वीज कर्मचाऱ्यांचे दिवाळीत आंदोलन? 

यवतमाळ : राज्यात महानिर्मिती, महापारेषण व महावितरण या कंपन्यांतील ८६ हजार कामगार, अभियंते व अधिकारी तसेच सहायक कामगारांना दिवाळीपूर्वी सानुग्रह अनुदान, बोनसची मागणी संघटनांनी केली आहे. दिवाळीपूर्वी यावर निर्णय न घेतल्यास दिवाळीच्या मुहूर्तावर आंदोलनाचा इशारा संघर्ष समितीने दिला आहे. 

दिवाळीपूर्वी सानुग्रह अनुदान व बोनस देण्याबाबत संघर्ष समितीने मागणी केली होती. १२ दिवसांचा कालावधी लोटूनही प्रशासनाकडून कुठलीही दखल घेतली नाही. त्यामुळे कामगार, अभियंते व अधिकारी यांच्यामध्ये असंतोषाची भावना निर्माण झालेली आहे. तीनही वीज कंपनीतील कर्मचारी, अभियंता व अधिकारी अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करीत आहेत. कोरोना महामारीच्या काळात व नंतर झालेल्या चक्री वादळात, महापुरात सुद्धा अत्यंत चांगली कामगिरी वीज कर्मचाऱ्‍यांनी केली आहे. लॉकडाउन काळापासून महावितरणची वाढलेली थकबाकी वसूल करण्याकरिता कामगार, अभियंते व अधिकारी कठीण परिश्रम घेत आहेत. महावितरण कंपनीला दर महिन्याला महसूल सहा हजार कोटी मिळत आहे.

यातून आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न आहेत. कोरोना महामारीचा प्रकोप असताना सुद्धा विक्रमी वीजनिर्मिती केली. अविरतपणे काम करून अखंडित वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे काम कर्मचारी व अभियंत्यांनी केले. तरीही मंडळ प्रशासन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत गंभीर नसल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. 

कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी सोमवारी (ता. २५) संघर्ष समितीची बैठक ऑनलाइन झाली. यात २५ संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत दिवाळीपूर्वी सानुग्रह अनुदान व बोनस जाहीर करण्याची मागणी केली. या संदर्भात सकारात्मक निर्णय न झाल्यास दिवाळीच्या मुहूर्तावर आंदोलनाचा इशारा संघर्ष समितीने दिला आहे.

News Item ID: 
820-news_story-1635338567-awsecm-314
Mobile Device Headline: 
वीज कर्मचाऱ्यांचे दिवाळीत आंदोलन? 
Appearance Status Tags: 
Section News
वीज कर्मचाऱ्यांचे दिवाळीत आंदोलन?  Diwali agitation of power workers?वीज कर्मचाऱ्यांचे दिवाळीत आंदोलन?  Diwali agitation of power workers?
Mobile Body: 

यवतमाळ : राज्यात महानिर्मिती, महापारेषण व महावितरण या कंपन्यांतील ८६ हजार कामगार, अभियंते व अधिकारी तसेच सहायक कामगारांना दिवाळीपूर्वी सानुग्रह अनुदान, बोनसची मागणी संघटनांनी केली आहे. दिवाळीपूर्वी यावर निर्णय न घेतल्यास दिवाळीच्या मुहूर्तावर आंदोलनाचा इशारा संघर्ष समितीने दिला आहे. 

दिवाळीपूर्वी सानुग्रह अनुदान व बोनस देण्याबाबत संघर्ष समितीने मागणी केली होती. १२ दिवसांचा कालावधी लोटूनही प्रशासनाकडून कुठलीही दखल घेतली नाही. त्यामुळे कामगार, अभियंते व अधिकारी यांच्यामध्ये असंतोषाची भावना निर्माण झालेली आहे. तीनही वीज कंपनीतील कर्मचारी, अभियंता व अधिकारी अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करीत आहेत. कोरोना महामारीच्या काळात व नंतर झालेल्या चक्री वादळात, महापुरात सुद्धा अत्यंत चांगली कामगिरी वीज कर्मचाऱ्‍यांनी केली आहे. लॉकडाउन काळापासून महावितरणची वाढलेली थकबाकी वसूल करण्याकरिता कामगार, अभियंते व अधिकारी कठीण परिश्रम घेत आहेत. महावितरण कंपनीला दर महिन्याला महसूल सहा हजार कोटी मिळत आहे.

यातून आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न आहेत. कोरोना महामारीचा प्रकोप असताना सुद्धा विक्रमी वीजनिर्मिती केली. अविरतपणे काम करून अखंडित वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे काम कर्मचारी व अभियंत्यांनी केले. तरीही मंडळ प्रशासन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत गंभीर नसल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. 

कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी सोमवारी (ता. २५) संघर्ष समितीची बैठक ऑनलाइन झाली. यात २५ संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत दिवाळीपूर्वी सानुग्रह अनुदान व बोनस जाहीर करण्याची मागणी केली. या संदर्भात सकारात्मक निर्णय न झाल्यास दिवाळीच्या मुहूर्तावर आंदोलनाचा इशारा संघर्ष समितीने दिला आहे.

English Headline: 
Agriculture News in Marathi Diwali agitation of power workers?
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
महावितरण दिवाळी संघटना unions आंदोलन agitation यवतमाळ yavatmal प्रशासन administrations वन forest वीज कंपनी company सामना face
Search Functional Tags: 
महावितरण, दिवाळी, संघटना, Unions, आंदोलन, agitation, यवतमाळ, Yavatmal, प्रशासन, Administrations, वन, forest, वीज, कंपनी, Company, सामना, face
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Diwali agitation of power workers?
Meta Description: 
Diwali agitation of power workers?
राज्यात महानिर्मिती, महापारेषण व महावितरण या कंपन्यांतील ८६ हजार कामगार, अभियंते व अधिकारी तसेच सहायक कामगारांना दिवाळीपूर्वी सानुग्रह अनुदान, बोनसची मागणी संघटनांनी केली आहे. दिवाळीपूर्वी यावर निर्णय न घेतल्यास दिवाळीच्या मुहूर्तावर आंदोलनाचा इशारा संघर्ष समितीने दिला आहे. Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X