[ad_1]
पुणे : राज्यात उन्हाच्या झळा चांगल्याच वाढल्या आहेत. विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. चंद्रपूर येथे तापमानात आणखी वाढ होत यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४३.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पारा ४० अंशांच्या पुढे आहे. आज (ता. २०) विदर्भात उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
राज्यात उन्हाचा चटका वाढतच असल्याने मार्च महिन्यातच कडक उन्हाळ्याचा अनुभव येत आहे. शनिवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील अकोला, बुलडाणा, चंद्रपूर, वर्धा जिल्ह्यांत उष्णतेची लाट होती. तापमान चाळिशीपार गेलेल्या भागात ऊन चांगलेच तापदायक ठरत आहे. उन्हाच्या झळांबरोबरच घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत.
शनिवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सअसमध्ये) :
पुणे ३९, धुळे ४०.५, जळगाव ४२.६, कोल्हापूर ३९.५, महाबळेश्वर ३३.१, नाशिक ३९.१, निफाड ३८.१, सांगली ४०.४, सातारा ३८.५, सोलापूर ४१.६, सांताक्रूझ ३६.९, डहाणू ३३.२, रत्नागिरी ३३.२, औरंगाबाद ४०, नांदेड ४०, परभणी ४१.२, अकोला ४२.७, अमरावती ४१.४, बुलडाणा ३९.८, ब्रह्मपुरी ४०.४, चंद्रपूर ४३.४, गडचिरोली ३६, गोंदिया ३९.८, नागपूर ४०, वर्धा ४१.४.
बंगालच्या उपसागरात घोंघावणार चक्रीवादळ
दक्षिण बंगालच्या उपसागरात दक्षिण अंदमान समुद्राजवळ ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. उत्तरेकडे सरकणारी ही प्रणाली आणखी तीव्र होऊन उद्यापर्यंत (ता. २१) उपसागरात चक्रीवादळ घोंघावण्याचा अंदाज आहे. हे चक्रीवादळ मंगळवारी (ता. २२) बांग्लादेश आणि उत्तर म्यानमारजवळ पोहोचण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.