विधान परिषद निवडणुकीत बुलडाणा ठरणार ‘किंगमेकर’

अकोला ः विधान परिषदेच्या अकोला-बुलडाणा- वाशीम या स्थानिक प्राधिकार मतदार संघासाठीची प्राथमिक मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. यात सर्वाधिक मतदार बुलडाणा जिल्ह्यातील असल्याने या निवडणुकीत हा जिल्हा निर्णायक ठरणार आहे. या जिल्ह्यातील मतदारांचा कौल हा विजयी उमेदवारासाठी निर्णायक ठरणार आहे.

विधान परिषदेच्या अकोला-बुलडाणा- वाशीम स्थानिक प्राधिकार मतदारसंघासाठी १० डिसेंबरला मतदान होऊ घातले आहे. या तीनही जिल्ह्यांतील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत व जिल्हा परिषदेचे सदस्य निवडणुकीसाठी मतदार आहेत. नुकतीच मतदारांची प्राथमिक यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीवर सात दिवसांत हरकती व आक्षेप नोंदविता येणार आहे. त्यानंतर अंतिम मतदार यादी जाहीर केली जाईल.

प्राथमिक मतदार यादीनुसार तीनही जिल्हे मिळून ८२१ मतदार आहेत. त्यात ३८९ पुरुष आणि ४३२ महिला मतदारांचा समावेश आहे. सर्वाधिक ३६८ मतदार बुलडाणा जिल्ह्यातील आहेत. दुसऱ्या क्रमांकावर २८५ मतदार अकोला जिल्ह्यातील असून वाशीम जिल्ह्यातील मतदार संख्या १६८ आहे. 
सर्वाधिक मतदार अकोला महानगरपालिकेत ८१ आहेत. त्यानंतर ७१ सदस्य बुलडाणा जिल्हा परिषदेचे येतात. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेसोबत प्रहार या महाविकास आघाडीत असून संख्याबळ सर्वाधिक आहे. बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक मतदार असल्याने महाविकास आघाडीच्‍या उमेदवाराला टक्कर देण्यासाठी भाजपला तगडा उमेदवार द्यावा लागेल. 

भाजपचा उमेदवार ठरेल आज 

महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया यांचे नाव निश्चित मानले जात आहे. त्यांच्या विरोधात यावेळी गेल्या तीनही निवडणुकीत मित्रपक्ष असलेल्या भाजपकडून उमेदवार राहणार आहे. सध्या तरी भाजपकडून कोणतेही नाव जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र, मंगळवारी (ता.१६) अकोला येथे आयोजित बैठकीत भाजपच्या उमेदवाराचे नाव जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.

News Item ID: 
820-news_story-1637239427-awsecm-893
Mobile Device Headline: 
विधान परिषद निवडणुकीत बुलडाणा ठरणार ‘किंगमेकर’
Appearance Status Tags: 
Section News
In the Legislative Council elections Buldana to be 'Kingmaker'In the Legislative Council elections Buldana to be 'Kingmaker'
Mobile Body: 

अकोला ः विधान परिषदेच्या अकोला-बुलडाणा- वाशीम या स्थानिक प्राधिकार मतदार संघासाठीची प्राथमिक मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. यात सर्वाधिक मतदार बुलडाणा जिल्ह्यातील असल्याने या निवडणुकीत हा जिल्हा निर्णायक ठरणार आहे. या जिल्ह्यातील मतदारांचा कौल हा विजयी उमेदवारासाठी निर्णायक ठरणार आहे.

विधान परिषदेच्या अकोला-बुलडाणा- वाशीम स्थानिक प्राधिकार मतदारसंघासाठी १० डिसेंबरला मतदान होऊ घातले आहे. या तीनही जिल्ह्यांतील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत व जिल्हा परिषदेचे सदस्य निवडणुकीसाठी मतदार आहेत. नुकतीच मतदारांची प्राथमिक यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीवर सात दिवसांत हरकती व आक्षेप नोंदविता येणार आहे. त्यानंतर अंतिम मतदार यादी जाहीर केली जाईल.

प्राथमिक मतदार यादीनुसार तीनही जिल्हे मिळून ८२१ मतदार आहेत. त्यात ३८९ पुरुष आणि ४३२ महिला मतदारांचा समावेश आहे. सर्वाधिक ३६८ मतदार बुलडाणा जिल्ह्यातील आहेत. दुसऱ्या क्रमांकावर २८५ मतदार अकोला जिल्ह्यातील असून वाशीम जिल्ह्यातील मतदार संख्या १६८ आहे. 
सर्वाधिक मतदार अकोला महानगरपालिकेत ८१ आहेत. त्यानंतर ७१ सदस्य बुलडाणा जिल्हा परिषदेचे येतात. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेसोबत प्रहार या महाविकास आघाडीत असून संख्याबळ सर्वाधिक आहे. बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक मतदार असल्याने महाविकास आघाडीच्‍या उमेदवाराला टक्कर देण्यासाठी भाजपला तगडा उमेदवार द्यावा लागेल. 

भाजपचा उमेदवार ठरेल आज 

महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया यांचे नाव निश्चित मानले जात आहे. त्यांच्या विरोधात यावेळी गेल्या तीनही निवडणुकीत मित्रपक्ष असलेल्या भाजपकडून उमेदवार राहणार आहे. सध्या तरी भाजपकडून कोणतेही नाव जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र, मंगळवारी (ता.१६) अकोला येथे आयोजित बैठकीत भाजपच्या उमेदवाराचे नाव जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.

English Headline: 
Agriculture news in marathi, In the Legislative Council elections Buldana to be ‘Kingmaker’
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
अकोला akola वाशीम मतदार यादी काँग्रेस indian national congress राष्ट्रवादी काँग्रेस nationalist cogress party विकास आमदार
Search Functional Tags: 
अकोला, Akola, वाशीम, मतदार यादी, काँग्रेस, Indian National Congress, राष्ट्रवादी काँग्रेस, Nationalist Cogress Party, विकास, आमदार
Twitter Publish: 
Meta Keyword: 
In the Legislative Council elections Buldana to be ‘Kingmaker’
Meta Description: 
In the Legislative Council elections Buldana to be ‘Kingmaker’
अकोला ः विधान परिषदेच्या अकोला-बुलडाणा- वाशीम या स्थानिक प्राधिकार मतदार संघासाठीची प्राथमिक मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. यात सर्वाधिक मतदार बुलडाणा जिल्ह्यातील असल्याने या निवडणुकीत हा जिल्हा निर्णायक ठरणार आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X