[ad_1]
अकोला ः राज्यात या हंगामात सोयाबीन बियाणे विक्री करण्यापूर्वी त्याची उगवणक्षमता तपासण्याची सूचना कृषी खात्याने विक्रेत्यांना केलेली आहे. तर हे काम हंगामाच्या लगबगीत होणे शक्य नसल्याचे सांगत विक्रेत्यांनी त्याला विरोध दर्शविला आहे. यावर तोडगा काढण्याच्या उद्देशाने गुरुवारी (ता. १५) कृषी खात्याचे वरिष्ठ हे बियाणे कंपन्या, विक्रेत्यांच्या संघटनेसोबत चर्चा करणार आहेत.
राज्यात गेल्या पंधरा दिवसांपासून सोयाबीन बियाणे विक्री करण्यापूर्वी त्याची विक्रेत्यांनी चाचणी करावी, या मुद्याने पेट घेतलेला आहे. गेल्या हंगामात सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या हजारो तक्रारी झाल्या होत्या. या तक्रारी लक्षात घेता यंदा शेतकऱ्यांना उगवणक्षमता तपासूनच बियाणे विक्री होईल, अशा प्रकारची चाचणी करण्याची सूचना विक्रेत्यांना करण्यात आलेली आहे.
याबाबत कृषी खात्याने विक्रेत्यांच्या संघटनांना पत्र दिल्यानंतर याला प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळी कारणे देत विरोधाचा सूर उमटू लागला. हंगामात बियाणे विक्री करताना गर्दी होते. एक-एक विक्रेता आठ ते दहा कंपन्यांचे वेगवेगळ्या लॉटचे बियाणे विक्री करीत असतो. प्रत्येक लॉटची बॅग फोडून चाचणी केली. तर फोडलेली बॅग कोण घेईल, प्रत्येक लॉटनिहाय उगवणक्षमता तपासणे शक्य होईल का, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तर दुसरीकडे कृषी खाते शेतकऱ्यांना उगवणक्षमता असलेले खात्रीशीर बियाणे मिळावे या हेतूने चाचणी करण्याचा आग्रह करीत आहे. या मुद्यांवर अंतिम तोडगा निघालेला नाही.
चर्चेतून तोडग्याची शक्यता
कृषी विभाग व विक्रेते, दोघेही आपापल्या मुद्यांवर ठाम आहेत. हंगाम तोंडावर आलेला असून यावर तोडगा काढणे गरजेचे झालेले आहे. त्या उद्देशाने काही जिल्ह्यात स्थानिक कृषी अधिकाऱ्यांनी कंपनी प्रतिनिधी, विक्रेत्यांच्या बैठका घेऊन चर्चा केली आहे. आता कृषी आयुक्त, गुणवत्ता कक्षाचे वरिष्ठ अधिकारी बियाणे कंपन्या, विक्रेत्यांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.