सक्रिय रुग्णांची संख्या घटली; एका दिवसांत विक्रमी कोरोनामुक्त

नवी दिल्ली : कोरोना महामारीविरूद्धच्या लढाईतील आजचा दिवस भारतासाठी नवा आशेचा किरण घेऊन आला. मागच्या २४ तासांत ११ हजारांहून जास्त विक्रमी रूग्ण कोरोनामुक्त झाले, त्याचप्रमाणे देशातील सक्रिय रूग्णांची संख्या या संपूर्ण काळात प्रथमच घटली. रूग्ण बरे होण्याचाही दर (रिकव्हरी रेट) आतापर्यंत सर्वाधिक ४७ टक्क्यांपेक्षा जास्त नोंदवला गेला.

या जागतिक महामारीचा भारतातील वाढता प्रकोप चालूच असून गेल्या २४ तासांत आतापर्यंतचे सर्वाधिक ७,९६४ नवे रूग्ण आढळले आहे. देशातील एकूण रूग्णसंख्या पावणे दोन लाखांवर पोहोचली. कोरोना रूग्णसंख्येबाबत भारत तुर्कस्तानला मागे टाकून नवव्या क्रमांकावर पोहोचला आहे.

देशात गेल्या २४ तासांत आणखी २६४ लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबळींचा हा आकडाही आतापर्यंतचा सर्वाधिक आहे. एकूण मृतांची संख्या पाच हजारापर्यंत पोहोचली आहे. त्यात महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली व मध्य प्रदेश ही राज्ये मतांच्या संख्येबाबत चिंताजनक कल दाखवीत आहेत..त्याचवेळी याच कालावधीत काही सक्रिय घटनांचा सांगावाही आरोग्य मंत्रालयाकडून आल्या आहे.

मागच्या २४ तासांत बरे झालेल्यांची संख्या ११,२६४ होती तर नवे ७,९६४ रुग्ण आढळले. नव्या रुग्णांपेक्षा बरे होणारांची संख्या जास्त असण्याची ही पहिलीच वेळ आहे. कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या आज ८६,४२२ होती. ती कालच्यापेक्षाही कमी असल्याचीही पहिलीच वेळ होती. काल (२९ मे) सक्रिय रूग्णसंख्या ८९,९८७ होती. आतापावेतो सक्रिय रूग्णसंख्या, बरे होणारे रूग्ण यांचे प्रमाण व्यस्त दिसत होते. त्यात प्रथमच मोठा बदल आढळून आला आहे. बरे झालेली एकूण रूग्णसंख्या ८२,३७० वर तर रिकव्हरी दर ४७.४० टक्क्यांवर पोहोचला आहे. अर्थात, केंद्राच्या तक्रारीप्रमाणे पश्चिम बंगालसारखी काही राज्ये केंद्राकडे वेळेवर व खरी रूग्णसंख्या माहिती पाठवत नाहीत. 

News Item ID: 
820-news_story-1590862768-528
Mobile Device Headline: 
सक्रिय रुग्णांची संख्या घटली; एका दिवसांत विक्रमी कोरोनामुक्त
Appearance Status Tags: 
Mukhya News
सक्रिय रुग्णांची संख्या घटली; एका दिवसांत विक्रमी कोरोनामुक्तसक्रिय रुग्णांची संख्या घटली; एका दिवसांत विक्रमी कोरोनामुक्त
Mobile Body: 

नवी दिल्ली : कोरोना महामारीविरूद्धच्या लढाईतील आजचा दिवस भारतासाठी नवा आशेचा किरण घेऊन आला. मागच्या २४ तासांत ११ हजारांहून जास्त विक्रमी रूग्ण कोरोनामुक्त झाले, त्याचप्रमाणे देशातील सक्रिय रूग्णांची संख्या या संपूर्ण काळात प्रथमच घटली. रूग्ण बरे होण्याचाही दर (रिकव्हरी रेट) आतापर्यंत सर्वाधिक ४७ टक्क्यांपेक्षा जास्त नोंदवला गेला.

या जागतिक महामारीचा भारतातील वाढता प्रकोप चालूच असून गेल्या २४ तासांत आतापर्यंतचे सर्वाधिक ७,९६४ नवे रूग्ण आढळले आहे. देशातील एकूण रूग्णसंख्या पावणे दोन लाखांवर पोहोचली. कोरोना रूग्णसंख्येबाबत भारत तुर्कस्तानला मागे टाकून नवव्या क्रमांकावर पोहोचला आहे.

देशात गेल्या २४ तासांत आणखी २६४ लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबळींचा हा आकडाही आतापर्यंतचा सर्वाधिक आहे. एकूण मृतांची संख्या पाच हजारापर्यंत पोहोचली आहे. त्यात महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली व मध्य प्रदेश ही राज्ये मतांच्या संख्येबाबत चिंताजनक कल दाखवीत आहेत..त्याचवेळी याच कालावधीत काही सक्रिय घटनांचा सांगावाही आरोग्य मंत्रालयाकडून आल्या आहे.

मागच्या २४ तासांत बरे झालेल्यांची संख्या ११,२६४ होती तर नवे ७,९६४ रुग्ण आढळले. नव्या रुग्णांपेक्षा बरे होणारांची संख्या जास्त असण्याची ही पहिलीच वेळ आहे. कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या आज ८६,४२२ होती. ती कालच्यापेक्षाही कमी असल्याचीही पहिलीच वेळ होती. काल (२९ मे) सक्रिय रूग्णसंख्या ८९,९८७ होती. आतापावेतो सक्रिय रूग्णसंख्या, बरे होणारे रूग्ण यांचे प्रमाण व्यस्त दिसत होते. त्यात प्रथमच मोठा बदल आढळून आला आहे. बरे झालेली एकूण रूग्णसंख्या ८२,३७० वर तर रिकव्हरी दर ४७.४० टक्क्यांवर पोहोचला आहे. अर्थात, केंद्राच्या तक्रारीप्रमाणे पश्चिम बंगालसारखी काही राज्ये केंद्राकडे वेळेवर व खरी रूग्णसंख्या माहिती पाठवत नाहीत. 

English Headline: 
agriculture news in marathi corona positive patient decreases eleven thousand patient recovered in a day
Author Type: 
External Author
सकाळ न्यूज नेटवर्क
कोरोना corona भारत महाराष्ट्र maharashtra गुजरात मध्य प्रदेश madhya pradesh घटना incidents आरोग्य health मंत्रालय
Search Functional Tags: 
कोरोना, Corona, भारत, महाराष्ट्र, Maharashtra, गुजरात, मध्य प्रदेश, Madhya Pradesh, घटना, Incidents, आरोग्य, Health, मंत्रालय
Twitter Publish: 
Meta Keyword: 
corona positive patient decreases eleven thousand patient recovered in a day
Meta Description: 
corona positive patient decreases eleven thousand patient recovered in a day
कोरोना महामारीविरूद्धच्या लढाईतील आजचा दिवस भारतासाठी नवा आशेचा किरण घेऊन आला. मागच्या २४ तासांत ११ हजारांहून जास्त विक्रमी रूग्ण कोरोनामुक्त झालेSource link

Leave a Comment

X