकांनी गुलाल उधळून व फटाके फोडून आनंद साजरा केला.

English Headline: 
Agriculture News in Marathi On Washim Zilla Parishad The flag of the Nationalist Congress
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेस nationalist cogress party काँग्रेस indian national congress वाशीम विकास मंत्रालय पंचायत समिती निवडणूक भाजप विजय victory महाराष्ट्र maharashtra राजकारण politics आरक्षण सर्वोच्च न्यायालय
Search Functional Tags: 
जिल्हा परिषद, राष्ट्रवादी काँग्रेस, Nationalist Cogress Party, काँग्रेस, Indian National Congress, वाशीम, विकास, मंत्रालय, पंचायत समिती, निवडणूक, भाजप, विजय, victory, महाराष्ट्र, Maharashtra, राजकारण, Politics, आरक्षण, सर्वोच्च न्यायालय
Twitter Publish: 
Meta Keyword: 
On Washim Zilla Parishad The flag of the Nationalist Congress
Meta Description: 
On Washim Zilla Parishad
The flag of the Nationalist Congress
येथील जिल्हा परिषदेमध्ये चंद्रकांत ठाकरे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. नऊ महिन्यांपूर्वी ते या पदावरून पायउतार झाले होते.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X