Take a fresh look at your lifestyle.

विठोबा शेतकरी गटाकडून सेंद्रिय शेतीमालाचे शोरूम उभे

0

नांदेड : कोरोनाच्या काळात सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या भाजीपाल्यासह शेतीमालाची थेट विक्री करणाऱ्या विठोबा सेंद्रिय भाजीपाला व शेतीमाल उत्पादक शेतकरी गटाने ग्राहकांना एकाच ठिकाणी सेंद्रिय भाजीपाल्यासह धान्य उपलब्ध व्हावे ‘ग्रीन हायलंड’ या शोरूमची उभारणी केली आहे. सात सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या सर्व प्रकारच्या डाळींसह शेतीमाल, भाजीपाला, फळे उपलब्ध होणार आहेत.

शुभारंभ प्रसंगी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे, उत्तर नांदेडचे आमदार बालाती कल्याणकर, महापौर जयश्री पावडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, औरंगाबाद विभागाचे लेखा व कोशागारे सहसंचालक उत्तम सोनकांबळे, महिला व बालविकास सभापती संगीता डक पाटील, राजश्री पाटील, सीए नागेश जाधव, एकनाथ पावडे, सविता पावडे, विशाल पावडे, विठ्ठल पावडे यांच्यासह शेतकरी, कृषी उद्योजक, विठोबा परिवाराचे शेतकरी उपस्थित होते. खासदार पाटील यांनी शेतकऱ्यांनी स्वतः विक्री करून प्रक्रिया उद्योगात आले पाहिजे, आपला नैसर्गिक व सेंद्रिय माल जगाच्या बाजारात पाठवून पुढची हरित क्रांती केली पाहिजे व यासाठी शासन आणि स्वतः सोबत असल्याचे सांगून येणाऱ्या काळात अशा शेतीची गरज असल्याचे प्रतिपादन केले. रविशंकर चलवदे उत्तम सोनकांबळे मार्गदर्शन केले.

भाजीपाल्यासह फळे, धान्य उपलब्ध
विठोबा नैसर्गिक भाजीपाला गट शेतकऱ्यांना सर्वच प्रकारचा भाजीपाला, फळभाज्या आदी उपलब्ध करून दिला जातो. सध्या शोरूमच्या माध्यमातून नैसर्गिकरीत्या पिकविलेले फळे, शेतीमाल, जात्यावरील दाळी, रोस्टेड धान्य, रेस्यिड्यू फ्री ज्यूस, काळा तांदूळ, खपली गहू, सल्फर फ्री शुगर, सेंद्रिय गूळ, गूळ पावडर आदी मिळणार आहे.

News Item ID: 
820-news_story-1636605249-awsecm-689
Mobile Device Headline: 
विठोबा शेतकरी गटाकडून सेंद्रिय शेतीमालाचे शोरूम उभे
Appearance Status Tags: 
Tajya News
नांदेड : ग्रीन हायलंड’ या शोरूमची सुरुवात खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते झाली. नांदेड : ग्रीन हायलंड’ या शोरूमची सुरुवात खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते झाली. 
Mobile Body: 

नांदेड : कोरोनाच्या काळात सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या भाजीपाल्यासह शेतीमालाची थेट विक्री करणाऱ्या विठोबा सेंद्रिय भाजीपाला व शेतीमाल उत्पादक शेतकरी गटाने ग्राहकांना एकाच ठिकाणी सेंद्रिय भाजीपाल्यासह धान्य उपलब्ध व्हावे ‘ग्रीन हायलंड’ या शोरूमची उभारणी केली आहे. सात सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या सर्व प्रकारच्या डाळींसह शेतीमाल, भाजीपाला, फळे उपलब्ध होणार आहेत.

शुभारंभ प्रसंगी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे, उत्तर नांदेडचे आमदार बालाती कल्याणकर, महापौर जयश्री पावडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, औरंगाबाद विभागाचे लेखा व कोशागारे सहसंचालक उत्तम सोनकांबळे, महिला व बालविकास सभापती संगीता डक पाटील, राजश्री पाटील, सीए नागेश जाधव, एकनाथ पावडे, सविता पावडे, विशाल पावडे, विठ्ठल पावडे यांच्यासह शेतकरी, कृषी उद्योजक, विठोबा परिवाराचे शेतकरी उपस्थित होते. खासदार पाटील यांनी शेतकऱ्यांनी स्वतः विक्री करून प्रक्रिया उद्योगात आले पाहिजे, आपला नैसर्गिक व सेंद्रिय माल जगाच्या बाजारात पाठवून पुढची हरित क्रांती केली पाहिजे व यासाठी शासन आणि स्वतः सोबत असल्याचे सांगून येणाऱ्या काळात अशा शेतीची गरज असल्याचे प्रतिपादन केले. रविशंकर चलवदे उत्तम सोनकांबळे मार्गदर्शन केले.

भाजीपाल्यासह फळे, धान्य उपलब्ध
विठोबा नैसर्गिक भाजीपाला गट शेतकऱ्यांना सर्वच प्रकारचा भाजीपाला, फळभाज्या आदी उपलब्ध करून दिला जातो. सध्या शोरूमच्या माध्यमातून नैसर्गिकरीत्या पिकविलेले फळे, शेतीमाल, जात्यावरील दाळी, रोस्टेड धान्य, रेस्यिड्यू फ्री ज्यूस, काळा तांदूळ, खपली गहू, सल्फर फ्री शुगर, सेंद्रिय गूळ, गूळ पावडर आदी मिळणार आहे.

English Headline: 
agriculture news in marathi Organic Agriculture product Showroom started by Vithoba Farmers Group
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
नांदेड nanded कोरोना corona शेती farming डाळ हिंगोली खासदार आमदार औरंगाबाद aurangabad विभाग sections गहू wheat
Search Functional Tags: 
नांदेड, Nanded, कोरोना, Corona, शेती, farming, डाळ, हिंगोली, खासदार, आमदार, औरंगाबाद, Aurangabad, विभाग, Sections, गहू, wheat
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Organic Agriculture product Showroom started by Vithoba Farmers Group
Meta Description: 
Organic Agriculture product Showroom started by Vithoba Farmers Group
विठोबा सेंद्रिय भाजीपाला व शेतीमाल उत्पादक शेतकरी गटाने ग्राहकांना एकाच ठिकाणी सेंद्रिय भाजीपाल्यासह धान्य उपलब्ध व्हावे ‘ग्रीन हायलंड’ या शोरूमची उभारणी केली आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

X