शेतकऱ्यांना अखेर मिळाली पुरस्काराची रक्कम…

औरंगाबाद : कृषी विभागातील शेतकऱ्यांना पीक स्पर्धेतील पुरस्काराची रक्कम दिवाळीपूर्वी खात्यावर मिळणे सुरू झाले. रखडलेली ही रक्कम मिळणे सुरू झाल्यानंतर केवळ ‘ॲग्रोवन’मुळेच आमची दिवाळी गोड झाल्याची भावना बक्षीस विजेते शेतकरी व्यक्त करीत आहेत.

शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पिकाचे उत्पादन वाढविण्याकरिता शेतकऱ्यांमध्ये चुरस निर्माण व्हावी यासाठी राज्यात विविध हंगामात पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. गत (२०२०-२१) रब्बी हंगामात या अनुषंगाने तालुका, जिल्हा, विभाग व राज्य पातळीवर पीक स्पर्धा आयोजित केली गेली होती. गतवर्षीच्या या रब्बी हंगामात आयोजित करण्यात आलेल्या पीक स्पर्धेत सहभागी होऊन विजयी ठरलेल्या शेतकऱ्यांना ‘कृषी दिनी’ प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. परंतु या शेतकऱ्यांना जाहीर प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकासाठीची पुरस्काराची रक्कम मात्र खात्यावर मिळण्याची प्रतीक्षा होती. 

या स्पर्धेत औरंगाबाद विभागातून रब्बी ज्वारी पिकात प्रथम क्रमांक सुंदर आगलावे, द्वितीय विलास भेरे तर तृतीय क्रमांक काकासाहेब भोसले यांनी पटकाविला होता. गहू पिकात हिराबाई त्रिभुवन यांनी प्रथम तर मारुती घोलप द्वितीय व लताबाई भोसले यांनी तृतीय तसेच हरभरा पिकात श्रीकांत आखाडे यांनी प्रथम, गणेश पायघन यांनी द्वितीय तर बाबासाहेब भुसारे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला होता. विभागस्तरा प्रमाणेच जिल्हा व तालुका पातळीवर देखील पीक स्पर्धेत विजेत्या शेतकऱ्यांना प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक विविध पिकांतर्गत देण्यात आले होते. 

पीकस्पर्धेत विजेत्या ठरलेल्या या हंगामातील सर्व स्पर्धकांना  अध्यापर्यंत पुरस्काराची रक्कम मिळणे बाकी होते. यासंदर्भात  विचारणा करता तेव्हा वरूनच पैसे आले नाही, आले की रक्कम खात्यावर मिळेल असे उत्तर मिळत होते. जाहीर पुरस्कार रक्कम वितरित करण्याला होणार विलंब पाहता शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून जर शासन अशा पीक स्पर्धा घेत असेल तर त्याअंतर्गत पुरस्काराची रक्कम तत्काळ प्रभावाने शेतकऱ्यांच्या खात्यावर वळती करायला नको का? असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाल्याने ‘ॲग्रोवन’ने याविषयी वृत्त प्रकाशित केले. त्याचा परिणाम म्हणून शासन व प्रशासनातील यंत्रणा खडबडून जागी झाली.ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात विजेत्या शेतकऱ्यांना खात्यावर बक्षिसाची रक्कम मिळणे सुरू झाले. त्यामुळे विजेत्या व पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया..
शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन कार्यक्रमात गौरविले परंतु पुरस्काराची रक्कम मात्र अजून खात्यावर मिळत नव्हती. पाठपुरावा करूनही उपयोग होईना. तेव्हा ‘ॲग्रोवन’ने आमचा आवाज शासन दरबारी पोहोचविला अन् बक्षिसाची रक्कम आमच्या खात्यावर जमा होणे सुरू झाल्याने आमची दिवाळी गोड झाली.
– विलास भेरे,
रब्बी पीक स्पर्धेत विभाग स्तरावर विजेते शेतकरी

News Item ID: 
820-news_story-1635918170-awsecm-153
Mobile Device Headline: 
शेतकऱ्यांना अखेर मिळाली पुरस्काराची रक्कम…
Appearance Status Tags: 
Tajya News
शेतकऱ्यांना अखेर मिळाली पुरस्काराची रक्कम...शेतकऱ्यांना अखेर मिळाली पुरस्काराची रक्कम...
Mobile Body: 

औरंगाबाद : कृषी विभागातील शेतकऱ्यांना पीक स्पर्धेतील पुरस्काराची रक्कम दिवाळीपूर्वी खात्यावर मिळणे सुरू झाले. रखडलेली ही रक्कम मिळणे सुरू झाल्यानंतर केवळ ‘ॲग्रोवन’मुळेच आमची दिवाळी गोड झाल्याची भावना बक्षीस विजेते शेतकरी व्यक्त करीत आहेत.

शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पिकाचे उत्पादन वाढविण्याकरिता शेतकऱ्यांमध्ये चुरस निर्माण व्हावी यासाठी राज्यात विविध हंगामात पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. गत (२०२०-२१) रब्बी हंगामात या अनुषंगाने तालुका, जिल्हा, विभाग व राज्य पातळीवर पीक स्पर्धा आयोजित केली गेली होती. गतवर्षीच्या या रब्बी हंगामात आयोजित करण्यात आलेल्या पीक स्पर्धेत सहभागी होऊन विजयी ठरलेल्या शेतकऱ्यांना ‘कृषी दिनी’ प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. परंतु या शेतकऱ्यांना जाहीर प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकासाठीची पुरस्काराची रक्कम मात्र खात्यावर मिळण्याची प्रतीक्षा होती. 

या स्पर्धेत औरंगाबाद विभागातून रब्बी ज्वारी पिकात प्रथम क्रमांक सुंदर आगलावे, द्वितीय विलास भेरे तर तृतीय क्रमांक काकासाहेब भोसले यांनी पटकाविला होता. गहू पिकात हिराबाई त्रिभुवन यांनी प्रथम तर मारुती घोलप द्वितीय व लताबाई भोसले यांनी तृतीय तसेच हरभरा पिकात श्रीकांत आखाडे यांनी प्रथम, गणेश पायघन यांनी द्वितीय तर बाबासाहेब भुसारे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला होता. विभागस्तरा प्रमाणेच जिल्हा व तालुका पातळीवर देखील पीक स्पर्धेत विजेत्या शेतकऱ्यांना प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक विविध पिकांतर्गत देण्यात आले होते. 

पीकस्पर्धेत विजेत्या ठरलेल्या या हंगामातील सर्व स्पर्धकांना  अध्यापर्यंत पुरस्काराची रक्कम मिळणे बाकी होते. यासंदर्भात  विचारणा करता तेव्हा वरूनच पैसे आले नाही, आले की रक्कम खात्यावर मिळेल असे उत्तर मिळत होते. जाहीर पुरस्कार रक्कम वितरित करण्याला होणार विलंब पाहता शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून जर शासन अशा पीक स्पर्धा घेत असेल तर त्याअंतर्गत पुरस्काराची रक्कम तत्काळ प्रभावाने शेतकऱ्यांच्या खात्यावर वळती करायला नको का? असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाल्याने ‘ॲग्रोवन’ने याविषयी वृत्त प्रकाशित केले. त्याचा परिणाम म्हणून शासन व प्रशासनातील यंत्रणा खडबडून जागी झाली.ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात विजेत्या शेतकऱ्यांना खात्यावर बक्षिसाची रक्कम मिळणे सुरू झाले. त्यामुळे विजेत्या व पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया..
शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन कार्यक्रमात गौरविले परंतु पुरस्काराची रक्कम मात्र अजून खात्यावर मिळत नव्हती. पाठपुरावा करूनही उपयोग होईना. तेव्हा ‘ॲग्रोवन’ने आमचा आवाज शासन दरबारी पोहोचविला अन् बक्षिसाची रक्कम आमच्या खात्यावर जमा होणे सुरू झाल्याने आमची दिवाळी गोड झाली.
– विलास भेरे,
रब्बी पीक स्पर्धेत विभाग स्तरावर विजेते शेतकरी

English Headline: 
agriculture news in marathi The farmers finally got the prize money
Author Type: 
External Author
संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा
कृषी विभाग agriculture department विभाग sections पुरस्कार awards दिवाळी वन forest शेतकरी औरंगाबाद aurangabad मात mate रब्बी हंगाम स्पर्धा day गहू wheat बाबा baba विषय topics प्रशासन administrations
Search Functional Tags: 
कृषी विभाग, Agriculture Department, विभाग, Sections, पुरस्कार, Awards, दिवाळी, वन, forest, शेतकरी, औरंगाबाद, Aurangabad, मात, mate, रब्बी हंगाम, स्पर्धा, Day, गहू, wheat, बाबा, Baba, विषय, Topics, प्रशासन, Administrations
Twitter Publish: 
Meta Keyword: 
The farmers finally got the prize money
Meta Description: 
The farmers finally got the prize money
कृषी विभागातील शेतकऱ्यांना पीक स्पर्धेतील पुरस्काराची रक्कम दिवाळीपूर्वी खात्यावर मिळणे सुरू झाले. रखडलेली ही रक्कम मिळणे सुरू झाल्यानंतर केवळ ‘ॲग्रोवन’मुळेच आमची दिवाळी गोड झाल्याची भावना बक्षीस विजेते शेतकरी व्यक्त करीत आहेत.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X