शाश्वत शेतीसाठी सेंद्रिय कर्ब महत्त्वाचा…

सेंद्रिय कर्बामुळे जमिनीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्मामध्ये सुधारणा होऊन जमिनीचे आरोग्य चांगले राहते. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जितके जास्त तितका जमिनीचा पोत चांगला.सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जितके जास्त तितकी जमिनीची सुपीकता चांगली.

सेंद्रिय कर्बामुळे जमिनीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्मामध्ये सुधारणा होऊन जमिनीचे आरोग्य चांगले राहते. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जितके जास्त तितका जमिनीचा पोत चांगला.सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जितके जास्त तितकी जमिनीची सुपीकता चांगली. सेंद्रिय खतात १२:१ ते २०:१ हे गुणोत्तर अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढविण्याच्या दृष्टीने उपयुक्त असते. साधारणपणे जमिनीत सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण ०.६० टक्क्यांपेक्षा जास्त असावयास हवे. त्यासाठी जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

राज्यातील जमिनीत सेंद्रिय द्रव्यांचा वापर कमी प्रमाणात आहे,म्हणून आजच्या परिस्थितीत जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण अत्यल्प आहे (०.२ ते ०.५ टक्के) त्यामुळे जमिनीचा कस कमी होणे, जमिनीची सुपीकता कमी होऊन जमिनीच्या भौतिक,रासायनिक आणि जैविक गुणवत्तेत प्रतिकूल बदलासारखे अनेक प्रश्न भेडसावत आहेत.जमिनीच्या या सर्व प्रश्नावर उपाय म्हणजे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचा समतोल राखणे महत्त्वाचे आहे.

सेंद्रिय कर्बाची उपलब्धता

 • जमिनीतील सेंद्रिय कर्बाची उपलब्धता आणि गुणात्मक दर्जा अनेक बाबींवर अवलंबून असतो.सेंद्रिय पदार्थांचे प्रकार,त्यातील घटक, इतर सेंद्रिय घटकांचे अस्तित्व,हवामान,आद्रता,जमिनीचे इतर गुणधर्म विशेषतः कॅल्शिअम आणि सूक्ष्म जिवाणूंचे प्रकार,त्यांची जमिनीतील एकूण संख्या यांचा समावेश होतो.
 • सेंद्रिय कर्बाचे जमिनीतील प्रमाण सेंद्रिय पदार्थांच्या वापरावर अवलंबून असते.जमिनीत सेंद्रिय पदार्थांचा पुरवठा केला नसेल,तर जमिनीतील मूळ सेंद्रिय कर्बाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होतो.मात्र शेणखत ,कंपोस्ट खत अथवा पिकांच्या अवशेषांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्यास मदत होते.
 •  सेंद्रिय पदार्थांद्वारे सेंद्रिय कर्बाचा पुरवठा संतुलित करता येतो.सेंद्रिय द्रव्यांमध्ये शेतीसाठी वापरात येणारी भरखते म्हणजे शेणखत,कंपोस्ट खत,कोंबडी विष्ठेपासून मिळणारे खत,शेळ्या मेंढ्यापासून तयार केलेले खत,पिकांपासून मिळणारा गव्हाचा भुसा ,भुईमुगाचा भुसा, शेतातील पिकांचे अवशेष,काडीकचरा, पाने,फांद्या ,मुळे,पिकांच्या काड्या,मूल्यांचे अवशेष,हिरवळीचे खते आणि इतर पानांच्या अवशेषांचे खत इत्यादींचा समावेश होतो.
 • एकूण सेंद्रिय पदार्थांमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण विघटनानंतर ५० ते ५८ टक्क्यांपर्यंत असते.या सर्व बाबींच्या उपयोगातून सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जमिनीत संतुलित करता येते.

कर्ब:नत्र गुणोत्तर

 •  विविध पिकांच्या अवशेषातील कर्ब:नत्र गुणोत्तर प्रमाण ४०:१ ते ९०:१ पर्यंत असते.ह्यूमस किंवा जमिनीतील सेंद्रिय पदार्थांमध्ये एकूण नत्राचे प्रमाण ५.० ते ५.५ टक्के आणि कर्बाचे प्रमाण ५० ते ५८ टक्के असते.
 •  सुपीक जमिनीतील ह्युमसचे कर्ब:नत्र गुणोत्तर ९:१ ते १२:१ च्या दरम्यान असते.विविध सेंद्रिय अवशेषांमध्ये कर्ब:नत्र गुणोत्तर वेगवेगळे असते.उदा.शेणखत २०:१,भाताचा पेंढा ८०:१, झाडांची पाने २५:१,उसाची पाने ११०.१,वाळलेले गवत ९५:१,गव्हाचा भुसा २५:१,धान्याचा कोंडा ९०:१,गिरीपुष्पाची पाने /कोवळ्या फांद्या १३.१,सुबाभळाची पाने ७:१,धसकटे १०४:१,जनावरांचे मूत्र २:१,मक्याचा पेंढा /पाने ६०:१,तणे ३०:१ इत्यादी या गुणोत्तराचे प्रमाण जेवढे जास्त तेवढा कुजण्यास वेळ जास्त लागतो.त्यामुळे असे सेंद्रिय पदार्थ कुजविण्यासाठी युरिया विघटन करणारी जैविक खते टाकावी लागतात. म्हणजे जास्त कर्ब: नत्र गुणोत्तर असलेल्या सेंद्रिय द्रव्यांचे विघटन होऊन ११०:१ पासून २०:१,पर्यंत कमी होते.
 •  कमी झालेल्या कर्ब:नत्र गुणोत्तरामुळे सेंद्रिय स्वरूपातील नत्र,स्फुरद,गंधक आणि सूक्ष्म द्रव्याचे रूपांतर असेंद्रिय (रासायनिक) स्वरूपात होते. ते पिकांना उपलब्ध होते.मात्र २०:१ गुणोत्तरापेक्षा अधिक कर्ब:नत्र असेल तर ती सर्व अन्नद्रव्ये सेंद्रिय स्वरूपात परावर्तित होऊन त्याचे स्थिरीकरण होते आणि पिकांना ती उपलब्ध होत नाहीत.
 •  साधारण: १३:१ ते १६:१ कर्ब:नत्र गुणोत्तर हे अन्नद्रव्यांचे उपलब्धता वाढविण्याच्या दृष्टीने अधिक उपयुक्त ठरलेले आहे.

