शेतीपंपांची वीजतोडणी मोहीम थांबवा 

सोलापूर ः महावितरणकडून शेतीपंपांची वीजजोड तोडण्याची मोहीम सुरू केली आहे, ती तातडीने मागे घ्यावी, अवाजवी बिले रद्द करावीत, यासह अन्य मागण्यांसाठी भाजपच्या वतीने महावितरणच्या मुख्य कार्यालयावर सोमवारी (ता.१५) आमदार सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. 

आमदार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जुनी मिल परिसरातील महावितरणच्या मुख्य कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. मागणीचे फलक घेऊन प्रचंड घोषणाबाजी करत हा मोर्चा महावितरण कार्यालयावर दाखल झाला. त्यानंतर मागण्यांचे निवेदन देण्यात आले. उपमहापौर राजेश काळे, नगरसेवक श्रीनिवास करली, माजी नगरसेवक बसवराज केंगनाळकर, भाजप तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, यतीन शहा आदी उपस्थित होते. 

या वेळी बोलताना श्री. देशमुख म्हणाले, ‘‘युती सरकारच्या पाच वर्षाच्या काळात शेतकऱ्यांचे एकदाही वीज कनेक्शन कट केले नव्हते. मात्र महाविकास आघाडीने सत्तेवर आल्यापासून शेतकऱ्यांना त्रास देणे सुरू केले आहे. आता तर दादागिरी करत साखर कारखान्यांना पत्र देऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वीजबिल उसाच्या बिलातून कट करण्याचे आदेश दिले आहेत. ऊर्जामंत्र्यांकडून वीजबिलाचा प्रश्‍न सुटत नसेल आणि त्यांचे अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री एकेत नसतील, तर त्यांनी राजीनामा देऊन शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी व्हावे,’’ असेही आमदार देशमुख म्हणाले. 

या केल्या मागण्या 

-साखर कारखान्यांना ऊसबिलातून शेतकऱ्यांचे वीजबिल कपात करण्याचा आदेश रद्द व्हावा. 
-दक्षिण-उत्तर सोलापूर तालुक्यातील गावे सौरऊर्जा योजनेत समाविष्ट करा. 
-ग्रामपंचायतींना पाणीपुरवठ्याची वीजबिल भरण्याची सक्ती करू नये. 
-अनधिकृत वीज कनेक्शनवर आधी आळा घालावा. 
-कोरोना काळात भरमसाट बिले दिली, ती दुरुस्त करावीत. 
 
News Item ID: 
820-news_story-1637060429-awsecm-844
Mobile Device Headline: 
शेतीपंपांची वीजतोडणी मोहीम थांबवा 
Appearance Status Tags: 
Section News
Stop the campaign of power cutting of agricultural power pumpStop the campaign of power cutting of agricultural power pump
Mobile Body: 

सोलापूर ः महावितरणकडून शेतीपंपांची वीजजोड तोडण्याची मोहीम सुरू केली आहे, ती तातडीने मागे घ्यावी, अवाजवी बिले रद्द करावीत, यासह अन्य मागण्यांसाठी भाजपच्या वतीने महावितरणच्या मुख्य कार्यालयावर सोमवारी (ता.१५) आमदार सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. 

आमदार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जुनी मिल परिसरातील महावितरणच्या मुख्य कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. मागणीचे फलक घेऊन प्रचंड घोषणाबाजी करत हा मोर्चा महावितरण कार्यालयावर दाखल झाला. त्यानंतर मागण्यांचे निवेदन देण्यात आले. उपमहापौर राजेश काळे, नगरसेवक श्रीनिवास करली, माजी नगरसेवक बसवराज केंगनाळकर, भाजप तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, यतीन शहा आदी उपस्थित होते. 

या वेळी बोलताना श्री. देशमुख म्हणाले, ‘‘युती सरकारच्या पाच वर्षाच्या काळात शेतकऱ्यांचे एकदाही वीज कनेक्शन कट केले नव्हते. मात्र महाविकास आघाडीने सत्तेवर आल्यापासून शेतकऱ्यांना त्रास देणे सुरू केले आहे. आता तर दादागिरी करत साखर कारखान्यांना पत्र देऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वीजबिल उसाच्या बिलातून कट करण्याचे आदेश दिले आहेत. ऊर्जामंत्र्यांकडून वीजबिलाचा प्रश्‍न सुटत नसेल आणि त्यांचे अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री एकेत नसतील, तर त्यांनी राजीनामा देऊन शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी व्हावे,’’ असेही आमदार देशमुख म्हणाले. 

या केल्या मागण्या 

-साखर कारखान्यांना ऊसबिलातून शेतकऱ्यांचे वीजबिल कपात करण्याचा आदेश रद्द व्हावा. 
-दक्षिण-उत्तर सोलापूर तालुक्यातील गावे सौरऊर्जा योजनेत समाविष्ट करा. 
-ग्रामपंचायतींना पाणीपुरवठ्याची वीजबिल भरण्याची सक्ती करू नये. 
-अनधिकृत वीज कनेक्शनवर आधी आळा घालावा. 
-कोरोना काळात भरमसाट बिले दिली, ती दुरुस्त करावीत. 
 
English Headline: 
agriclture news in marathi,Stop the campaign of power cutting of agricultural power pump
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
सोलापूर पूर floods शेती farming वीज आमदार सुभाष देशमुख भाजप महावितरण उपमहापौर नगरसेवक यती yeti वर्षा varsha विकास साखर ऊस मुख्यमंत्री आंदोलन agitation पाणी water
Search Functional Tags: 
सोलापूर, पूर, Floods, शेती, farming, वीज, आमदार, सुभाष देशमुख, भाजप, महावितरण, उपमहापौर, नगरसेवक, यती, Yeti, वर्षा, Varsha, विकास, साखर, ऊस, मुख्यमंत्री, आंदोलन, agitation, पाणी, Water
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Stop the campaign of power cutting of agricultural power pump
Meta Description: 
Stop the campaign of power cutting of agricultural power pump
सोलापूर ः महावितरणकडून शेतीपंपांची वीजजोड तोडण्याची मोहीम सुरू केली आहे, ती तातडीने मागे घ्यावी, अवाजवी बिले रद्द करावीत,या मागण्यांसाठी आमदार सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X