Take a fresh look at your lifestyle.

शेतकरी नियोजन- पीक डाळिंब

0

मी मागील २० वर्षांपासून बागेमध्ये हस्त आणि आंबिया बहारात डाळिंब उत्पादन घेत आहे. हस्त आणि आंबिया बहराच्या बागेच्या प्रत्येकी सहा एकर क्षेत्रावर सुमारे ३००० झाडे आहेत. त्यापैकी ६ वर्षे वयाची १५०० झाडे आणि २ वर्षे वयाची १५०० झाडे आहेत. दर्जेदार उत्पादनासाठी त्या त्या हंगामात बागेचे नियोजन करतो.

शेतकरी ः महेंद्र विजयकुमार बाजारे
गाव ः महुद बुद्रुक, ता. सांगोला, जि. सोलापूर
एकूण क्षेत्र : १७ एकर
डाळिंब क्षेत्र:- १२ एकर (३०००झाडे)

महुद बुद्रुक (ता.सांगोला) येथे माझी १७ एकर शेती असून त्यात १२ एकरांवर डाळिंब लागवड आहे. उर्वरित क्षेत्रामध्ये मका, कडवळ या चारा पिकांची लागवड करतो. मी मागील २० वर्षांपासून बागेमध्ये हस्त आणि आंबिया बहारात डाळिंब उत्पादन घेत आहे. हस्त आणि आंबिया बहराच्या बागेच्या प्रत्येकी सहा एकर क्षेत्रावर सुमारे ३००० झाडे आहेत. त्यापैकी ६ वर्षे वयाची १५०० झाडे आणि २ वर्षे वयाची १५०० झाडे आहेत. दर्जेदार उत्पादनासाठी त्या त्या हंगामात बागेचे नियोजन करतो.

यावर्षी मे महिन्यात हस्त बहार आणि ऑक्टोबरमध्ये आंबे बहार धरला आहे. हस्त बहर धरलेल्या झाडांचे जून-ऑगस्ट महिन्यात तेलकट डाग आणि कुजव्या रोगामुळे ५० टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे सध्या आंबिया बहरावर लक्ष केंद्रित केले आहे. मी सध्या डाळिंब उत्पादक संघाचा महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीवर संचालक म्हणून काम पाहत आहे.

आंबिया बहराचे नियोजन 

 • आंबिया बहार धरण्यासाठी साधारण १ ऑक्टोबर रोजी पानगळ केली. त्यानंतर १३:०:४५, मॅग्नेशिअम सल्फेटची फवारणी केली.
 • पालवी फुटतेवेळी सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी घेतली.
 • ठिबकद्वारे दर ८ दिवसांनी विद्राव्य खते, सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या मात्रा दिल्या.
 • सध्या बाग कळी अवस्थेत आहे. कळीचा बहार चांगला दिसण्यास सुरुवात झाली आहे. फुलकिडे, मावा, तुडतुडे यांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक फवारण्या घेण्याचे काम सुरू आहे.
 • पाकळी कुजवा, काळपट डाग या रोगांसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून २० ऑक्टोबर रोजी बुरशीनाशकांची फवारणी घेतली.
 • सिंचनासाठी ३ विहीरी आणि बोअर मधील पाण्याचा ठिबकद्वारे वापर केला जातो. सध्या दिवसाआड १ तास सिंचन सुरू केले जात आहे.
 • बागेमध्ये तणनियंत्रणासाठी गरजेनुसार तणनाशकांचा वापर केला जातो.

पुढील २० दिवसांचे नियोजन 

 • येत्या काळात स्लरीसोबत पीएसबी, केएसबी ची मात्रा दिली जाईल.
 • तसेच १२ः६१ः० हे विद्राव्य खत ठिबकद्वारे देणार आहे.
 • सध्या थंडीच्या प्रमाणात वाढ होत असल्याने सिंचन कमी करणार आहे. वाफसा स्थितीचा अंदाज घेऊन सिंचन सुरु केले जाईल.
 • थंडीमुळे बागेत लवकर सेटिंग होण्यासाठी काळ्या गुळाची स्लरी दिली जाईल.
 • साधारण १५ नोव्हेंबरच्या दरम्यान झाडांच्या खोडांवर बोर्डो पेस्टचा वापर केला जाईल.

– महेंद्र बाजारे, ९४२१९४२९८५
 
News Item ID: 
820-news_story-1635769825-awsecm-823
Mobile Device Headline: 
शेतकरी नियोजन- पीक डाळिंब
Appearance Status Tags: 
Section News
Mahendra Bajare in his pomegranate orchard.Mahendra Bajare in his pomegranate orchard.
Mobile Body: 

English Headline: 
agricultural news in marathi Farmer Planning- Crop Pomegranate
Author Type: 
External Author
 सुदर्शन सुतार
वर्षा varsha डाळ डाळिंब मात mate विजयकुमार सोलापूर पूर floods महाराष्ट्र maharashtra खत fertiliser सिंचन थंडी
Search Functional Tags: 
वर्षा, Varsha, डाळ, डाळिंब, मात, mate, विजयकुमार, सोलापूर, पूर, Floods, महाराष्ट्र, Maharashtra, खत, Fertiliser, सिंचन, थंडी
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Farmer Planning- Crop Pomegranate
Meta Description: 
Farmer Planning- Crop Pomegranate
मी मागील २० वर्षांपासून बागेमध्ये हस्त आणि आंबिया बहारात डाळिंब उत्पादन घेत आहे. हस्त आणि आंबिया बहराच्या बागेच्या प्रत्येकी सहा एकर क्षेत्रावर सुमारे ३००० झाडे आहेत. त्यापैकी ६ वर्षे वयाची १५०० झाडे आणि २ वर्षे वयाची १५०० झाडे आहेत. दर्जेदार उत्पादनासाठी त्या त्या हंगामात बागेचे नियोजन करतो.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

X