सेंद्रिय कर्बामुळे होणारे फायदे

 •  जमिनीच्या भौतिक गुणधर्मात म्हणजेच जमिनीचा घट्टपणा कमी होऊन मातीच्या कणा-कणांतील पोकळी वाढवून हवा खेळती राहते.
 • भारी काळ्या जमिनीत अतिरिक्त पाण्याचा निचरा चांगला होतो. हलक्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
 • मातीची धूप कमी होते.मातीची जडणघडण सुधारते.रासायनिक अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते.
 •  नत्र आणि स्फुरदाच्या उपलब्धतेवर अनुकूल परिणाम होतो. रासायनिक नत्राचा ऱ्हास टळतो.स्फुरद स्थिर करण्याची प्रक्रिया मंदावते आणि स्फुरदाची उपलब्धता वाढते.
 • जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ ठेवण्यास मदत होते.चुनखडीयुक्त जमिनीत अन्नद्रव्यांची स्थिरता कमी होते.
 • सेंद्रिय पदार्थांचे विघटन झाल्यानंतर जमिनीत थोड्या प्रमाणात अन्नद्रव्ये उपलब्ध होतात.
 • सेंद्रिय कर्बाच्या जमिनीतील अस्तित्वामुळे सूक्ष्मजीव व जीवाणूंच्या जननक्रियेस गती प्राप्त होऊन जैविक संख्येत वाढ होते.
 • जमिनीतील वेगवेगळ्या प्रकारच्या जिवाणूंना सेंद्रिय कर्बाद्वारे ऊर्जा पुरविली जाते.त्यामुळे त्यांची कार्यक्षमता चांगली होऊन अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते.
 • सेंद्रिय कर्बामुळे विकारांचे प्रमाण वाढून अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेवर चांगला परिणाम होतो.

सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी उपाय 

 •  पिकांच्या फेरपालटीत कडधान्य पिकांची लागवड करावी.
 •  दरवर्षी शिफारशीप्रमाणे शेवटच्या कुळवाच्या पाळीआधी जमिनीत सेंद्रिय खत मिसळून द्यावे.
 • उभ्या पिकात निंबोळी पेंडीचा वापर करावा.
 • पिकांच्या अवशेषांच्या आच्छादन म्हणून वापर करावा.उदा. खोडवा उसात पाचटाचे नियोजन करावे.
 •  क्षारपड जमिनीत धैंचा किंवा ताग जमिनीत पेरून दीड महिन्यात गाडावा.
 • चोपण जमिनीत सेंद्रिय व रासायनिक भूसुधारकांचा (उदा.प्रेसमड,जिप्सम) वापर करावा.आम्ल जमिनीत चुन्याचा वापर करावा.
 • कमीत कमी नांगरट करावी.बांधबंदिस्ती करून जमिनीची धूप कमी करावी.
 • जैविक खतांचा बीजप्रक्रियेद्वारे तसेच शेणखतात मिसळून जास्त वापर करावा.
 • ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचनाद्वारे पाणी व खतांचे नियोजन करावे.

– डॉ. आदिनाथ ताकटे,९४०४०३२३८९
( एकात्मिक शेती पद्धती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी)

News Item ID: 
820-news_story-1640264239-awsecm-820
Mobile Device Headline: 
शाश्वत शेतीसाठी सेंद्रिय कर्ब महत्त्वाचा…
Appearance Status Tags: 
Section News
जैविक आच्छादनामुळे जमिनीत सेंद्रिय घटक मिसळले जातात.जैविक आच्छादनामुळे जमिनीत सेंद्रिय घटक मिसळले जातात.
Mobile Body: 

English Headline: 
agricultural news in marathi Organic carbon is important for sustainable agriculture …
Author Type: 
External Author
डॉ. आदिनाथ ताकटे
आरोग्य health खत fertiliser हवामान शेती farming घटना incidents जैविक खते biofertiliser कडधान्य क्षारपड saline soil ताग jute ठिबक सिंचन सिंचन तुषार सिंचन sprinkler irrigation महात्मा फुले कृषी विद्यापीठ agriculture university
Search Functional Tags: 
आरोग्य, Health, खत, Fertiliser, हवामान, शेती, farming, घटना, Incidents, जैविक खते, Biofertiliser, कडधान्य, क्षारपड, Saline soil, ताग, Jute, ठिबक सिंचन, सिंचन, तुषार सिंचन, sprinkler irrigation, महात्मा फुले, कृषी विद्यापीठ, Agriculture University
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Organic carbon is important for sustainable agriculture …
Meta Description: 
Organic carbon is important for sustainable agriculture …
सेंद्रिय कर्बामुळे जमिनीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्मामध्ये सुधारणा होऊन जमिनीचे आरोग्य चांगले राहते. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जितके जास्त तितका जमिनीचा पोत चांगला.सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जितके जास्त तितकी जमिनीची सुपीकता चांगली.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment