शेतकऱ्यांनो, ऊसतोडी घेऊ नका : पाटील

कऱ्हाड, जि. सातारा : साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपीसह ६०० रुपये द्यावेत, या मागणीसाठी बळिराजा शेतकरी संघटनेला पाठिंबा मिळत आहे. साखर कारखानदारांना वठणीवर आणायचे असेल, तर शेतकऱ्यांनी ऊसतोडी घेऊ नये, असे आवाहन बळिराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी येथे केले.

एकरकमी एफआरपीसाठी बळिराजा शेतकरी संघटनेचे तहसीलदार कार्यालयासमोर तीन दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पत्रकार परिषदेत ते मंगळवारी बोलत होते. प्रदेशाध्यक्ष बी. जी. पाटील, जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला उपस्थित होते. श्री. पाटील म्हणाले, ‘‘या आंदोलनालास विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे. दररोज शेतकरी समर्थन देत आहेत. साखरेचे दर वाढले. मात्र उसाचे दर वाढले नाहीत. आंदोलनाचा इतिहास कारखानदारांना, प्रशासनाला माहिती आहे. त्यामुळे त्याची दखल घेऊन प्रशासनाने कार्यवाही करावी. प्रशासनाने आंदोलनाची वेळ आणून देऊ नये. आम्ही अजूनही शांततेने आंदोलन करत आहोत. शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभागी झाले पाहिजे. साखर कारखानदारांना वठणीवर आणायचे असेल तर शेतकऱ्यांनी ऊसतोडी घेऊ नये. कारखानदार दोनच दिवसांत ऊसदराचा निर्णय घेतील.’’

प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, ‘‘सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, जलसंपदामंत्री जयंत पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, सहकार राज्यमंत्री विश्‍वजित कदम यांचे कारखाने आहेत. मंत्र्यांना कायद्याचा विसर पडला आहे. तो कायदा कसा असतो, ते दाखवून देण्याची धमक बळिराजा शेतकरी संघटनेत आहे.’’ 

News Item ID: 
820-news_story-1636603327-awsecm-150
Mobile Device Headline: 
शेतकऱ्यांनो, ऊसतोडी घेऊ नका : पाटील
Appearance Status Tags: 
Tajya News
sugarcane_1.jpgsugarcane_1.jpg
Mobile Body: 

कऱ्हाड, जि. सातारा : साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपीसह ६०० रुपये द्यावेत, या मागणीसाठी बळिराजा शेतकरी संघटनेला पाठिंबा मिळत आहे. साखर कारखानदारांना वठणीवर आणायचे असेल, तर शेतकऱ्यांनी ऊसतोडी घेऊ नये, असे आवाहन बळिराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी येथे केले.

एकरकमी एफआरपीसाठी बळिराजा शेतकरी संघटनेचे तहसीलदार कार्यालयासमोर तीन दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पत्रकार परिषदेत ते मंगळवारी बोलत होते. प्रदेशाध्यक्ष बी. जी. पाटील, जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला उपस्थित होते. श्री. पाटील म्हणाले, ‘‘या आंदोलनालास विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे. दररोज शेतकरी समर्थन देत आहेत. साखरेचे दर वाढले. मात्र उसाचे दर वाढले नाहीत. आंदोलनाचा इतिहास कारखानदारांना, प्रशासनाला माहिती आहे. त्यामुळे त्याची दखल घेऊन प्रशासनाने कार्यवाही करावी. प्रशासनाने आंदोलनाची वेळ आणून देऊ नये. आम्ही अजूनही शांततेने आंदोलन करत आहोत. शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभागी झाले पाहिजे. साखर कारखानदारांना वठणीवर आणायचे असेल तर शेतकऱ्यांनी ऊसतोडी घेऊ नये. कारखानदार दोनच दिवसांत ऊसदराचा निर्णय घेतील.’’

प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, ‘‘सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, जलसंपदामंत्री जयंत पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, सहकार राज्यमंत्री विश्‍वजित कदम यांचे कारखाने आहेत. मंत्र्यांना कायद्याचा विसर पडला आहे. तो कायदा कसा असतो, ते दाखवून देण्याची धमक बळिराजा शेतकरी संघटनेत आहे.’’ 

English Headline: 
agriculture news in marathi Baliraj farmers union demand farmers not to harvest Sugarcane till they get One time FRP
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
साखर कऱ्हाड karhad एफआरपी fair and remunerative price frp तहसीलदार आंदोलन agitation पत्रकार संघटना unions प्रशासन administrations बाळ baby infant जयंत पाटील jayant patil
Search Functional Tags: 
साखर, कऱ्हाड, Karhad, एफआरपी, Fair and Remunerative price, FRP, तहसीलदार, आंदोलन, agitation, पत्रकार, संघटना, Unions, प्रशासन, Administrations, बाळ, baby, infant, जयंत पाटील, Jayant Patil
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Baliraj farmers union demand farmers not to harvest Sugarcane till they get One time FRP
Meta Description: 
Baliraj farmers union demand farmers not to harvest Sugarcane till they get One time FRP
साखर कारखानदारांना वठणीवर आणायचे असेल, तर शेतकऱ्यांनी ऊसतोडी घेऊ नये, असे आवाहन बळिराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी येथे केले.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X