विदर्भात पेरू प्रक्रिया  उद्योगाची मागणी 

नागपूर ः राज्यात पेरू लागवडीखालील क्षेत्र वाढत असताना प्रक्रिया उद्योगांचा मात्र अभाव असल्याने काही जिल्ह्यांमध्ये पेरू उत्पादकांना दरातील घसरणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे राज्य शासनाने पेरू प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्रम राबविण्याची मागणी होत आहे. 

सीताफळासोबतच कमी उत्पादकता खर्च असल्याने शेतकऱ्यांकडून पेरू लागवडीवर भर दिला जात आहे. पश्‍चिम विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यात देखील या पिकाखालील क्षेत्र वाढीस लागले आहे. खारपाणपट्ट्यातील या शेतकऱ्यांना सुरुवातीला चांगला दर मिळाला. परंतु शेतकऱ्यांनी अनुकरणातून पेरू लागवडीचा निर्णय घेतला. नांदुरा तालुक्‍यातील जिगाव प्रकल्पालगतच्या भागात पेरूचे क्षेत्र टप्प्याटप्प्याने वाढले. परिणामी, आता विक्रीचा प्रश्‍न या भागात निर्माण झाला आहे. 

विदर्भात प्रक्रियेचा अभाव 
सरदार (लखनौ-४९) या वाणाची प्रक्रिया उद्योगाकडून मागणी राहते. पेरूपासून पल्प काढून त्यांची देशांतर्गंत विक्री होते. त्यासोबतच निर्यात देखील केली जाते, अशी माहिती सूत्रांनी दिली. औरंगाबाद, सिन्नर, नाशिक या भागांत अशाप्रकारचे २०-२५ प्रकल्प आहेत. परंतु विदर्भात एकही प्रकल्प नसल्याने शेतकऱ्यांना नाइलाजाने स्थानिकस्तरावरच पेरू विकावा लागतो. तायवान पिंक, व्हीएनआर हे दोन वाण खाण्यासाठी चवदार असले, तरी त्यांचा प्रक्रियेकामी उपयोग होत नाही, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले.

प्रतिक्रिया
पेरू उत्पादकांच्या अवस्थेत कोरोनानंतर चांगलेच बदल झाले. शाळा, महाविद्यालय, मंदिर बंद आहेत. आता मंदिरांना काहीशी मुभा मिळाली, परंतु भाविकांची संख्या पूर्वीसारखी नाही. परिणामी, पेरूची मागणी घटल्याने दर काहीसे कमी झाले. पूर्वी क्रेटला ७०० रुपयांचा दर मिळत होता. आता सरासरी २०० रुपयांचा दर मिळतो. तायवान पिंक या वाणाला १०० रुपये किलोपर्यंत दर मिळाला आहे. या पुढील काळात जनजीवन पूर्वपदावर आल्यास परिस्थिती बदलेल, अशी अपेक्षा आहे. 
– विनायक दंडवते, अध्यक्ष भारतीय पेरू उत्पादक संघ

खारपाणपट्ट्यात व्यवसायिक आणि फळपीक लागवडीत मर्यादा आहेत. मी पेरू लागवड केली आणि ती यशस्वी झाली. खारपाणपट्ट्यातील मातीचे गुणधर्म तसेच सेंद्रीय पद्धतीने उत्पादन घेत असल्याने माझ्या बागेतील फळांना मागणी राहते. परंतु काही भागात रासायनिक पद्धतीने उत्पादित पेरूच्या विक्रीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. विदर्भात पेरूवर प्रक्रिया करणारा एकही उद्योग नाही. शासनाने पुढाकार घेत असा प्रकल्प उभारल्यास शेतकऱ्यांना निश्‍चितच फायदा होईल. 
– शशी फुंडकर, शेगाव, बुलडाणा

राज्यातील पेरू क्षेत्र दृष्टिक्षेपात     
क्षेत्र     ३५ हजार हेक्‍टर 
दोन वर्षांपूर्वीचे दर     ६०० ते ७०० रुपये क्रेट 
कोरोनानंतरचे दर     २०० रुपये क्रेट 
या भागात आहे लागवड     नगर, बुलडाणा, नाशिक, पुणे, 
पल्पचा उपयोग     जॅम, जेली, ज्यूसमध्ये
हंगाम     नोव्हेंबर ते जानेवारी 
एका झाडापासून उत्पादकता     सरासरी ५० किलो

News Item ID: 
820-news_story-1637158003-awsecm-696
Mobile Device Headline: 
विदर्भात पेरू प्रक्रिया  उद्योगाची मागणी 
Appearance Status Tags: 
Mukhya News
Peru process in Vidarbha Industry demandPeru process in Vidarbha Industry demand
Mobile Body: 

English Headline: 
Agriculture News in Marathi Peru process in Vidarbha Industry demand
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
पेरू सामना face नागपूर nagpur सीताफळ custard apple विदर्भ vidarbha औरंगाबाद aurangabad नाशिक nashik कोरोना corona वन forest भारत व्यवसाय profession पुढाकार initiatives वर्षा varsha नगर पुणे
Search Functional Tags: 
पेरू, सामना, face, नागपूर, Nagpur, सीताफळ, Custard Apple, विदर्भ, Vidarbha, औरंगाबाद, Aurangabad, नाशिक, Nashik, कोरोना, Corona, वन, forest, भारत, व्यवसाय, Profession, पुढाकार, Initiatives, वर्षा, Varsha, नगर, पुणे
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Peru process in Vidarbha Industry demand
Meta Description: 
Peru process in Vidarbha
Industry demand
राज्यात पेरू लागवडीखालील क्षेत्र वाढत असताना प्रक्रिया उद्योगांचा मात्र अभाव असल्याने काही जिल्ह्यांमध्ये पेरू उत्पादकांना दरातील घसरणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे राज्य शासनाने पेरू प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्रम राबविण्याची मागणी होत आहे. Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X