शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करू ः भुसे

नाशिक : जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादकांचे  नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री दादा भुसे यांनी जिल्ह्यातील चांदवड व दिंडोरी तालुक्यात नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी केली. या नुकसानीचा अहवाल सरकारला सादर करण्याचेही त्यांनी यंत्रणेला आदेश दिले. ‘‘अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करू,’’ अशी ग्वाही भुसे यांनी या वेळी दिली. 

अवकाळी पावसाने द्राक्ष बागांसह शेतीपिकांचे नुकसान केले आहे. भुसे यांनी कोरोनातून बरे होताच मंगळवारी (ता. १३) थेट पिकांच्या नुकसानीचा पाहणी दौरा  केला. त्यांच्यासमवेत चांदवड- देवळ्याचे आमदार डॉ. राहुल आहेर, माजी आमदार धनराज महाले, उपविभागीय कृषी अधिकारी गोकूळ वाघ, तालुका कृषी अधिकारी विलास सोनवणे आदी उपस्थित होते. 

जऊळके वणी येथील केशव शेळके यांच्या द्राक्षबागांची पाहणी भुसे यांनी केली. यावेळी ते म्हणाले, ‘‘नुकसानग्रस्त सर्वच बागांचे पंचनामे करण्यात येतील. शासन कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही.’’ तातडीने द्राक्ष बागांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

पीकविम्याबाबत नवीन धोरण घेणार 

पीकविम्याबाबत राज्य शासन केंद्राच्या मदतीने लवकरच नवीन धोरण हाती घेणार आहे. केंद्र सरकारची विमा कंपनी स्थापन होणार असल्याचे भुसे यांनी सांगितले. ते चांदवड तालुक्यातील धोतरखेडे येथील ईश्वर महाले या शेतकऱ्याच्या नुकसानग्रस्त द्राक्षबागेची पाहणी करण्यासाठी आले असता शेतकऱ्यांशी बोलत होते. 
 
News Item ID: 
820-news_story-1610541937-awsecm-407
Mobile Device Headline: 
शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करू ः भुसे
Appearance Status Tags: 
Tajya News
Above all to the farmers Let's help:  BhuseAbove all to the farmers Let's help:  Bhuse
Mobile Body: 

नाशिक : जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादकांचे  नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री दादा भुसे यांनी जिल्ह्यातील चांदवड व दिंडोरी तालुक्यात नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी केली. या नुकसानीचा अहवाल सरकारला सादर करण्याचेही त्यांनी यंत्रणेला आदेश दिले. ‘‘अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करू,’’ अशी ग्वाही भुसे यांनी या वेळी दिली. 

अवकाळी पावसाने द्राक्ष बागांसह शेतीपिकांचे नुकसान केले आहे. भुसे यांनी कोरोनातून बरे होताच मंगळवारी (ता. १३) थेट पिकांच्या नुकसानीचा पाहणी दौरा  केला. त्यांच्यासमवेत चांदवड- देवळ्याचे आमदार डॉ. राहुल आहेर, माजी आमदार धनराज महाले, उपविभागीय कृषी अधिकारी गोकूळ वाघ, तालुका कृषी अधिकारी विलास सोनवणे आदी उपस्थित होते. 

जऊळके वणी येथील केशव शेळके यांच्या द्राक्षबागांची पाहणी भुसे यांनी केली. यावेळी ते म्हणाले, ‘‘नुकसानग्रस्त सर्वच बागांचे पंचनामे करण्यात येतील. शासन कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही.’’ तातडीने द्राक्ष बागांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

पीकविम्याबाबत नवीन धोरण घेणार 

पीकविम्याबाबत राज्य शासन केंद्राच्या मदतीने लवकरच नवीन धोरण हाती घेणार आहे. केंद्र सरकारची विमा कंपनी स्थापन होणार असल्याचे भुसे यांनी सांगितले. ते चांदवड तालुक्यातील धोतरखेडे येथील ईश्वर महाले या शेतकऱ्याच्या नुकसानग्रस्त द्राक्षबागेची पाहणी करण्यासाठी आले असता शेतकऱ्यांशी बोलत होते. 
 
English Headline: 
agriculture news in marathi Above all to the farmers Let’s help: Bhuse
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
द्राक्ष दादा भुसे dada bhuse शेती farming कोरोना corona आमदार राहुल आहेर rahul aher
Search Functional Tags: 
द्राक्ष, दादा भुसे, Dada Bhuse, शेती, farming, कोरोना, Corona, आमदार, राहुल आहेर, Rahul Aher
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Above all to the farmers Let’s help: Bhuse
Meta Description: 
Above all to the farmers Let’s help: Bhuse
नाशिक : या नुकसानीचा अहवाल सरकारला सादर करण्याचेही त्यांनी यंत्रणेला आदेश दिले. ‘‘अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करू,’’ अशी ग्वाही भुसे यांनी या वेळी दिली. Source link

Leave a Comment

X