शेतकरी नियोजन – पीक केळी

एप्रिल व मे महिन्यातील केळी लागवडीमध्ये निसवण सुरू आहे. एप्रिलमधील लागवडीमध्ये निसवण ८० टक्के पूर्ण झाली आहे. जून ते सप्टेंबरमध्ये लागवड केलेल्या बागा वाढीच्या अवस्थेत आहेत. या सर्वच बागांमध्ये कमी तापमानामुळे येणाऱ्या समस्या रोखण्यासाठी योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.

शेतकरी- प्रेमानंद हरी महाजन
गाव – तांदलवाडी, ता.रावेर, जि.जळगाव
एकूण क्षेत्र – ११० एकर
केळी क्षेत्र – ५५ एकर (७५ हजार केळी झाडे )

मी ५५ एकरांत मे ते जुलैदरम्यान टप्प्याटप्याने केळी लागवड केली आहे. पीक फेरपालटीवर माझा विशेष भर असतो. निर्यातक्षम केळी उत्पादन घेण्याच्या दृष्टीने सर्व बाबींचे नियोजन केले जाते.

थंडीपासून बचावाबाबत कार्यवाही 

 • सध्या थंडीचा काळ सुरू झाला आहे. या काळात तापमान कमी-अधिक होते. कमी तापमानामुळे येणाऱ्या समस्या रोखण्यासाठी खते आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक असते. त्यामुळे सर्वच बागांमध्ये ड्रीपद्वारे दर आठ दिवसांनी प्रति एक हजार झाडांसाठी ५ किलो मॅग्नेशिअमची मात्रा दिली जात आहे. पुढील तीन महिने ही कार्यवाही केली सुरू राहणार आहे.
 • दर महिन्याला प्रति एक हजार झाडांना ड्रीपमधून डब्ल्यूडीसी प्रकारातील सल्फर (९० टक्के) २ किलो याप्रमाणे सर्व बागांना दिले जात आहे. ही मात्रा महिन्यातून एक वेळ ड्रीपद्वारे दिली जाईल.
 • एप्रिलमधील बागांची निसवण अधिक झाली आहे. थंडीमुळे घडांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. घडांचे थंडीपासून बचाव होण्यासाठी स्कर्टींग बॅग लावण्याचे काम सुरू आहे.
 • बागेमधील रोगग्रस्त पाने, फुटव्यांमुळे थंडीच्या काळात करपा रोगाचा प्रसार होण्याची शक्यता असते. त्यासाठी रोगग्रस्त पाने, फुटवे बागेबाहेर काढून त्यांची योग्य विल्हेवाट लावण्यात आली आहे.
 • एप्रिल व मे मधील लागवडीच्या बागांना रोज ३ तास तर लहान केळी बागांना रोज २ तास पाणी दिले जात आहे.

पुढील १५ दिवसातील नियोजन 

 • सर्व केळी बागांत सिंचनाचे काटेकोर नियोजन केले जाईल. कारण थंडीच्या दिवसांतही केळी पिकास पाण्याची योग्य मात्रा मिळणे गरजेचे असते. आवश्‍यकतेनुसार पाण्याचे प्रमाण ठरवून सिंचन केले जाईल.
 • जुलै, ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये लागवडीच्या केळी बागा वाढीच्या अवस्थेत आहे. तसेच एप्रिलच्या बागा निसवत आहेत. निसवण बऱ्यापैकी झालेल्या बागेत घडांना टॅगिंगची प्रक्रिया सुरू राहील.
 • वाढीच्या अवस्थेतील आणि निसवण सुरू असलेल्या बागांमध्ये थंडीला प्रतिकारक्षम अशा सूक्ष्मअन्नद्रव्यांची मात्रा दिली जाईल. तसेच सल्फर व मॅग्नेशिअमची मात्रा ड्रीपमधून दिली जाईल.
 • घडांना स्कर्टींग बॅग लावण्याचे काम पूर्ण केले जाईल. लागवड टप्प्याटप्प्याने केल्यामुळे निसवणीची प्रक्रिया सुरूच राहणार आहे.
 • जुलै व ऑगस्ट लागवडीमध्ये करपा रोग प्रतिबंधासंबंधी बुरशीनाशकांची फवारणी केली जाईल.
 • बाग स्वच्छ ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बागेत अस्वच्छता राहिल्यास रोगराई किंवा करप्यासारखे रोग येतात. त्यामुळे बागेतील पिवळी पाने, अनावश्यक फुटवे काढले जातील.

– प्रेमानंद महाजन- ९७६३८९३७७७
(दुपारी दोन ते तीन या वेळेस संपर्क साधावा)

News Item ID: 
820-news_story-1637149158-awsecm-943
Mobile Device Headline: 
शेतकरी नियोजन – पीक केळी
Appearance Status Tags: 
Section News
Premanand Mahajan's banana cultivation.Premanand Mahajan's banana cultivation.
Mobile Body: 

English Headline: 
agricultural news in marathi Farmer planning – crop banana
Author Type: 
External Author
चंद्रकांत जाधव
रावेर जळगाव jangaon थंडी सिंचन
Search Functional Tags: 
रावेर, जळगाव, Jangaon, थंडी, सिंचन
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Farmer planning – crop banana
Meta Description: 
Farmer planning – crop banana
एप्रिल व मे महिन्यातील केळी लागवडीमध्ये निसवण सुरू आहे. एप्रिलमधील लागवडीमध्ये निसवण ८० टक्के पूर्ण झाली आहे. जून ते सप्टेंबरमध्ये लागवड केलेल्या बागा वाढीच्या अवस्थेत आहेत. या सर्वच बागांमध्ये कमी तापमानामुळे येणाऱ्या समस्या रोखण्यासाठी योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X