शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज : हसन मुश्रीफ

कोल्हापूर  : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतचे पीककर्ज बिनव्याजी देण्याची घोषणा ग्रामविकास मंत्री, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी रविवारी केली. पाच फेब्रुवारीला होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत याला मंजुरी घेतली जाणार असल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले. कोल्हापूर जिल्हा सहकारी (केडीसीसी) मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या ई-लॉबीसह युपीआय पेमेंट, मायक्रो एटीएम व मोबाइल व्हॅन अनावरण व नूतन इमारत भूमीपूजन करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. 

 मुश्रीफ म्हणाले,  ‘‘कर्जमाफी रद्द झाल्यानंतर ज्या संस्थांकडून व्याज वसुली सुरू आहे, ती बंद केली जाणार आहे. तसेच, आकारलेले व्याज परत दिले जाणार आहे. जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांपासून १८ ते २० कोटी रुपये कर भरतो. या वर्षीही नफा वाढल्यामुळे तेवढाच कर भरावा लागेल. कोरोनाच्या काळामध्ये जिल्हा बॅंकेचा व्यवसाय कमी होईल, अशी भीती होती. पण डिसेंबरनंतर चांगले चित्र आहे. शेतकऱ्यांना एक लाखापर्यंतचे पीककर्ज बिनव्याजी देत होतो.

तीन लाखांपर्यंतचे कर्ज दोन टक्के व्याज दराने देत होतो. शेतकऱ्यांना आता तीन लाखापर्यंतचे पीककर्ज बिनव्याजी द्यावे, असा प्रस्ताव बोर्डासमोर आणला जाईल. पाच फेब्रुवारीला बॅंकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर केला जाईल. एक एप्रिलपासून कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे सहा लाखांहून अधिक शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतचे पीककर्ज बिनव्याजी दिले जाईल.’’

या वेळी, आमदार पी. एन. पाटील, राजेश पाटील, माजी खासदार निवेदिता माने, बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ए. बी. माने, प्रशासकीय व्यवस्थापक जी. एम. शिंदे आदी उपस्थित होते.

मुश्रीफ म्हणाले…
  पाच फेब्रुवारीच्या वार्षिक सभेत मंजुरी घेणार
  सहा लाखांहून अधिक शेतकऱ्यांना होणार लाभ 
  ई-लॉबी, युपीआय पेमेंट, मायक्रो एटीएम, मोबाइल व्हॅन सुरू

News Item ID: 
820-news_story-1609167512-awsecm-784
Mobile Device Headline: 
शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज : हसन मुश्रीफ
Appearance Status Tags: 
Tajya News
शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज : हसन मुश्रीफ Interest free loan up to Rs 3 lakh to farmers: Hasan Mushrifशेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज : हसन मुश्रीफ Interest free loan up to Rs 3 lakh to farmers: Hasan Mushrif
Mobile Body: 

कोल्हापूर  : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतचे पीककर्ज बिनव्याजी देण्याची घोषणा ग्रामविकास मंत्री, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी रविवारी केली. पाच फेब्रुवारीला होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत याला मंजुरी घेतली जाणार असल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले. कोल्हापूर जिल्हा सहकारी (केडीसीसी) मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या ई-लॉबीसह युपीआय पेमेंट, मायक्रो एटीएम व मोबाइल व्हॅन अनावरण व नूतन इमारत भूमीपूजन करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. 

 मुश्रीफ म्हणाले,  ‘‘कर्जमाफी रद्द झाल्यानंतर ज्या संस्थांकडून व्याज वसुली सुरू आहे, ती बंद केली जाणार आहे. तसेच, आकारलेले व्याज परत दिले जाणार आहे. जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांपासून १८ ते २० कोटी रुपये कर भरतो. या वर्षीही नफा वाढल्यामुळे तेवढाच कर भरावा लागेल. कोरोनाच्या काळामध्ये जिल्हा बॅंकेचा व्यवसाय कमी होईल, अशी भीती होती. पण डिसेंबरनंतर चांगले चित्र आहे. शेतकऱ्यांना एक लाखापर्यंतचे पीककर्ज बिनव्याजी देत होतो.

तीन लाखांपर्यंतचे कर्ज दोन टक्के व्याज दराने देत होतो. शेतकऱ्यांना आता तीन लाखापर्यंतचे पीककर्ज बिनव्याजी द्यावे, असा प्रस्ताव बोर्डासमोर आणला जाईल. पाच फेब्रुवारीला बॅंकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर केला जाईल. एक एप्रिलपासून कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे सहा लाखांहून अधिक शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतचे पीककर्ज बिनव्याजी दिले जाईल.’’

या वेळी, आमदार पी. एन. पाटील, राजेश पाटील, माजी खासदार निवेदिता माने, बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ए. बी. माने, प्रशासकीय व्यवस्थापक जी. एम. शिंदे आदी उपस्थित होते.

मुश्रीफ म्हणाले…
  पाच फेब्रुवारीच्या वार्षिक सभेत मंजुरी घेणार
  सहा लाखांहून अधिक शेतकऱ्यांना होणार लाभ 
  ई-लॉबी, युपीआय पेमेंट, मायक्रो एटीएम, मोबाइल व्हॅन सुरू

English Headline: 
Agriculture news in marathiInterest free loan up to Rs 3 lakh to farmers: Hasan Mushrif
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
पीककर्ज कर्ज ग्रामविकास rural development कोल्हापूर पूर floods हसन मुश्रीफ hassan mushriff एटीएम व्याज वर्षा varsha कोरोना corona व्यवसाय profession आमदार खासदार
Search Functional Tags: 
पीककर्ज, कर्ज, ग्रामविकास, Rural Development, कोल्हापूर, पूर, Floods, हसन मुश्रीफ, Hassan Mushriff, एटीएम, व्याज, वर्षा, Varsha, कोरोना, Corona, व्यवसाय, Profession, आमदार, खासदार
Twitter Publish: 
Meta Keyword: 
शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज : हसन मुश्रीफ Interest free loan up to Rs 3 lakh to farmers: Hasan Mushrif
Meta Description: 
Interest free loan up to Rs 3 lakh to farmers: Hasan Mushrif
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतचे पीककर्ज बिनव्याजी देण्याची घोषणा ग्रामविकास मंत्री, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी रविवारी केली. Source link

Leave a Comment

X