Take a fresh look at your lifestyle.

शहरात फिरून विकला वीस टन कांदा, मोहरीच्या नरोटे यांनी संकटात मिळवला नफा

0

कांदा पीक हाती आले आणि कोरोनामुळे लॉकडाऊन झाले. त्यामुळे करायचे काय असा प्रश्न उभा राहिला. ठोक बाजारातही कांद्याला दर नव्हता. मग प्रत्येकी पाच किलोचे पॅकिंग करून मोठ्या शहरात फिरून विक्री सुरू केली. ग्राहकांचा एवढा प्रतिसाद मिळत गेला की पंचवीस दिवसात किलोला १४ ते १५ रुपये दराने वीस टन कांदा हातोहात विकण्यात मोहरी ता. पाथर्डी (जि. नगर) येथील गावीनाथ नरोटे या युवा शेतकऱ्याला यश आले. सुमारे तीन लाख रुपयांची कमाई करून संकट काळात त्याने मोठा आर्थिक आधार मिळवला.

मोहरी (ता. पाथर्डी, जि. नगर) येथील गवीनाथ नरोटे या युवा शेतकऱ्याची वीस एकर शेती आहे. अनेक वर्षापासून खरीप व उन्हाळी कांद्याचे उत्पादन ते घेतात. एकरी सरासरी १५ टन उत्पादन त्यांना मिळते. यंदा उन्हाळी हंगामासाठी तीन ते चार एकरांत लागवड केली. उत्पादन हाती आले आणि कोरोनाच्या संसर्गामुळे लॉकडाऊन झाले. त्यामुळे कांदा बाजार बंद होते. महिनाभरापासून काही ठिकाणी कांदा लिलाव सुरु झाले, पण दरात मोठी घसरण झालेली. बाजारात ठोक दरात विकला तरी उत्पादन खर्चही निघणार नाही अशी स्थिती. त्यामुळे कांद्याचे करायचे काय असा प्रश्न नरोटे यांच्यासमोर निर्माण झाला. पण नरोटे निराश झाले नाहीत. भाजीपाल्याचेही अधून-मधून उत्पादन ते घेतात. त्यातून ग्राहकांना थेट विक्रीचा अनुभव त्यांना होता. मग कांदाही थेट विकण्याचा निर्णय घेतला. बाजारात उच्च प्रतीच्या कांद्याला किलोला सहा ते सात रुपये तर बाकी बहुतांश कांद्याला पाच रुपये दर मिळतो आहे.

विक्रीचे नियोजन 

 • नरोटे यांनी प्रति किलो १४ ते १५ रुपये दराने विक्रीचा निर्णय घेतला. याच कांद्यला बाजारात
 • किलोला सहा रुपये दर सुरू होता.
 • पाच किलोचे पॅकिंग केले.
 • स्वतःच्या पीक अप व्हॅनमधून सुरुवातीला औरंगाबाद व नंतर नगर शहरातील विविध भागात, तसेच मुख्य चौकांमध्ये थेट विक्री सुरु केली.
 • बघता-बघता ग्राहकांकडून जोरदार प्रतिसाद दिला.
 • गेल्या पंचवीस दिवसापासून दररोज एक ते दोन टन कांद्याची हातोहात विक्री
 • आत्तापर्यंत एकूण वीस टन थेट विक्री तर १५ टन व्यापाऱ्यांना विकला.
 • थेट विक्रीतून तीन लाखांचे उत्पन्न

पाण्याचा लाभ

मागील दोन वर्षात त्यावेळी जिल्हा परिषद शाळेत कार्यरत प्राथमिक शिक्षक पोपट फुंदे यांनी लोकसहभागातून जलसंधारणाच्या कामांत मदत केली. त्याचा लाभ मोहरी गावालाही झाला.पाणी साठवण क्षमता आणि पातळी वाढल्याने नरोटे यांनाही कांद्याचे चांगले उत्पादन घेता आले.

संपर्क- गावीनाथ नरोटे- ७५८८१०१९७३
 
News Item ID: 
820-news_story-1589895963-461
Mobile Device Headline: 
शहरात फिरून विकला वीस टन कांदा, मोहरीच्या नरोटे यांनी संकटात मिळवला नफा
Appearance Status Tags: 
Mukhya News
Mobile Body: 

English Headline: 
agricultural news story, agrowon, farmer from Nagar Dist. sold 20 tons onion direct to the consumer
Author Type: 
External Author
सूर्यकांत नेटके
कांदा कोरोना corona नगर varsha खरीप औरंगाबाद aurangabad जिल्हा परिषद शिक्षक जलसंधारण
Search Functional Tags: 
कांदा, कोरोना, Corona, नगर, Varsha, खरीप, औरंगाबाद, Aurangabad, जिल्हा परिषद, शिक्षक, जलसंधारण
Twitter Publish: 
Meta Keyword: 
agricultural news story, agrowon, farmer from Nagar Dist. sold 20 tons onion direct to the consumer
Meta Description: 
कांदा पीक हाती आले आणि कोरोनामुळे लॉकडाऊन झाले. त्यामुळे करायचे काय असा प्रश्न उभा राहिला. ठोक बाजारातही कांद्याला दर नव्हता. मग प्रत्येकी पाच किलोचे पॅकिंग करून मोठ्या शहरात फिरून विक्री सुरू केली. ग्राहकांचा एवढा प्रतिसाद मिळत गेला की पंचवीस दिवसात किलोला १४ ते १५ रुपये दराने वीस टन कांदा हातोहात विकण्यात मोहरी ता. पाथर्डी (जि. नगर) येथील गावीनाथ नरोटे या युवा शेतकऱ्याला यश आले. सुमारे तीन लाख रुपयांची कमाई करून संकट काळात त्याने मोठा आर्थिक आधार मिळवला.Source link

X