[ad_1]
पारपोली आणि बांदा (ता.सावंतवाडी) या ठिकाणी माझी ६० एकर शेती आहे.यापैकी आंबोलीच्या पायथ्याशी असलेल्या पारपोली या गावातील ५० एकरांमध्ये १२ वर्षांपूर्वी ५ बाय ५ बाय मीटर अंतरावर वेंगुर्ला चार या काजू जातीची लागवड केली आहे.
शेतकरी : शिवप्रसाद देसाई
गाव : बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
काजू क्षेत्र : ५० एकर
पारपोली आणि बांदा (ता.सावंतवाडी) या ठिकाणी माझी ६० एकर शेती आहे.यापैकी आंबोलीच्या पायथ्याशी असलेल्या पारपोली या गावातील ५० एकरांमध्ये १२ वर्षांपूर्वी ५ बाय ५ बाय मीटर अंतरावर वेंगुर्ला चार या काजू जातीची लागवड केली आहे. काजू पिकाचा हंगाम हा सर्वसाधारणपणे फेब्रुवारी ते एप्रिल असा असतो, परंतु या पिकाचे वर्षभर नियोजन करावे लागते. गेल्या बारा वर्षांत अनुभवातून पीक व्यवस्थापनात मी बदल केले आहेत. बागेला वन्यप्राण्यांपासून धोका निर्माण होऊ नये म्हणून संपूर्ण बागेला बॅटरीचलित सौर कुंपण केले आहे. नवीन लागवड करताना पहिल्या वर्षी प्लॅस्टिक आच्छादनाचे तंत्र वापरले होते. कोणत्याही प्रकारचे सिंचन न करता केवळ पावसाच्या पाण्यावर बागेची उभारणी केली. बागेत प्लॅस्टिक कागदाचा वापर करून जलकुंड तयार केले आहे. या कुंडामध्ये साचलेल्या पाण्याचा वापर फवारणी आणि संरक्षित सिंचनासाठी केला जातो.
बागेचे नियोजन
- मे महिन्यात काजूचा हंगाम पूर्णतः संपलेला असतो.त्यानंतर जून आणि जुलै महिन्यात रोगग्रस्त आणि मोडतोड झालेल्या झाडाच्या फांद्या काढून टाकतो. रिकाम्या जागेवर नवीन काजू रोपांची लागवड केली जाते. आजूबाजूच्या वाढलेल्या झाडांमुळे नवीन लावलेले कलम वाढत नाही, त्यामुळे रोप लावून त्यावर मार्च- एप्रिलमध्ये शेंडा कलम केले जाते. याचवेळी खोडकिडीच्या नियंत्रणासाठी उपाययोजना केली जाते.
- १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत मुसळधार पाऊस सुरू असतो. पावसाची उघडीप असते त्या वेळी झाडांना रासायनिक खते दिली जातात. खते देताना मागील हंगामातील उत्पादन व झाडांची वाढ लक्षात घेऊन खताची मात्रा निश्चित केली जाते. रासायनिक खतांसोबत झाडाच्या आकारानुसार शेणखत दिले जाते. झाडाच्या विस्ताराच्या आत खड्डे खोदून खते दिली जातात.
- ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात तणनाशकाची फवारणी केली जाते.या कालावधीत खोडकिडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे खोडकीड नियंत्रण, बुरशीजन्य रोगाने झाडाच्या बुंध्यावरील साल सडत असल्यास बोर्डो पेस्ट लावली जाते नवीन लागवडीला प्लॅस्टिक आच्छादन केले जाते. कीड नियंत्रणासाठी फवारणी केली जाते.
- डिसेंबर ते जानेवारी या महिन्यांमध्ये सुरुवातीला टी मॉस्किटो नियत्रंणासाठी आवश्यकतेनुसार दर चार आठवड्यांनी फवारण्या केल्या जातात. त्यानंतर दुसरी फवारणी केली जाते. काजू वेचणी सोपी होण्यासाठी पालापाचोळा व गवत एकत्र केले जाते. डोंगर उतारावर दहा मीटर अंतरावर समपातळीवर पालापाचोळा आणि गवताचे बांध बनवले जातात.
- फेब्रुवारी, मार्च महिन्यात काजुचा हंगाम सुरू होतो.झाडावर परिपक्व होऊन पडलेली काजू बी एक दिवस आड वेचली जातात. काजू बी बोंडापासून वेगळी करून धुतली जाते. धुतलेली काजू बी एक दिवस उन्हात वाळवली जाते. वाळलेल्या बीचा वर्गीकरणानुसार साठा केला जातो. दर्जेदार बी असल्यामुळे व्यापारी जागेवरून येऊन खरेदी करतात.
- एप्रिल व मे महिन्यात काजू हंगाम हळूहळू कमी होत असतो. परंतु उशिराने आलेल्या काही काजू बी मिळतात.या महिन्यामध्ये नवीन लागवडीसाठी रोप निर्मिती केली जाते. झाडावर वाळून राहिलेली बी काठीच्या साहाय्याने काढली जाते. पालापाचोळ्यात पडलेल्या काजू वेचण्याचे काम मेच्या दुसऱ्या आठवड्यानंतर केले जाते. या कालावधीत खोडकिडीच्या नियंत्रणाकडे लक्ष द्यावे लागते. बागेचे योग्य व्यवस्थापन असल्याने काजू बी चे चांगले उत्पादन मिळते, असा माझा अनुभव आहे.
– शिवप्रसाद देसाई, ९४२०८२१२४२

[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.