शेतकऱ्यांना पैसे मागितल्या  प्रकरणाची चौकशी सुरू 

बुलडाणा : नुकसानग्रस्त भागात पंचनामे करणाऱ्या विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांना ५०० रुपये मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे शासकीय सुटीच्या काळात आणि कृषी विभागाला माहिती न देता हे प्रतिनिधींनी परस्पर शेतकऱ्यांकडे पैशांची मागणी केल्याचा आरोप आहे. या बाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांमार्फत रायपूर पोलिसात विमा कंपनीच्या प्रतिनिधीविरुद्ध फसवणुकीची तक्रार देण्यात आली असून, अद्याप हे प्रकरण चौकशीवर ठेवण्यात आले आहे. पोलिसांकडून शेतकरी, कृषी विभागाचे अधिकारी व इतरांचे जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते. 

जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात मोठे नुकसान झालेले आहे. ऑक्टोबर महिन्यातही पावसाने नुकसान झाले. झालेल्या नुकसानाबाबत विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी तत्काळ संदेश दिले होते. त्यानंतर सर्वेक्षण सुरू करण्यात आले होते. याचाच भाग म्हणून विमा कंपनीचे प्रतिनिधी जिल्ह्यातील शिरपूर, माळवंडी येथे गेले होते. या वेळी त्यांनी १९ शेतकऱ्यांकडून प्रत्येकी ५०० रुपये घेतल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले. 

वास्तविक विमा कंपनीकडून दिवाळीपूर्वीच जिल्ह्यात सर्वेक्षण पूर्ण झाल्याचे ई-मेलद्वारे जिल्हा कृषी विभागाला कळविण्यात आले होते. त्यानंतरही हे प्रतिनिधी सर्वेक्षणाच्या नावाखाली गावांमध्ये जाऊन पैसे गोळा करीत होते, हे यावरून स्पष्ट झाले. खोटा अहवाल देणे, कृषी विभागाला न कळवता परस्पर शासकीय सुटीच्या दिवशी शेतकऱ्यांचे पंचनामे करणे अशा प्रकारचे आक्षेप घेत पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. हा शुद्ध फसवणुकीचा प्रकार असल्याने पोलिसांकडून आधी संपूर्ण प्रकरणाची चौकशी, जबाब नोंदविण्याची प्रक्रिया राबवली जात आहे. त्यानंतरच गुन्हे दाखल केले जातील, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. 

सर्वेक्षण झाल्यानंतरही पैशांची मागणी? 
या हंगामासाठी जिल्ह्यात रिलायन्स विमा कंपनी नेमण्यात आलेली आहे. या कंपनीकडून जिल्ह्यात १०० टक्के सर्वेक्षण झाल्याचे २ नोव्हेंबरला कृषी अधीक्षक कार्यालयास ई-मेलद्वारे कळवण्यात आल्याचा दावा केला जात आहे. विमा योजनेत भाग घेतलेल्या १ लाख २४ हजार ५६८ शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत कंपनीला नुकसानीची माहिती दिली होती. योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार १०० टक्के सर्वेक्षण पूर्ण झाल्याचा अहवाल विमा कंपनीने २ नोव्हेंबर रोजी जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाला पाठविला होता. असे असतानाही विमा कंपनी प्रतिनिधींनी ४ व ५ नोव्हेंबरला शिरपूर, माळवंडी या गावात सुटीच्या दिवशी जाऊन शेतकऱ्यांसोबत संपर्क केला. तसेच प्रति शेतकरी ५०० रुपये रक्कम वसूल केल्याचा आरोप आहे.

जिल्ह्यात इतरही भागांत अशाच प्रकारची वसुली झाल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. त्यामुळेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडून १३ नोव्हेंबरला रायपूर पोलिस ठाण्यात रिलायन्स पीकविमा कंपनीच्या प्रतिनिधींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

News Item ID: 
820-news_story-1637156627-awsecm-875
Mobile Device Headline: 
शेतकऱ्यांना पैसे मागितल्या  प्रकरणाची चौकशी सुरू 
Appearance Status Tags: 
Mukhya News
Farmers were asked for money An inquiry into the matter is underwayFarmers were asked for money An inquiry into the matter is underway
Mobile Body: 

बुलडाणा : नुकसानग्रस्त भागात पंचनामे करणाऱ्या विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांना ५०० रुपये मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे शासकीय सुटीच्या काळात आणि कृषी विभागाला माहिती न देता हे प्रतिनिधींनी परस्पर शेतकऱ्यांकडे पैशांची मागणी केल्याचा आरोप आहे. या बाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांमार्फत रायपूर पोलिसात विमा कंपनीच्या प्रतिनिधीविरुद्ध फसवणुकीची तक्रार देण्यात आली असून, अद्याप हे प्रकरण चौकशीवर ठेवण्यात आले आहे. पोलिसांकडून शेतकरी, कृषी विभागाचे अधिकारी व इतरांचे जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते. 

जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात मोठे नुकसान झालेले आहे. ऑक्टोबर महिन्यातही पावसाने नुकसान झाले. झालेल्या नुकसानाबाबत विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी तत्काळ संदेश दिले होते. त्यानंतर सर्वेक्षण सुरू करण्यात आले होते. याचाच भाग म्हणून विमा कंपनीचे प्रतिनिधी जिल्ह्यातील शिरपूर, माळवंडी येथे गेले होते. या वेळी त्यांनी १९ शेतकऱ्यांकडून प्रत्येकी ५०० रुपये घेतल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले. 

वास्तविक विमा कंपनीकडून दिवाळीपूर्वीच जिल्ह्यात सर्वेक्षण पूर्ण झाल्याचे ई-मेलद्वारे जिल्हा कृषी विभागाला कळविण्यात आले होते. त्यानंतरही हे प्रतिनिधी सर्वेक्षणाच्या नावाखाली गावांमध्ये जाऊन पैसे गोळा करीत होते, हे यावरून स्पष्ट झाले. खोटा अहवाल देणे, कृषी विभागाला न कळवता परस्पर शासकीय सुटीच्या दिवशी शेतकऱ्यांचे पंचनामे करणे अशा प्रकारचे आक्षेप घेत पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. हा शुद्ध फसवणुकीचा प्रकार असल्याने पोलिसांकडून आधी संपूर्ण प्रकरणाची चौकशी, जबाब नोंदविण्याची प्रक्रिया राबवली जात आहे. त्यानंतरच गुन्हे दाखल केले जातील, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. 

सर्वेक्षण झाल्यानंतरही पैशांची मागणी? 
या हंगामासाठी जिल्ह्यात रिलायन्स विमा कंपनी नेमण्यात आलेली आहे. या कंपनीकडून जिल्ह्यात १०० टक्के सर्वेक्षण झाल्याचे २ नोव्हेंबरला कृषी अधीक्षक कार्यालयास ई-मेलद्वारे कळवण्यात आल्याचा दावा केला जात आहे. विमा योजनेत भाग घेतलेल्या १ लाख २४ हजार ५६८ शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत कंपनीला नुकसानीची माहिती दिली होती. योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार १०० टक्के सर्वेक्षण पूर्ण झाल्याचा अहवाल विमा कंपनीने २ नोव्हेंबर रोजी जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाला पाठविला होता. असे असतानाही विमा कंपनी प्रतिनिधींनी ४ व ५ नोव्हेंबरला शिरपूर, माळवंडी या गावात सुटीच्या दिवशी जाऊन शेतकऱ्यांसोबत संपर्क केला. तसेच प्रति शेतकरी ५०० रुपये रक्कम वसूल केल्याचा आरोप आहे.

जिल्ह्यात इतरही भागांत अशाच प्रकारची वसुली झाल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. त्यामुळेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडून १३ नोव्हेंबरला रायपूर पोलिस ठाण्यात रिलायन्स पीकविमा कंपनीच्या प्रतिनिधींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

English Headline: 
Agriculture News in Marathi Farmers were asked for money An inquiry into the matter is underway
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
विमा कंपनी कंपनी company कृषी विभाग agriculture department विभाग sections खरीप मात mate दिवाळी रिलायन्स पोलिस
Search Functional Tags: 
विमा कंपनी, कंपनी, Company, कृषी विभाग, Agriculture Department, विभाग, Sections, खरीप, मात, mate, दिवाळी, रिलायन्स, पोलिस
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Farmers were asked for money An inquiry into the matter is underway
Meta Description: 
Farmers were asked for money An inquiry into the matter is underway
नुकसानग्रस्त भागात पंचनामे करणाऱ्या विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांना ५०० रुपये मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे शासकीय सुटीच्या काळात आणि कृषी विभागाला माहिती न देता हे प्रतिनिधींनी परस्पर शेतकऱ्यांकडे पैशांची मागणी केल्याचा आरोप आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X