सहकारात बांबूचा अंतर्भाव करावा ः पाशा पटेल

लातूर ः सहकारी साखर कारखाने, सूत गिरण्या याप्रमाणेच बांबू हा आर्थिक समृद्धी प्राप्त करून देणारा असल्याने, बांबूचा अंतर्भाव सहकारात करावा, अशी मागणी महाराष्ट्र कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष व देशभर बांबू लागवडीची चळवळ उभारणारे पाशा पटेल यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडे मंगळवारी (ता. २२) केली आहे. त्यांनी ही बाब गांभीर्याने घेत सकारात्मक प्रतिसाद दिला.

श्री. पटेल यांनी नवी दिल्ली येथे अमित शहा यांची भेट घेतली. या वेळी संजय करपे, पंजाबचे शेतकरी महेश शहादा यांची उपस्थिती होती. या प्रसंगी श्री. पटेल यांनी सहकारात बांबूचा अंतर्भाव केला तर सहकार नसलेल्या आसाम, त्रिपुरा, मेघालय, बंगाल, बिहार, ओडिशा आदी ७ राज्यांत सहकार प्रस्थापित होईल, असे सांगितले. 

सहकार क्षेत्रात बांबूचा समावेश करून सहकार निर्मिती करणे शक्य होणार आहे. त्या माध्यमातून देशाची आर्थिक समृद्धीही करता येईल. बांबू उत्पादक शेतकऱ्यांना दुपटीपेक्षा जास्त पैसे बांबूमुळे मिळू शकतात. आसाममधील नुमालिगड येथे ऑगस्ट २०२२ पासून बांबूपासून इथेनॉलनिर्मितीचा जगातील पहिला रिफायनरी प्रकल्प सुरू होत आहे, ही बाब बांबू लागवड करणाऱ्यांना मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देणारी आणि दुपटीपेक्षा अधिक सुबत्ता मिळवून देणारी आहे. बांबूच्या समावेशामुळे सहकाराला नवीन रुपडे मिळेल, असा विश्‍वास श्री. पटेल यांनी या वेळी झालेल्या चर्चे दरम्यान व्यक्त केला.

पावसाच्या अनिश्‍चिततेमुळे पारंपरिक शेती परवडेनाशी झाली आहे. मात्र अनिश्‍चित पावसात निश्‍चित उत्पन्न देणारा बांबू आहे कमी खर्चात, कमी मनुष्यबळात येणारे हे पीक असून बांबूपासून कपडे, खेळणी, लोणचे, फर्निचर, फ्लोरिंग, कागद आदी एक हजार ८०० वस्तू तयार करता येतात. त्यामुळे बांबूला न्याय मिळावा, यासाठी बांबूचा सहकारात समावेश करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी विनंती श्री. पटेल यांनी केली असता, श्री. शहा यांनी ही बाब गांभीर्याने घेत त्यावर विचार करण्याचा शब्द दिला.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल
अनिश्‍चित पावसात निश्‍चित येणारे बांबू हे पीक बहुगुणी आहे. त्यापासून अनेक वस्तू तयार करता येतात. या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून सहकारात बांबूचा अंतर्भाव केल्यास खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मार्ग अधिक सुकर होईल, असा विश्‍वास व्यक्त करून पर्यावरणात मोदींना जगाचे नेतृत्व करता येण्यासाठी बांबू हे प्रभावी माध्यम असल्याने त्या दिशेने प्रयत्न करावेत, अशी विनंती श्री. पटेल यांनी या वेळी केली.

News Item ID: 
820-news_story-1640355575-awsecm-523
Mobile Device Headline: 
सहकारात बांबूचा अंतर्भाव करावा ः पाशा पटेल
Appearance Status Tags: 
Mukhya News
Co-operation should include bamboo: Pasha PatelCo-operation should include bamboo: Pasha Patel
Mobile Body: 

लातूर ः सहकारी साखर कारखाने, सूत गिरण्या याप्रमाणेच बांबू हा आर्थिक समृद्धी प्राप्त करून देणारा असल्याने, बांबूचा अंतर्भाव सहकारात करावा, अशी मागणी महाराष्ट्र कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष व देशभर बांबू लागवडीची चळवळ उभारणारे पाशा पटेल यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडे मंगळवारी (ता. २२) केली आहे. त्यांनी ही बाब गांभीर्याने घेत सकारात्मक प्रतिसाद दिला.

