शेतकरी नियोजन : हापूस आंबा

शेतकरी ः तुकाराम घवाळी
गावः शिरगाव जि. रत्नागिरी 
एकूण क्षेत्र ः २५ एकर
हापूस आंबा ः २० एकर (१००० झाडे)

आमची वडिलोपार्जित लागवड केलेली हापूस आंबा बाग आहे. आमची साधारण ५० वर्षांपूर्वीची आंबा लागवड आहे. त्यामध्ये साधारण १००० झाडे आहेत. सततच्या हवामान बदलाचा आंबा बागेवर विपरीत परिणाम होऊन कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. योग्य व्यवस्थापन करून बागेतून अधिक उत्पादन घेण्याचा आमचा प्रयत्न असतो.

मागील वर्षी हिवाळा सुरू झाल्यानंतर सुरवातीला थंडीचे प्रमाण कमी होते. त्यामुळे मोहोर येणाऱ्या कलमांना पालवी आल्याचे चित्र होते. तसेच ऑक्टोबरअखेरपर्यंत पाऊस लांबल्यामुळे पुढे हंगाम लांबत गेला. अचानक झालेल्या बदलामुळे झाडे पालवीला आली. परिणामी हंगाम लांबला. मार्च महिन्याच्या सुरुवातीला तुरळक आंबा होता. पुढे १५ मार्चनंतर बाजारात आंबा वाढू लागला होता. या काळात आवक कमी असल्यामुळे बाजारात दरही चढे होते.

या वर्षीचे नियोजन 

 • मागील दोन वर्षांपासून बागेत रासायनिक खतांच्या वापर तुलनेने कमी केला आहे. त्याऐवजी शेणखतावर विशेष भर दिला आहे. शेणखताच्या वापरामुळे झाडांचे आरोग्य चांगले राहते आहे.
 • जून महिन्यात पहिला पाऊस पडून गेल्यानंतर प्रति झाड २५ ते ३० किलो याप्रमाणे शेणखताची मात्रा दिली आहे. बागेतील झाडे ५० वर्षे वयाची असल्यामुळे शेणखताची अधिक मात्रा द्यावी लागते.
 • ऑगस्ट महिन्यात बागेमध्ये साफसफाई करून घेतली. त्यानंतर शिफारशीनुसार रासायनिक खतांची मात्रा दिली.
 • पावसाळी वातावरणामुळे झाडांवर बुरशी, तुडतुडे आणि अन्य किटकांचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यासाठी मोहोर येण्यापूर्वी शिफारशीत कीटकनाशक आणि बुरशीनाशकांची फवारणी केली जाते.
 • सिंचनासाठी २ विहिरींतील पाण्याचा वापर केला जातो. गरजेनुसार बागेस पाणीपुरवठा होतो.

पुढील ३० दिवसांचे नियोजन 

 • सध्या झाडे मोहोर येण्याच्या अवस्थेत आहे. झाडांना थोड्याफार प्रमाणात मोहोर आलेला आहे. परंतु अपेक्षित थंडी न पडल्यामुळे आलेला मोहोर टिकून राहण्याची शक्यता कमी आहे. थंडीचे प्रमाण चांगले राहिल्यास पुढे चांगला मोहोर मिळण्यास मदत होते.
 • ऑक्टोबरअखेरीस आणि नोव्हेंबरच्या सुरुवातीला पाऊस झाला होता. या काळात उष्णतेची आवश्‍यकता असते. मात्र पावसामुळे हे शक्य झाले नाही. अशा वातावरणामुळे मोहोर सुटण्यास तयार असलेल्या कलमांनादेखील आता पालवी येण्याची शक्यता आहे. याचा गतवर्षीप्रमाणे यंदाही आंबा हंगामावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
 • या काळात कीड-रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यासाठी कीटकनाशकांची फवारणी घेणे गरजेचे असते. आवश्‍यकतेनुसार बागेतील, बांधावरील तणनियंत्रण करून बाग स्वच्छ केली जाईल.
 • साधारण डिसेंबर, जानेवारीमध्ये मोहोरातून बारीक कैरी येण्यास सुरुवात होते. त्याची वाढ होण्यासाठी आणि आंबा तयार होण्यासाठी अपेक्षित वातावरण आवश्‍यक असते.

– तुकाराम घवाळी, ९४२११३९३३१

News Item ID: 
820-news_story-1636721078-awsecm-718
Mobile Device Headline: 
शेतकरी नियोजन : हापूस आंबा
Appearance Status Tags: 
Section News
तुकाराम घवाळी यांचा आंबा लागवडतुकाराम घवाळी यांचा आंबा लागवड
Mobile Body: 

English Headline: 
agricultural news in marathi Farmer Planning: alphanso Mango
Author Type: 
External Author
राजेश कळंबटे
हापूस वर्षा varsha हवामान थंडी ऊस पाऊस रासायनिक खत chemical fertiliser खत fertiliser आरोग्य health कीटकनाशक सिंचन पाणी water
Search Functional Tags: 
हापूस, वर्षा, Varsha, हवामान, थंडी, ऊस, पाऊस, रासायनिक खत, Chemical Fertiliser, खत, Fertiliser, आरोग्य, Health, कीटकनाशक, सिंचन, पाणी, Water
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Farmer Planning: alphanso Mango
Meta Description: 
Farmer Planning: alphanso Mango
आमची वडिलोपार्जित लागवड केलेली हापूस आंबा बाग आहे. आमची साधारण ५० वर्षांपूर्वीची आंबा लागवड आहे. त्यामध्ये साधारण १००० झाडे आहेत. सततच्या हवामान बदलाचा आंबा बागेवर विपरीत परिणाम होऊन कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. योग्य व्यवस्थापन करून बागेतून अधिक उत्पादन घेण्याचा आमचा प्रयत्न असतो.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X