शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर  विरोधकांकडून दिवाळीपूर्वीच फटाके 

बुलडाणा : शेतात हंगाम जोरावर सुरू आहे. दुसरीकडे दिवाळीची लगबग वाढली. अशा स्थितीत विरोधकांनी सत्तारूढ महाविकास आघाडीविरोधात जिल्ह्यात आंदोलने सुरू केली आहेत. दिवाळी पूर्वीच शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर फटाके फुटू लागले आहेत. मंगळवारी (ता. २६) दुपारी जिल्ह्यात जळगाव जामोद, खामगाव, चिखली या ठिकाणी भाजप आमदारांच्या नेतृत्वात आसूड मोर्चे निघाले. यानंतर आता इतर उपविभागातही मोर्चे निघतील. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचाही रविवारी (ता.३१) जिल्हाव्यापी मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. 

पीकविमा, या हंगामातील नुकसान भरपाई, विजेचे भारनियमन यासह शेतकऱ्यांच्या इतर मुद्यांवर विरोधकांनी शासनाविरुद्ध आंदोलने जाहीर केली आहेत. भाजपने मंगळवारी हजारोंच्या संख्येने मोर्चे काढून इशारा दिला. जळगाव जामोद येथे निघालेल्या मोर्चाला मार्गदर्शन करताना भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी मंत्री तथा आमदार डॉ. संजय कुटे म्हणाले, ‘‘शेतकरी सातत्याने अडचणीत असून, हे सरकार शेतकऱ्यांसाठी दररोज नवा संघर्ष उभा करीत आहे. शेतकऱ्यांना राज्य सरकारने वाऱ्यावर सोडले असून, भारतीय जनता पक्ष शेतकऱ्यांवरील अन्याय सहन करणार नाही.’’ 

नुकताच सन २०१९-२०चा पीकविमा मंजूर झाला. यामध्ये सुद्धा सरकारने भेदभाव केला. कुणाला १००, तर कुणाला हजार रुपये अशी तुटपुंजी मदत दिली. पिंपळगाव काळे, जळगाव जामोद, सोनाळा, बावनबीर, जलंब अशी महसूल मंडले पीकविम्यापासून वंचित राहिली. या वर्षीसुद्धा सातत्याने पाऊस पडत आहे. शेतकऱ्यांच्या सर्व पिकांची नासधूस झाली. आज शेतकऱ्यांची परिस्थिती भयंकर दयनीय आहे. शेतकऱ्यांचे घरातील, शेतातील विद्युत कनेक्शन तोडणे सुरू केले आहे. शेतकरी, कामकरी, दलित अल्पसंख्याक समाजासाठी या शासनाजवळ पैसा नाही. ज्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात कमिशन मिळते, अशा कामांसाठी टेंडर काढणे आणि त्याच कामावर पैसा खर्च करणे, हा एकमेव कार्यक्रम सरकारचा आहे.’’ 

खामगावमध्ये जिल्हाध्यक्ष आमदार आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले. मलकापूरमध्ये माजी आमदार चैनसुख संचेती यांनी नेतृत्व केले. तर चिखलीमध्ये आमदार श्‍वेता महाले यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले. 

रविवारी ‘स्वाभिमानी’चा एल्गार मोर्चा 
जिल्ह्यातील सोयाबीन, कापूस उत्पादकांच्या प्रश्‍नांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारी (ता.३१) जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार मोर्चा आयोजित केला आहे. संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघणार आहे. 

News Item ID: 
820-news_story-1635338177-awsecm-588
Mobile Device Headline: 
 शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर  विरोधकांकडून दिवाळीपूर्वीच फटाके 
Appearance Status Tags: 
Section News
 शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर  विरोधकांकडून दिवाळीपूर्वीच फटाके  On the questions of the farmers Firecrackers fired by protesters before Diwali शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर  विरोधकांकडून दिवाळीपूर्वीच फटाके  On the questions of the farmers Firecrackers fired by protesters before Diwali
Mobile Body: 

बुलडाणा : शेतात हंगाम जोरावर सुरू आहे. दुसरीकडे दिवाळीची लगबग वाढली. अशा स्थितीत विरोधकांनी सत्तारूढ महाविकास आघाडीविरोधात जिल्ह्यात आंदोलने सुरू केली आहेत. दिवाळी पूर्वीच शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर फटाके फुटू लागले आहेत. मंगळवारी (ता. २६) दुपारी जिल्ह्यात जळगाव जामोद, खामगाव, चिखली या ठिकाणी भाजप आमदारांच्या नेतृत्वात आसूड मोर्चे निघाले. यानंतर आता इतर उपविभागातही मोर्चे निघतील. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचाही रविवारी (ता.३१) जिल्हाव्यापी मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. 

