शंखी गोगलगायींचे नियंत्रण

 शंखी गोगलगायी ही बहुभक्षी कीड रात्रीच्या वेळी पिकांचे नुकसान करतात. शंखी गोगलगायींच्या प्रभावी नियंत्रणासाठी एकाचवेळी सामूहिकपणे नियंत्रण पद्धतींचा अवलंब करावा.

सध्याच्या काळामध्ये निफाड, सिन्नर, अकोले भागामध्ये कडुनिंबावर शंखी गोगलगायींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सध्या कीड बाल्यावस्थेत असून, खोड तसेच कुजलेल्या सालीवर उपजीविका करताना दिसत आहे. शंखी गोगलगायी ही बहुभक्षी कीड रात्रीच्या वेळी पिकांचे नुकसान करतात. शंखी गोगलगायींच्या प्रभावी नियंत्रणासाठी एकाचवेळी सामूहिकपणे नियंत्रण पद्धतींचा अवलंब करावा.

प्रसार 

 • शेती अवजारे, बैलगाडी, यंत्रसामग्री, ट्रॅक्टर, ट्रॉली, प्लॅस्टिक क्रेट, शेणखत, विटा, वाळू, माती, कुंड्या, रोपे इत्यादी.
 • कुतूहलापोटी शंखासाठी जिवंत गोगलगायी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणे.

नुकसान 

 • पालापाचोळा, कुजके पदार्थ, पपई, केळी, झेंडू, भेंडी व जमिनीवरील पिवळी पाने (कॅल्शिअम जास्त असलेली) हे आवडीचे खाद्य आहे.
 • रात्री रोपावस्थेतील पिकांचा जमिनीलगतचा भाग कुरतडून खातात. पिकांचे शेंडे, पाने, कळ्या, फुले, फळे व साल खातात.

लपण्याच्या जागा 
वाळलेल्या, कुजलेल्या गवताखाली, पाला पाचोळ्याखाली, काडी कचऱ्याखाली, पिकांच्या खोडाशेजारी, दगडांच्या सापटीत, शेतीच्या अवजारांखाली किंवा शंखात लपून बसतात.

एकात्मिक नियंत्रण 

 • बांधावरील गवत, पालापाचोळा व दगड काढून शेत स्वच्छ करावे.
 • संध्याकाळी शेतामध्ये २० ते २५ फूट अंतरावर गवताचे ढीग करावेत. सकाळी त्याखाली लपलेल्या गोगलगायी गोळा करून नष्ट कराव्यात.
 • एक किलो गुळाचे १० लिटर पाण्यामध्ये मिसळून द्रावण तयार करावे. या द्रावणामध्ये गोणपाटाची पोती भिजवून ती संध्याकाळी शेतामध्ये पसरून ठेवावीत. दुसऱ्या दिवशी पोत्याखाली जमा झालेल्या गोगलगायी गोळा करून नष्ट कराव्यात.
 • द्राक्ष वेलीच्या खोडाभोवती १ इंच रुंदीची तांब्याची पट्टी गुंडाळावी किंवा प्लॅस्टिक पिशवी खोडाभोवती आणि उभारलेल्या खांबावर गुंडाळून त्यावर घट्ट ग्रीसचा थर द्यावा. त्यावर गोगलगायींना चढता येत नाही.
 • प्लॅस्टिक हातमोजे घालून गोगलगायी आणि त्यांनी घातलेली अंडी गोळा करून नष्ट करावीत.
 • गोगलगायी उकळत्या पाण्यात किंवा साबणाच्या द्रावणात किंवा रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून माराव्यात किंवा खोल खड्यात पुरून चुन्याची भुकटी टाकून खड्डा मातीने झाकावा.
 • सापळा पीक म्हणू शेताच्या बाजूने झेंडूची लागवड करावी.
 • लहान गोगलगायींच्या नियंत्रणासाठी २० टक्के मिठाच्या द्रावणाची फवारणी करावी.
 • संध्याकाळी मेटाल्डीहाइडच्या गोळ्या हेक्टरी ५ किलो खोडाजवळ टाकाव्यात.
 • मुख्य पिकाच्या सर्व बाजूंनी बांधाच्या शेजारी तंबाखू किंवा चुन्याच्या भुकटीचा ४ इंच पट्टा टाकावा. (ॲग्रेस्को शिफारस)

विषारी आमिषाचा वापर 

 • गहू, भात भुसा किंवा कोंडा किंवा पशुखाद्य ५० किलो अधिक २ किलो गूळ पाण्यामध्ये भिजवून त्यात २५ ग्रॅम यीस्ट पावडर अधिक मिथोमिल भुकटी (४० एसपी) ५० ग्रॅम याप्रमाणे मिसळून द्रावण तयार करावे. (ॲग्रेस्को शिफारस)
 • हे द्रावण १२ ते १५ तास पाण्यात भिजत ठेवावे. तयार विषारी आमिष संध्याकाळच्या वेळी प्रादुर्भावग्रस्त शेतामध्ये पसरून टाकावे. विषारी आमिष खाण्यामुळे गोगलगायी मरतात. त्या गोळा करून १ मीटर खोल खड्ड्यामध्ये पुरून टाकाव्यात.
 • आमिष खाऊन मेलेल्या गोगलगायी पाळीव प्राणी, पक्षी किंवा कोंबड्या खाणार नाहीत याची काळजी घ्यावी. मिथोमिल हे अत्यंत विषारी कीटकनाशक असल्यामुळे त्याचा वापर करताना हातमोजे, गॉगल आणि मास्कचा वापर करावा.

– डॉ. चांगदेव वायळ, ९४०५१८६३६६
– डॉ. संजय पाटील, ७९७२२७६१०६
(महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)

News Item ID: 
820-news_story-1637586073-awsecm-880
Mobile Device Headline: 
शंखी गोगलगायींचे नियंत्रण
Appearance Status Tags: 
Section News
शंखी गोगलगायीची साबुदाण्याच्या आकाराची पांढरी अंडी. शंखी गोगलगायीची साबुदाण्याच्या आकाराची पांढरी अंडी.
Mobile Body: 

English Headline: 
agricultural news in marathi Control of conch snails
Author Type: 
External Author
डॉ. चांगदेव वायळ, डॉ. संजय पाटील, डॉ. चिदानंद पाटील
निफाड niphad शेती farming अवजारे equipments ट्रॅक्टर tractor रॉ पपई papaya झेंडू सकाळ द्राक्ष रॉकेल काव्य गहू wheat पशुखाद्य कीटकनाशक संजय पाटील sanjay patil महात्मा फुले कृषी विद्यापीठ agriculture university नगर
Search Functional Tags: 
निफाड, Niphad, शेती, farming, अवजारे, equipments, ट्रॅक्टर, Tractor, रॉ, पपई, papaya, झेंडू, सकाळ, द्राक्ष, रॉकेल, काव्य, गहू, wheat, पशुखाद्य, कीटकनाशक, संजय पाटील, Sanjay Patil, महात्मा फुले, कृषी विद्यापीठ, Agriculture University, नगर
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Control of conch snails
Meta Description: 
Control of conch snails
. शंखी गोगलगायी ही बहुभक्षी कीड रात्रीच्या वेळी पिकांचे नुकसान करतात. शंखी गोगलगायींच्या प्रभावी नियंत्रणासाठी एकाचवेळी सामूहिकपणे नियंत्रण पद्धतींचा अवलंब करावा.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X