शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कापसाला चांगला भाव देण्यासाठी प्रयत्न करणार


लातूर : राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कापसाला चांगला भाव देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले.

रेणापूर तालुक्यातील पानगाव येथील व्यंकटेश जिंनीग प्रेसिंग मिल मध्ये शासकीय कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी पालकमंत्री देशमुख बोलत होते.या कार्यक्रमास राज्याचे पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन व संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे, लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख, अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील, माजी आमदार वैजिनाथ शिंदे ,त्रंबक नाना भिसे, पणन महासंघाचे संचालक राजकिशोर (पापा) मोदी ,जिल्हा उपनिबंधक समृत जाधव ,उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे उपस्थित होते.

पीक कापणी प्रयोगातल्या त्रुटींमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई – सहकार मंत्री

या कापूस खरेदी केंद्राच्या शुभारंभ प्रसंगी मार्गदर्शन करताना पालकमंत्री अमित देशमुख म्हणाले की, आपण सर्वजण विशिष्ट परिस्थितीमधून मार्गक्रमण करत आहोत. पानगाव येथे कापूस खरेदी केंद्र सुरु झाल्यामुळे आपल्या भागातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या कापसाला चांगला भाव मिळून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हायात 4 हजार 314 कापूकस उत्पादक शेतकऱ्यांनी येथे नोंद केलेली असून यांचा लाभ अहमदपूर, जळकोट व उदगीर तालुक्यास जास्त होत आहे. जिल्हयात खरिपाच्या पेरणीची सुरुवात काही दिवसांत होत आहे. त्यासाठी बी-बीयाणे व खताची अडचण शेतकऱ्यास भासणार नाही. याची संबंधित विभागाने दक्षता बाळगावी अशा पालकमंत्री अमित देशमुख यांनी सूचना दिल्या.

‘सीएए’ चा राज्यातील नागरिकाला त्रास होऊ देणार नाही – अनिल देशमुख

देशात, राज्यात व जिल्हयात आपण सर्वजनच कोरोना कोव्हिड-19 चा सामना करत आहेात. कोरोनाशी घाबरण्याची गरज नाही. परंतु दक्षता बाळगण्याची गरज आहे. प्रत्येकाने भौतिक अंतर बाळगावे असे आवाहन करुन जिल्हयात कोणत्याही शासकीय कार्यक्रमास मर्यादित लोक संख्याच उपस्थित राहिल याची प्रशासनाने दक्षता घ्यावी असे त्यांनी सुचित केले.

ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार हमीची कामे तात्काळ सुरु करण्याच्या सूचना प्रशासनाला यापूर्वीच दिल्याअसून पाणी टंचाई व शेतीच्या कामास दिरंगाई चालणार नाही या कामास प्रथम प्राधान्य दयावे असे पालकमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

भारताशी व्यावसायिक संबंधही तुटल्यामुळे पाकिस्तानमधील जनता अडचणीत

लातूर जिल्हयामध्ये एकमेव व्यंकटेश जिनिंग व प्रेसिंग मिल, पानगाव येथे सुरु असल्याने संबंधिताशी चर्चा करुन पानगाव येथे खरेदीकेंद्र सुरु करणे शक्य झाले आहे.लातूर जिल्हयात प्रामुख्याने अहमदपूर, जळकोट व रेणापूर या तालुक्यात प्रामुख्याने कापसाची उत्पादने घेतली जाते.

प्रारंभी पालकमंत्री अमित देशमुख यांनी कापूस खरेदीचा शुभारंभ करुन कापूस खरेदीची आलेल्या कापसाची पाहणी केली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक पणन महासंघाचे उपाध्यक्ष ॲड. विष्णूपंत सोळंके यांनी केले तर आभार पणन महासंघाचे संचालक भरत चामले यांनी मानले. कार्यक्रमास कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमेश सुर्यवंशी , तालुका खरेदी विक्री संघाचे सभापती मानीकराव सोमवंशी, राहूल चव्हाण, जिल्हयातील कापूस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या –

येत्या २० एप्रिलपासून राज्यात पुन्हा कापूसखरेदी सुरू करण्याचा राज्य शासनाचा मानस – बाळासाहेब पाटील

कृषीमंत्र्यांनी नागपुरी संत्रा व मोसंबी उत्पादकांना न्याय द्यावा – अनिल देशमुखSource link

Leave a Comment

X