शेतकरी नियोजन : पीक सीताफळ

शेतकरीः विलास तात्याबा काळे
गावः सोनोरी, ता पुरंदर, जि.पुणे
एकूण क्षेत्रः ८ एकर
सीताफळ क्षेत्रः २ एकर

माझी पुरंदर तालुक्यातील सोनोरी येथे आठ एकर शेती आहे. त्यापैकी दोन एकरावर सीताफळ आणि उर्वरित क्षेत्रामध्ये अंजीर, पेरू, चिकू, भुईमूग, गहू, ज्वारी, बाजरी या पिकांची लागवड आहे. एकूण लागवडीपैकी एक एकरावर १५ वर्षे वयाची ३०० झाडे आणि उरलेल्या १ एकरावर १० वर्षे वयाची २०० सीताफळ झाडे आहेत. योग्य व्यवस्थापनातून दर्जेदार उत्पादन घेण्यावर माझा भर असतो. इतर फळपिकांच्या तुलनेत सिताफळास कमी पाणी लागते. त्यामुळे कमी उत्पादन खर्चामध्ये अधिक उत्पादन आणि चांगला बाजारभाव देणारे फळझाड आहे.

यावर्षीचे नियोजन 

 • मे महिन्यात बागेची छाटणी केली. जुनी वाळलेली फळे आणि फांद्या काढून त्यांची योग्य विल्हेवाट लावली. त्यानंतर आंतरमशागतीची कामे केली.
 • खतांच्या मात्रा देण्यासाठी ट्रॅक्टरच्या साह्याने आळी तयार करून घेतली.
 • बहार धरण्याच्या एक महिनाआधी उपलब्धतेनुसार शेणखत, लेंडीखत, कोंबडीखताचा वापर करण्यात आला. त्यामुळे फळांचा रंग आणि प्रत उत्तम राहण्यास मदत होते.
 • साधारण जूनच्या पहिल्या आठवड्यात आवश्‍यकतेनुसार बागेस ठिबकद्वारे पाणी दिले.
 • सिताफळाला पालवी व कळी निघाल्यानंतर बुरशीजन्य आणि इतर रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी फवारणीचे नियोजन करण्यात आले.
 • फळधारणा झाल्यानंतर फळे काळी पडू नये यासाठी दर १५ दिवसांनी फवारणी केली.

काढणी आणि विक्री नियोजन 
फळांची योग्य परिपक्वतेला काढणी करणे महत्त्वाचे ठरते. त्यामुळे बाजारभाव चांगला मिळण्यास मदत होते. बाजारभावाची माहिती घेऊन विक्री नियोजन केले जाते. जेणेकरून चांगला दर मिळेल.

 • बहार धरल्यानंतर साधारण ९० दिवसांनी फळे काढणीस येतात. साधारण सप्टेंबर महिन्यापासून योग्य आकाराची फळे तयार होण्यास सुरुवात झाली. मजुरांच्या मदतीने फळे तोडण्यात आली. तोडलेल्या फळांची आकारमानानुसार प्रतवारी करून कॅरेटमध्ये भरली. आणि थेट सासवड, पुणे बाजार समितीत विक्रीसाठी पाठविली.
 • हंगामात रोज सीताफळांचे ३० ते ३५ कॅरेट विक्रीसाठी पाठविले जात. एक कॅरेट साधारण २० किलो वजनाचा असतो. प्रति किलो दहा ते १०० रूपयांपर्यत दर मिळाला. सरासरी ७० रूपयांपर्यत दर मिळाला.
 • सीताफळाच्या २ एकरातील ५०० झाडांपासून सुमारे साडेचार ते ५ टनांचे उत्पादन मिळाले.

– विलास काळे, ९८५०५१७६८३

News Item ID: 
820-news_story-1638794976-awsecm-448
Mobile Device Headline: 
शेतकरी नियोजन : पीक सीताफळ
Appearance Status Tags: 
Section News
सीताफळांची आकारमानानुसार प्रतवारी करताना विलास काळे.सीताफळांची आकारमानानुसार प्रतवारी करताना विलास काळे.
Mobile Body: 

शेतकरीः विलास तात्याबा काळे
गावः सोनोरी, ता पुरंदर, जि.पुणे
एकूण क्षेत्रः ८ एकर
सीताफळ क्षेत्रः २ एकर

माझी पुरंदर तालुक्यातील सोनोरी येथे आठ एकर शेती आहे. त्यापैकी दोन एकरावर सीताफळ आणि उर्वरित क्षेत्रामध्ये अंजीर, पेरू, चिकू, भुईमूग, गहू, ज्वारी, बाजरी या पिकांची लागवड आहे. एकूण लागवडीपैकी एक एकरावर १५ वर्षे वयाची ३०० झाडे आणि उरलेल्या १ एकरावर १० वर्षे वयाची २०० सीताफळ झाडे आहेत. योग्य व्यवस्थापनातून दर्जेदार उत्पादन घेण्यावर माझा भर असतो. इतर फळपिकांच्या तुलनेत सिताफळास कमी पाणी लागते. त्यामुळे कमी उत्पादन खर्चामध्ये अधिक उत्पादन आणि चांगला बाजारभाव देणारे फळझाड आहे.

यावर्षीचे नियोजन 

 • मे महिन्यात बागेची छाटणी केली. जुनी वाळलेली फळे आणि फांद्या काढून त्यांची योग्य विल्हेवाट लावली. त्यानंतर आंतरमशागतीची कामे केली.
 • खतांच्या मात्रा देण्यासाठी ट्रॅक्टरच्या साह्याने आळी तयार करून घेतली.
 • बहार धरण्याच्या एक महिनाआधी उपलब्धतेनुसार शेणखत, लेंडीखत, कोंबडीखताचा वापर करण्यात आला. त्यामुळे फळांचा रंग आणि प्रत उत्तम राहण्यास मदत होते.
 • साधारण जूनच्या पहिल्या आठवड्यात आवश्‍यकतेनुसार बागेस ठिबकद्वारे पाणी दिले.
 • सिताफळाला पालवी व कळी निघाल्यानंतर बुरशीजन्य आणि इतर रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी फवारणीचे नियोजन करण्यात आले.
 • फळधारणा झाल्यानंतर फळे काळी पडू नये यासाठी दर १५ दिवसांनी फवारणी केली.

काढणी आणि विक्री नियोजन 
फळांची योग्य परिपक्वतेला काढणी करणे महत्त्वाचे ठरते. त्यामुळे बाजारभाव चांगला मिळण्यास मदत होते. बाजारभावाची माहिती घेऊन विक्री नियोजन केले जाते. जेणेकरून चांगला दर मिळेल.

 • बहार धरल्यानंतर साधारण ९० दिवसांनी फळे काढणीस येतात. साधारण सप्टेंबर महिन्यापासून योग्य आकाराची फळे तयार होण्यास सुरुवात झाली. मजुरांच्या मदतीने फळे तोडण्यात आली. तोडलेल्या फळांची आकारमानानुसार प्रतवारी करून कॅरेटमध्ये भरली. आणि थेट सासवड, पुणे बाजार समितीत विक्रीसाठी पाठविली.
 • हंगामात रोज सीताफळांचे ३० ते ३५ कॅरेट विक्रीसाठी पाठविले जात. एक कॅरेट साधारण २० किलो वजनाचा असतो. प्रति किलो दहा ते १०० रूपयांपर्यत दर मिळाला. सरासरी ७० रूपयांपर्यत दर मिळाला.
 • सीताफळाच्या २ एकरातील ५०० झाडांपासून सुमारे साडेचार ते ५ टनांचे उत्पादन मिळाले.

– विलास काळे, ९८५०५१७६८३

English Headline: 
agricultural news in marathi Farmer Planning: Custard apple crop
Author Type: 
External Author
संदीप नवले
सीताफळ custard apple पुणे पुरंदर अंजीर भुईमूग groundnut गहू wheat खत fertiliser कोंबडी hen बाजार समिती agriculture market committee मात mate
Search Functional Tags: 
सीताफळ, Custard Apple, पुणे, पुरंदर, अंजीर, भुईमूग, Groundnut, गहू, wheat, खत, Fertiliser, कोंबडी, Hen, बाजार समिती, agriculture Market Committee, मात, mate
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Farmer Planning: Custard apple crop
Meta Description: 
Farmer Planning: Custard apple crop
दोन एकरापैकी एक एकरावर १५ वर्षे वयाची ३०० झाडे आणि उरलेल्या १ एकरावर १० वर्षे वयाची २०० सीताफळ झाडे आहेत. योग्य व्यवस्थापनातून दर्जेदार उत्पादन घेण्यावर माझा भर असतो.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment