शैक्षणिक वर्ष जूनपासूनच : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : ‘‘शिक्षण हे जीवनावश्यक आहे ते थांबवले जावू नये. नवीन शैक्षणिक वर्ष जून महिन्यातच सुरू केले जावे,’’ असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. ‘‘ज्या भागात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा सुरू करता येणार नाहीत, त्यांनी ऑनलाईन आणि जिथे कोरोनाचा प्रादुर्भाव नाही, इंटरनेट कनेक्टिव्हिटी फार चांगली नाही त्या दुर्गम भागात सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून शाळा सुरू कराव्यात,’’ अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी (ता.३१) व्हीसीद्वारे शालेय शिक्षण विभागाची बैठक घेतली. या बैठकीला शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू, आमदार कपिल पाटील, अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांच्यासह रघुनाथ माशेलकर, डॉ. अनिल पाटील, अनिरुद्ध जाधव तसेच इतर शिक्षण तज्ज्ञही उपस्थित होते.

या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी शाळा सुरू न करताही विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडणार नाही याची काळजी घ्यावी आणि त्याच दिशेने नवीन शैक्षणिक वर्षाची आखणी करावी अशी सूचना केली.

‘‘शिक्षण हे जीवनावश्यक आहे. मुलांचे वर्ष वाया जाऊ देता येणार नाही. ज्या ठिकाणी प्रत्यक्षात शाळा सुरू करता येणार नाहीत, त्याठिकाणी ऑनलाईन किंवा इतर पर्यांयांनी शाळा सुरू करता येऊ शकतील. दुर्गम भागांत जिथे इंटरनेट कनेक्टिविटी नाही आणि कोरोनाचा प्रादुर्भाव नाही अशा ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून शाळा सुरू होऊ शकतील,’’ असे ठाकरे यांनी म्हटले आहे.

सुरुवातीला गूगल प्लॅटफॉर्मचा प्रायोगिक स्तरावर वापर केला तरी स्वतंत्रपणे संगणकीय पद्धती विकसित करून ऑनलाईन शिक्षणाची मजबूत यंत्रणा दीर्घ काळासाठी विकसित करावी, असेही या बैठकीत त्यांनी स्पष्ट केले. 

News Item ID: 
820-news_story-1590949768-458
Mobile Device Headline: 
शैक्षणिक वर्ष जूनपासूनच : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Appearance Status Tags: 
Tajya News
शैक्षणिक वर्ष जूनपासूनच : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेशैक्षणिक वर्ष जूनपासूनच : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Mobile Body: 

मुंबई : ‘‘शिक्षण हे जीवनावश्यक आहे ते थांबवले जावू नये. नवीन शैक्षणिक वर्ष जून महिन्यातच सुरू केले जावे,’’ असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. ‘‘ज्या भागात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा सुरू करता येणार नाहीत, त्यांनी ऑनलाईन आणि जिथे कोरोनाचा प्रादुर्भाव नाही, इंटरनेट कनेक्टिव्हिटी फार चांगली नाही त्या दुर्गम भागात सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून शाळा सुरू कराव्यात,’’ अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी (ता.३१) व्हीसीद्वारे शालेय शिक्षण विभागाची बैठक घेतली. या बैठकीला शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू, आमदार कपिल पाटील, अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांच्यासह रघुनाथ माशेलकर, डॉ. अनिल पाटील, अनिरुद्ध जाधव तसेच इतर शिक्षण तज्ज्ञही उपस्थित होते.

या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी शाळा सुरू न करताही विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडणार नाही याची काळजी घ्यावी आणि त्याच दिशेने नवीन शैक्षणिक वर्षाची आखणी करावी अशी सूचना केली.

‘‘शिक्षण हे जीवनावश्यक आहे. मुलांचे वर्ष वाया जाऊ देता येणार नाही. ज्या ठिकाणी प्रत्यक्षात शाळा सुरू करता येणार नाहीत, त्याठिकाणी ऑनलाईन किंवा इतर पर्यांयांनी शाळा सुरू करता येऊ शकतील. दुर्गम भागांत जिथे इंटरनेट कनेक्टिविटी नाही आणि कोरोनाचा प्रादुर्भाव नाही अशा ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून शाळा सुरू होऊ शकतील,’’ असे ठाकरे यांनी म्हटले आहे.

सुरुवातीला गूगल प्लॅटफॉर्मचा प्रायोगिक स्तरावर वापर केला तरी स्वतंत्रपणे संगणकीय पद्धती विकसित करून ऑनलाईन शिक्षणाची मजबूत यंत्रणा दीर्घ काळासाठी विकसित करावी, असेही या बैठकीत त्यांनी स्पष्ट केले. 

English Headline: 
agriculture news in marathi Academic year will starts from june : CM Uddhav Thackeray
Author Type: 
External Author
सकाळ न्यूज नेटवर्क
शिक्षण education मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thakare मुंबई mumbai कोरोना corona बच्चू कडू आमदार कपिल पाटील kapil patil रघुनाथ माशेलकर raghunath mashelkar
Search Functional Tags: 
शिक्षण, Education, मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे, Uddhav Thakare, मुंबई, Mumbai, कोरोना, Corona, बच्चू कडू, आमदार, कपिल पाटील, Kapil Patil, रघुनाथ माशेलकर, Raghunath Mashelkar
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Academic year will starts from june : CM Uddhav Thackeray
Meta Description: 
Academic year will starts from june : CM Uddhav Thackeray
 ‘‘शिक्षण हे जीवनावश्यक आहे ते थांबवले जावू नये. नवीन शैक्षणिक वर्ष जून महिन्यातच सुरू केले जावे,’’ असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.Source link

Leave a Comment

X