पीकविमा, या हंगामातील नुकसान भरपाई, विजेचे भारनियमन यासह शेतकऱ्यांच्या इतर मुद्यांवर विरोधकांनी शासनाविरुद्ध आंदोलने जाहीर केली आहेत. भाजपने मंगळवारी हजारोंच्या संख्येने मोर्चे काढून इशारा दिला. जळगाव जामोद येथे निघालेल्या मोर्चाला मार्गदर्शन करताना भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी मंत्री तथा आमदार डॉ. संजय कुटे म्हणाले, ‘‘शेतकरी सातत्याने अडचणीत असून, हे सरकार शेतकऱ्यांसाठी दररोज नवा संघर्ष उभा करीत आहे. शेतकऱ्यांना राज्य सरकारने वाऱ्यावर सोडले असून, भारतीय जनता पक्ष शेतकऱ्यांवरील अन्याय सहन करणार नाही.’’ 

नुकताच सन २०१९-२०चा पीकविमा मंजूर झाला. यामध्ये सुद्धा सरकारने भेदभाव केला. कुणाला १००, तर कुणाला हजार रुपये अशी तुटपुंजी मदत दिली. पिंपळगाव काळे, जळगाव जामोद, सोनाळा, बावनबीर, जलंब अशी महसूल मंडले पीकविम्यापासून वंचित राहिली. या वर्षीसुद्धा सातत्याने पाऊस पडत आहे. शेतकऱ्यांच्या सर्व पिकांची नासधूस झाली. आज शेतकऱ्यांची परिस्थिती भयंकर दयनीय आहे. शेतकऱ्यांचे घरातील, शेतातील विद्युत कनेक्शन तोडणे सुरू केले आहे. शेतकरी, कामकरी, दलित अल्पसंख्याक समाजासाठी या शासनाजवळ पैसा नाही. ज्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात कमिशन मिळते, अशा कामांसाठी टेंडर काढणे आणि त्याच कामावर पैसा खर्च करणे, हा एकमेव कार्यक्रम सरकारचा आहे.’’ 

खामगावमध्ये जिल्हाध्यक्ष आमदार आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले. मलकापूरमध्ये माजी आमदार चैनसुख संचेती यांनी नेतृत्व केले. तर चिखलीमध्ये आमदार श्‍वेता महाले यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले. 

रविवारी ‘स्वाभिमानी’चा एल्गार मोर्चा 
जिल्ह्यातील सोयाबीन, कापूस उत्पादकांच्या प्रश्‍नांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारी (ता.३१) जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार मोर्चा आयोजित केला आहे. संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघणार आहे. 

English Headline: 
Agriculture News in Marathi On the questions of the farmers Firecrackers fired by protesters before Diwali
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
दिवाळी विकास आंदोलन agitation जळगाव jangaon खामगाव khamgaon भाजप जिल्हाधिकारी कार्यालय भारनियमन आमदार सरकार government भारत ऊस पाऊस दलित सोयाबीन कापूस खासदार रविकांत तुपकर ravikant tupkar
Search Functional Tags: 
दिवाळी, विकास, आंदोलन, agitation, जळगाव, Jangaon, खामगाव, Khamgaon, भाजप, जिल्हाधिकारी कार्यालय, भारनियमन, आमदार, सरकार, Government, भारत, ऊस, पाऊस, दलित, सोयाबीन, कापूस, खासदार, रविकांत तुपकर, Ravikant Tupkar
Twitter Publish: 
Meta Keyword: 
On the questions of the farmers Firecrackers fired by protesters before Diwali
Meta Description: 
On the questions of the farmers
Firecrackers fired by protesters before Diwali
शेतात हंगाम जोरावर सुरू आहे. दुसरीकडे दिवाळीची लगबग वाढली. अशा स्थितीत विरोधकांनी सत्तारूढ महाविकास आघाडीविरोधात जिल्ह्यात आंदोलने सुरू केली आहेत. दिवाळी पूर्वीच शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर फटाके फुटू लागले आहेत.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X