संसर्गाचे थैमान, महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरातला जबर फटका

नवी दिल्ली : जगातील अन्य देशांसोबतच भारतातही कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होते आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या १.३१ लाखाहून अधिक झाली आहे. मागील २४ तासांत ६ हजार ७६७ नवे रुग्ण आढळले असून १४७ जणांनी प्राण गमावले आहेत. महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, दिल्ली, राजस्थान, मध्यप्रदेश या राज्यांमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. केंद्राने मात्र योग्यवेळी लॉकडाउन करण्यात आल्याने रूग्ण दुप्पट होण्याचा वेग मंदावल्याचा दावा केला.

आरोग्य मंत्रालयाने आज प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार देशातील कोरोना रुग्णांची संख्या १ लाख २१ हजार ८६८ झाली असून या विषाणूमुळे आत्तापर्यंत ३ हजार८६७ रुग्णांचा मृत्यू ओढवला आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे ५४ हजार ४४१ रुग्णांची प्रकृती सुधारली असून बरे होण्याचा दर ४१.२८ टक्क्यांवर पोहोचला असल्याचेही आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे.आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या म्हणण्यानुसार रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग आधी ३.४ दिवसांचा होता. आता हा वेग १३ दिवसांहून अधिक झाला आहे यामध्ये लॉकडाउन आणि सुरक्षित अंतर राखणे, मार्गदर्शक सूचनांचे पालन या गोष्टींनी औषधासारखे काम केले.

सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रातून विशेषतः: मुंबईतून वाढल्याचे दिसून आले आहे.एकट्या मुंबईमध्ये कोरोना रुग्णसंख्या २९ हजाराच्या जवळपास पोहोचली आहे. मुंबईत मागील २४ तासांत १५५६ रुग्ण आढळले आणि ४० जण दगावले. उत्तर प्रदेशातील रुग्णसंख्या २४९३ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत ३४३३ संक्रमित रुग्णांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले आहे. उत्तर प्रदेशात कोरोनामुळे १५५ जणांनी प्राण गमावले आहेत.
.
जवानांना संसर्ग
कर्नाटकमध्ये मागील चोवीस तासांत १३० नवे रुग्ण सापडल्याने आता एकूण संख्या २०८९ झाली आहे. आत्तापर्यंत ६५४ जण बरे झाले असून राज्यातील सक्रिय रुग्ण संख्या १३९१ आहे. केरळमध्ये देखील नवे ५३ रुग्ण सापडले असल्याने रुग्णसंख्या ३२२ झाली आहे. दरम्यान, सीमासुरक्षा दलाचे (बीएसएफ)चे आणखी दोन जवानही कोरोनामुळे संक्रमित झाल्याने कोरोनाग्रस्त बीएसएफ जवानांची संख्या ११२ झाली आहे. अर्थात, २९६ जवान खडखडीत बरेही झाले आहेत. 

News Item ID: 
820-news_story-1590342580-619
Mobile Device Headline: 
संसर्गाचे थैमान, महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरातला जबर फटका
Appearance Status Tags: 
Mukhya News
संसर्गाचे थैमान, महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरातला जबर फटकासंसर्गाचे थैमान, महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरातला जबर फटका
Mobile Body: 

नवी दिल्ली : जगातील अन्य देशांसोबतच भारतातही कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होते आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या १.३१ लाखाहून अधिक झाली आहे. मागील २४ तासांत ६ हजार ७६७ नवे रुग्ण आढळले असून १४७ जणांनी प्राण गमावले आहेत. महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, दिल्ली, राजस्थान, मध्यप्रदेश या राज्यांमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. केंद्राने मात्र योग्यवेळी लॉकडाउन करण्यात आल्याने रूग्ण दुप्पट होण्याचा वेग मंदावल्याचा दावा केला.

आरोग्य मंत्रालयाने आज प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार देशातील कोरोना रुग्णांची संख्या १ लाख २१ हजार ८६८ झाली असून या विषाणूमुळे आत्तापर्यंत ३ हजार८६७ रुग्णांचा मृत्यू ओढवला आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे ५४ हजार ४४१ रुग्णांची प्रकृती सुधारली असून बरे होण्याचा दर ४१.२८ टक्क्यांवर पोहोचला असल्याचेही आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे.आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या म्हणण्यानुसार रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग आधी ३.४ दिवसांचा होता. आता हा वेग १३ दिवसांहून अधिक झाला आहे यामध्ये लॉकडाउन आणि सुरक्षित अंतर राखणे, मार्गदर्शक सूचनांचे पालन या गोष्टींनी औषधासारखे काम केले.

सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रातून विशेषतः: मुंबईतून वाढल्याचे दिसून आले आहे.एकट्या मुंबईमध्ये कोरोना रुग्णसंख्या २९ हजाराच्या जवळपास पोहोचली आहे. मुंबईत मागील २४ तासांत १५५६ रुग्ण आढळले आणि ४० जण दगावले. उत्तर प्रदेशातील रुग्णसंख्या २४९३ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत ३४३३ संक्रमित रुग्णांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले आहे. उत्तर प्रदेशात कोरोनामुळे १५५ जणांनी प्राण गमावले आहेत.
.
जवानांना संसर्ग
कर्नाटकमध्ये मागील चोवीस तासांत १३० नवे रुग्ण सापडल्याने आता एकूण संख्या २०८९ झाली आहे. आत्तापर्यंत ६५४ जण बरे झाले असून राज्यातील सक्रिय रुग्ण संख्या १३९१ आहे. केरळमध्ये देखील नवे ५३ रुग्ण सापडले असल्याने रुग्णसंख्या ३२२ झाली आहे. दरम्यान, सीमासुरक्षा दलाचे (बीएसएफ)चे आणखी दोन जवानही कोरोनामुळे संक्रमित झाल्याने कोरोनाग्रस्त बीएसएफ जवानांची संख्या ११२ झाली आहे. अर्थात, २९६ जवान खडखडीत बरेही झाले आहेत. 

English Headline: 
agriculture news in marathi maharashtra, tamilnadu, gujrat on high risk
Author Type: 
External Author
सकाळ न्यूज नेटवर्क
भारत कोरोना corona प्राण महाराष्ट्र maharashtra गुजरात राजस्थान आरोग्य health मंत्रालय उत्तर प्रदेश बीएसएफ
Search Functional Tags: 
भारत, कोरोना, Corona, प्राण, महाराष्ट्र, Maharashtra, गुजरात, राजस्थान, आरोग्य, Health, मंत्रालय, उत्तर प्रदेश, बीएसएफ
Twitter Publish: 
Meta Keyword: 
maharashtra, tamilnadu, gujrat on high risk
Meta Description: 
maharashtra, tamilnadu, gujrat on high risk
देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या १.३१ लाखाहून अधिक झाली आहे. मागील २४ तासांत ६ हजार ७६७ नवे रुग्ण आढळले असून १४७ जणांनी प्राण गमावले आहेत.Source link

Leave a Comment

X