शेतकरी नियोजनः शेळीपालन

शेळीपालनास सुरवात करण्यापूर्वी शेळ्यांच्या विविध जाती आणि व्यवसायातील सर्व बाबींचा अभ्यास केला. त्यातून आफ्रिकन बोअर जातीच्या शेळ्यांचे संगोपन करण्याचे ठरविले.  टप्प्याटप्प्याने शेळ्यांची संख्या वाढवत आज फार्ममध्ये लहान-मोठ्या मिळून ४० शेळ्या आणि उत्तम पैदासीसाठी आफ्रिकन बोअर जातीचा १ बोकड आहे.

नाव- सुमित राजेंद्र गरुड
गाव- जिंती, ता. फलटण, जि. सातारा.
एकूण शेळ्या – ४०
शेळ्यांची जात – आफ्रिकन बोअर

मी मागील दहा वर्षांपासून शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन करत आहे. या व्यवसायाला सुरवात करण्यापूर्वी शेळ्यांच्या विविध जातींचा आणि शेळीपालनातील सर्व बाबींचा अभ्यास केला होता. त्यातून आफ्रिकन बोअर जातीच्या शेळ्यांचे संगोपन आणि अर्थशास्त्र योग्य वाटल्यामुळे या शेळ्यांची निवड केली. एका शेळीपासून सुरवात करत पुढे टप्प्याटप्प्याने शेळ्यांची संख्या वाढवत नेली. आज फार्ममध्ये लहान-मोठ्या मिळून ४० शेळ्या आणि उत्तम पैदासीसाठी आफ्रिकन बोअर जातीचा १ बोकड आहे. शेळी फार्मला ‘माधवानंद गोट फार्म’ असे नाव दिले आहे. फार्मचा मुख्य व्यवसाय पैदाशीचा असून राज्यभरात शेळ्यांची विक्री केली जाते.

मागील १० वर्षांच्या शेळीपालनातील अनुभवातून फार्ममधील सर्व कामे आता करणे सोपस्कर झाले आहे. फार्ममधून वर्षाला साधारण ४० ते ४५ नगांपर्यंत पिल्लांची विक्री होते. मादी ४ हजार रुपये किलोप्रमाणे तर तर नर दीड हजार रुपये किलोप्रमाणे विक्री होते. पिल्ले साधारण २० ते २५ किलोची झाल्यानंतरच त्यांची विक्री केली जाते.

व्यवस्थापनातील बाबी 

 • शेळीपालन करताना प्रत्येक बाबीचे योग्य नियोजन करणे आवश्‍यक असते. शेळ्यांच्या अपेक्षित वाढीसाठी संतुलित खाद्याचा पुरवठा होणे गरजेचे आहे. त्यानुसार हिरव्या आणि सुक्या चाऱ्याचे नियोजन केले जाते.
 • सुक्या चाऱ्यासाठी वर्षभर पुरेल इतके तूर, सोयाबीन भुसकट आधीच खरेदी करून ठेवले जाते. विजापूर येथून वर्षभर पुरले एवढे तुरीचे भुसकट खरेदी केले जाते.
 • ओल्या चाऱ्यामध्ये मका, स्मार्ट नेपियर, सुपर नेपियर, मारवेल गवत, तुती, सुबाभूळ, शेवगा, मेथी, हादगा यांचा वापर केला जातो.
 • प्रतिदिन प्रति शेळी साधारण दीड किलो सुका चारा आणि ३ किलो हिरवा चारा लागतो.

दैनंदिन नियोजन 

 • फार्ममध्ये पहाटेपासून काम सुरू होते. सुरूवातील शेळ्या बाहेर काढून फार्म स्वच्छ केला जातो.
 • चाऱ्यामध्ये मका, शेंगदाणा पेंड प्रत्येकी १५० ग्रॅम तसेच तुरीचे भुसकट दिले जाते. या भुसकटामुळे शेळ्या भरपूर पाणी पितात.
 • साधारण ११ वाजता मक्याची कुट्टी दिली जाते. सायकांळी चार वाजता पुन्हा फार्मची स्वच्छता करून मका, शेंगदाणा पेंड व नंतर मेथी घास दिली जाते.
 • हिरव्या चाऱ्यामध्ये ४ ते ५ दिवसांनी बदल केला जातो. एकच चारा सतत दिला जात नाही. त्यामुळे शेळ्यादेखील आवडीने चारा खातात.
 • पिल्ले जन्मल्यानंतर त्यांना स्वच्छ केले जाते. नाळ व्यवस्थित कापून आयोडीन लावले जाते. नवजात पिल्लांची सुरुवातीचे १५ दिवस विशेष काळजी घेतली जाते.

– सुमीत गरुड, ९४२३८८१९०९
 
News Item ID: 
820-news_story-1637586448-awsecm-911
Mobile Device Headline: 
शेतकरी नियोजनः शेळीपालन
Appearance Status Tags: 
Section News
फार्ममधील आफ्रिकन बोअर जातीच्या नरासोबत सुमित गरुडफार्ममधील आफ्रिकन बोअर जातीच्या नरासोबत सुमित गरुड
Mobile Body: 

English Headline: 
agricultural news in marathi Farmer Planning: Goat farming
Author Type: 
External Author
विकास जाधव
शेळीपालन goat farming पूर floods व्यवसाय profession वर्षा varsha शेती farming अर्थशास्त्र economics तूर सोयाबीन नेपियर napier
Search Functional Tags: 
शेळीपालन, Goat Farming, पूर, Floods, व्यवसाय, Profession, वर्षा, Varsha, शेती, farming, अर्थशास्त्र, Economics, तूर, सोयाबीन, नेपियर, Napier
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Farmer Planning: Goat farming
Meta Description: 
Farmer Planning: Goat farming
शेळीपालनास सुरवात करण्यापूर्वी शेळ्यांच्या विविध जाती आणि व्यवसायातील सर्व बाबींचा अभ्यास केला. त्यातून आफ्रिकन बोअर जातीच्या शेळ्यांचे संगोपन करण्याचे ठरविले.  टप्प्याटप्प्याने शेळ्यांची संख्या वाढवत आज फार्ममध्ये लहान-मोठ्या मिळून ४० शेळ्या आणि उत्तम पैदासीसाठी आफ्रिकन बोअर जातीचा १ बोकड आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X