श्री. पटेल यांनी नवी दिल्ली येथे अमित शहा यांची भेट घेतली. या वेळी संजय करपे, पंजाबचे शेतकरी महेश शहादा यांची उपस्थिती होती. या प्रसंगी श्री. पटेल यांनी सहकारात बांबूचा अंतर्भाव केला तर सहकार नसलेल्या आसाम, त्रिपुरा, मेघालय, बंगाल, बिहार, ओडिशा आदी ७ राज्यांत सहकार प्रस्थापित होईल, असे सांगितले. 

सहकार क्षेत्रात बांबूचा समावेश करून सहकार निर्मिती करणे शक्य होणार आहे. त्या माध्यमातून देशाची आर्थिक समृद्धीही करता येईल. बांबू उत्पादक शेतकऱ्यांना दुपटीपेक्षा जास्त पैसे बांबूमुळे मिळू शकतात. आसाममधील नुमालिगड येथे ऑगस्ट २०२२ पासून बांबूपासून इथेनॉलनिर्मितीचा जगातील पहिला रिफायनरी प्रकल्प सुरू होत आहे, ही बाब बांबू लागवड करणाऱ्यांना मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देणारी आणि दुपटीपेक्षा अधिक सुबत्ता मिळवून देणारी आहे. बांबूच्या समावेशामुळे सहकाराला नवीन रुपडे मिळेल, असा विश्‍वास श्री. पटेल यांनी या वेळी झालेल्या चर्चे दरम्यान व्यक्त केला.

पावसाच्या अनिश्‍चिततेमुळे पारंपरिक शेती परवडेनाशी झाली आहे. मात्र अनिश्‍चित पावसात निश्‍चित उत्पन्न देणारा बांबू आहे कमी खर्चात, कमी मनुष्यबळात येणारे हे पीक असून बांबूपासून कपडे, खेळणी, लोणचे, फर्निचर, फ्लोरिंग, कागद आदी एक हजार ८०० वस्तू तयार करता येतात. त्यामुळे बांबूला न्याय मिळावा, यासाठी बांबूचा सहकारात समावेश करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी विनंती श्री. पटेल यांनी केली असता, श्री. शहा यांनी ही बाब गांभीर्याने घेत त्यावर विचार करण्याचा शब्द दिला.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल
अनिश्‍चित पावसात निश्‍चित येणारे बांबू हे पीक बहुगुणी आहे. त्यापासून अनेक वस्तू तयार करता येतात. या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून सहकारात बांबूचा अंतर्भाव केल्यास खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मार्ग अधिक सुकर होईल, असा विश्‍वास व्यक्त करून पर्यावरणात मोदींना जगाचे नेतृत्व करता येण्यासाठी बांबू हे प्रभावी माध्यम असल्याने त्या दिशेने प्रयत्न करावेत, अशी विनंती श्री. पटेल यांनी या वेळी केली.

English Headline: 
Agriculture news in Marathi Co-operation should include bamboo: Pasha Patel
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
लातूर latur तूर साखर बांबू bamboo महाराष्ट्र maharashtra बांबू लागवड bamboo cultivation पाशा पटेल महेश शहा आसाम मेघालय बिहार सहकार क्षेत्र उत्पन्न पुढाकार initiatives नरेंद्र मोदी narendra modi पर्यावरण environment
Search Functional Tags: 
लातूर, Latur, तूर, साखर, बांबू, Bamboo, महाराष्ट्र, Maharashtra, बांबू लागवड, Bamboo Cultivation, पाशा पटेल, महेश शहा, आसाम, मेघालय, बिहार, सहकार क्षेत्र, उत्पन्न, पुढाकार, Initiatives, नरेंद्र मोदी, Narendra Modi, पर्यावरण, Environment
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Co-operation should include bamboo: Pasha Patel
Meta Description: 
Co-operation should include bamboo: Pasha Patel
कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष व देशभर बांबू लागवडीची चळवळ उभारणारे पाशा पटेल यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडे मंगळवारी (ता. २२) केली आहे. त्यांनी ही बाब गांभीर्याने घेत सकारात्मक प्रतिसाद दिला.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment