Take a fresh look at your lifestyle.

शेतीमाल तारण योजनेतून १२.६२ कोटींचे कर्ज 

0

पुणे : शेतीमालाचे पडणारे दर रोखण्यासाठी तारण कर्ज योजनेला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळु लागला आहे. ८ नोव्हेंबरपर्यंत १ हजार २६३ शेतकऱ्यांनी सुमारे १२.६२ कोटींचे तारण कर्ज घेतले आहे. महामंडळाच्या वतीने नुकत्याचे घेतलेल्या वखार आपल्या दारी अभियानाचा फायदा शेतकऱ्यांना झाल्याची अशी माहिती राज्य वखार महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दीपक तावरे यांनी दिली. 

श्री. तावरे म्हणाले, ‘‘सुगी हंगामाच्या सुरुवातीलाचा बाजारपेठेतील अन्नधान्याची आवक सुरू होण्याअगोदरच राज्य वखार महामंडळाच्या शेतीमाल साठवणुकीच्या विविध योजना, ब्लॉकचेन तंत्रज्ञान, तारण कर्ज योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांना व्हावा, यासाठी वखार महामंडळ, कृषी विभाग आणि सहकार विकास महामंडळाद्वारे ‘वखार आपल्या दारी’ अभियान विविध १५ जिल्‍ह्यांमध्ये राबविण्यात आले होते. 

शेतकऱ्यांकडे दर्जेदार शेतीमाल असून सुद्धा दर कोसळल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते. हे नुकसान एका एका पिकाचा विचार केला, तर ते कोट्यवधी रुपयांचे होते. हे नुकसान टाळून शेतकऱ्यांना शेतीमाल साठणूक, बाजारपेठेच्या अभ्यासाद्वारे (मार्केट इंटेलिजन्स) शेतीमाल विक्री कधी आणि केव्हा करावी या बाबतची माहिती कार्यशाळांमधून देण्यात आली. यामध्ये महामंडळाची शेतीमाल साठवणूक योजना, तारण कर्ज योजना, ब्लॉकचेन योजना, लहान साठवणूक केंद्रे (वखार) बांधणी योजना आदी विविध योजनांचा समावेश होता. 

शेतकऱ्यांना घरबसल्या तारण कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी देखील राज्य सहकारी बॅंकेच्या सहकार्याने ब्लॉकचेन (आॅनलाइन कर्ज योजना) यंत्रणादेखील राबविण्यात येत असून, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तीन तासांमध्ये कर्ज मंजुरी आणि पैसे खात्यावर जमा केले जात आहे. याचा फायदादेखील शेतकऱ्यांनी होत असल्याचे तावरे यांनी सांगितले. 

हळदीला सर्वाधिक पसंती 
तारण योजनेमध्ये हळदीला सर्वाधिक पसंती शेतकऱ्यांनी दिली असून. लातूर विभागात मध्ये २११ शेतकऱ्यांनी ४ कोटी ९९ लाख १८ हजार ७३७ रुपये, तर १०३ सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी १ कोटी ६२ लाख ३१ हजार रुपयांचे कर्ज घेतले आहे. 

प्रतिक्रिया…
‘‘दिवाळीमध्ये सोयाबीन काढणीनंतर दर कमी झाले होते. पैशांची पण गरज होती. यामुळे ‘ॲग्रोवन’मधील वखार महामंडळाच्या शेतीमाल तारण कर्ज योजनेची माहिती वाचून वखार महामंडळात सोयाबीन ठेवले. आमच्या सोयाबीनची किंमत ५ लाख ६७ हजार होती. त्यावर तारण कर्ज ३ लाख ९६ हजार एवढे मिळाले. आता आम्ही सहा महिन्यांत सोयाबीनचे दर वाढल्यावर कधीही विक्री करू शकतो. सोने तारण कर्जापेक्षा जास्त लवकर कर्ज आम्हाला या योजनेत मिळाले.’’ 
– उदय संपतराव देवकाते 
निरा वागज, ता. बारामती, जि. पुणे 

८ नोव्हेंबर अखेरची स्थिती 
पहिल्या तीन शेतीमालासाठी घेतलेले सर्वाधिक कर्ज 
शेतमाल शेतकरी संख्या कर्ज रुपये (कोटीत) 
हळद २१८ ५ कोटी १४ लाख 
हरभरा १३३ २ कोटी ९० लाख 
सोयाबीन १६९ २ कोटी ४९ लाख 

News Item ID: 
820-news_story-1636655871-awsecm-369
Mobile Device Headline: 
शेतीमाल तारण योजनेतून १२.६२ कोटींचे कर्ज 
Appearance Status Tags: 
Mukhya News
शेतीमाल तारण योजनेतून १२.६२ कोटींचे कर्ज शेतीमाल तारण योजनेतून १२.६२ कोटींचे कर्ज 
Mobile Body: 

पुणे : शेतीमालाचे पडणारे दर रोखण्यासाठी तारण कर्ज योजनेला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळु लागला आहे. ८ नोव्हेंबरपर्यंत १ हजार २६३ शेतकऱ्यांनी सुमारे १२.६२ कोटींचे तारण कर्ज घेतले आहे. महामंडळाच्या वतीने नुकत्याचे घेतलेल्या वखार आपल्या दारी अभियानाचा फायदा शेतकऱ्यांना झाल्याची अशी माहिती राज्य वखार महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दीपक तावरे यांनी दिली. 

श्री. तावरे म्हणाले, ‘‘सुगी हंगामाच्या सुरुवातीलाचा बाजारपेठेतील अन्नधान्याची आवक सुरू होण्याअगोदरच राज्य वखार महामंडळाच्या शेतीमाल साठवणुकीच्या विविध योजना, ब्लॉकचेन तंत्रज्ञान, तारण कर्ज योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांना व्हावा, यासाठी वखार महामंडळ, कृषी विभाग आणि सहकार विकास महामंडळाद्वारे ‘वखार आपल्या दारी’ अभियान विविध १५ जिल्‍ह्यांमध्ये राबविण्यात आले होते. 

शेतकऱ्यांकडे दर्जेदार शेतीमाल असून सुद्धा दर कोसळल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते. हे नुकसान एका एका पिकाचा विचार केला, तर ते कोट्यवधी रुपयांचे होते. हे नुकसान टाळून शेतकऱ्यांना शेतीमाल साठणूक, बाजारपेठेच्या अभ्यासाद्वारे (मार्केट इंटेलिजन्स) शेतीमाल विक्री कधी आणि केव्हा करावी या बाबतची माहिती कार्यशाळांमधून देण्यात आली. यामध्ये महामंडळाची शेतीमाल साठवणूक योजना, तारण कर्ज योजना, ब्लॉकचेन योजना, लहान साठवणूक केंद्रे (वखार) बांधणी योजना आदी विविध योजनांचा समावेश होता. 

शेतकऱ्यांना घरबसल्या तारण कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी देखील राज्य सहकारी बॅंकेच्या सहकार्याने ब्लॉकचेन (आॅनलाइन कर्ज योजना) यंत्रणादेखील राबविण्यात येत असून, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तीन तासांमध्ये कर्ज मंजुरी आणि पैसे खात्यावर जमा केले जात आहे. याचा फायदादेखील शेतकऱ्यांनी होत असल्याचे तावरे यांनी सांगितले. 

हळदीला सर्वाधिक पसंती 
तारण योजनेमध्ये हळदीला सर्वाधिक पसंती शेतकऱ्यांनी दिली असून. लातूर विभागात मध्ये २११ शेतकऱ्यांनी ४ कोटी ९९ लाख १८ हजार ७३७ रुपये, तर १०३ सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी १ कोटी ६२ लाख ३१ हजार रुपयांचे कर्ज घेतले आहे. 

प्रतिक्रिया…
‘‘दिवाळीमध्ये सोयाबीन काढणीनंतर दर कमी झाले होते. पैशांची पण गरज होती. यामुळे ‘ॲग्रोवन’मधील वखार महामंडळाच्या शेतीमाल तारण कर्ज योजनेची माहिती वाचून वखार महामंडळात सोयाबीन ठेवले. आमच्या सोयाबीनची किंमत ५ लाख ६७ हजार होती. त्यावर तारण कर्ज ३ लाख ९६ हजार एवढे मिळाले. आता आम्ही सहा महिन्यांत सोयाबीनचे दर वाढल्यावर कधीही विक्री करू शकतो. सोने तारण कर्जापेक्षा जास्त लवकर कर्ज आम्हाला या योजनेत मिळाले.’’ 
– उदय संपतराव देवकाते 
निरा वागज, ता. बारामती, जि. पुणे 

८ नोव्हेंबर अखेरची स्थिती 
पहिल्या तीन शेतीमालासाठी घेतलेले सर्वाधिक कर्ज 
शेतमाल शेतकरी संख्या कर्ज रुपये (कोटीत) 
हळद २१८ ५ कोटी १४ लाख 
हरभरा १३३ २ कोटी ९० लाख 
सोयाबीन १६९ २ कोटी ४९ लाख 

English Headline: 
agriculture news in marathi 1262 lakh rupees loan from agricultural mortgage scheme
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
पुणे शेती farming तारण कर्ज कृषी विभाग agriculture department विभाग sections विकास इंटेल हळद लातूर latur तूर सोयाबीन दिवाळी वन forest सोने
Search Functional Tags: 
पुणे, शेती, farming, तारण, कर्ज, कृषी विभाग, Agriculture Department, विभाग, Sections, विकास, इंटेल, हळद, लातूर, Latur, तूर, सोयाबीन, दिवाळी, वन, forest, सोने
Twitter Publish: 
Meta Keyword: 
1262 lakh rupees loan from agricultural mortgage scheme
Meta Description: 
1262 lakh rupees loan from agricultural mortgage scheme
शेतीमालाचे पडणारे दर रोखण्यासाठी तारण कर्ज योजनेला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळु लागला आहे. ८ नोव्हेंबरपर्यंत १ हजार २६३ शेतकऱ्यांनी सुमारे १२.६२ कोटींचे तारण कर्ज घेतले आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

X