सांगलीतील बेदाणा सौद्यावर ‘शून्य पेमेंट’चे सावट 

सांगली : दिवाळीच्या सुटीनंतर बेदाणा सौदे सुरू होण्यासाठी अवघे चारच दिवस बाकी आहेत. मात्र या सौद्यांवर ‘शून्य पेमेंट’चे सावट आहे. तासगाव बाजार समितीने सर्व अडते, व्यापाऱ्यांना दिवाळीपूर्वी विक्री झालेल्या बेदाण्याचे शेतकरी पेमेंट ‘झिरो’ करण्यासाठी इशारा दिला आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीने अद्याप पाठपुरावा केला नाही. अद्यापही ऑगस्ट व सप्टेंबरमधील कोट्यवधी रुपयांचे शेतकऱ्यांचे बेदाणा पेमेंट येणे बाकी आहे. त्यामुळे सांगलीतील सौदे १६ नोव्हेंबरला सुरू होण्याची शक्यता कमी आहे. 

सांगली-तासगाव बेदाणा व्यापारी संघटनेच्या वतीने बेदाणा व्यवहारात पारदर्शकता यावी. पेमेंटची देवाण-घेवाण योग्य वेळेत व्हावी यासाठी संघटनेच्या वतीने जवळपास १५ वर्षांपासून ‘शून्य पेमेंट’ संकल्पना दिवाळीमध्ये राबवली जाते. खरेदीदार हा वर्षभर कोट्यवधी रुपयांचा माल खरेदी करत असतो. परंतु केवळ माल खरेदी केला म्हणून व्यवहार पूर्ण होत नाही. त्याचा व्यवहार कसा आहे. त्याची आर्थिक परिस्थिती ठीक आहे की नाही, तो फिरवाफिरवीचा उद्योग करत नाही ना, याची खात्री करणे आवश्‍यक असते. कारण बऱ्याचदा खरेदीदारांकडून पेमेंट उशिराने यायला सुरुवात झाली की धाकधूक वाढते. बाजारपेठेत भीतीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे असा धोका निर्माण होऊ नये म्हणून फसव्या खरेदीदारांना अटकाव करण्यासाठी दिवाळीला येणी-देणी पूर्ण करण्याचा नियम संघटनेने अमलात आणला आहे. 

यंदा होती १६ नोव्हेंबरपर्यंत मुदत 

यंदाच्या वर्षात दिवाळीपूर्वी २५ ऑक्टोबरला सौदे बंद करण्यात आले. शून्य पेमेंटसाठी १६ नोव्हेंबरची मुदत दिली आहे. तोपर्यंत सांगली, तासगाव, पंढरपूर मार्केटमधील सौदे बंद राहणार असल्याचे संघटनेने जाहीर केले आहे. ही मुदत संपण्यास अवघे चारच दिवस बाकी आहेत. तासगाव बाजार समितीने तेथील अडते, व्यापारी यांना शेतकरी पेमेंट झिरो करणे बंधनकारक असल्याबाबत परिपत्रक काढले आहे. शेतकऱ्यांचे पेमेंट झिरो केली की नाही, याची तपासणी केली जाईल. त्यासाठी सर्व नोंदी अद्ययावत ठेवाव्यात. तसेच व्यापाऱ्यांकडून अडत दुकानांचे खरेदीचे पेमेंटही झिरो करणे आवश्‍यक आहे. याची खोटी माहिती दिल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. 

सांगलीत सौद्यांविषयी संभ्रम 
तासगाव बाजार समितीने झिरो पेमेंटबाबत दक्षता घेतली असून, सांगलीत मात्र हालचाली दिसत नाहीत. चार दिवसांवर सौदे येऊन ठेपले तरी अद्याप ऑगस्ट व सप्टेंबरमधील कोट्यवधी रुपयांचे येणे बाकी आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून येणाऱ्या चिठ्ठ्यांकडे लक्ष लागले आहे. १७ रोजीचे सौदे सुरू होण्यावर अद्यापही सावट आहे. त्यामुळे बाजार समिती काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले आहे.  

News Item ID: 
820-news_story-1636813493-awsecm-539
Mobile Device Headline: 
सांगलीतील बेदाणा सौद्यावर ‘शून्य पेमेंट’चे सावट 
Appearance Status Tags: 
Section News
'Zero Payment' on Sangli Currant Deal'Zero Payment' on Sangli Currant Deal
Mobile Body: 

सांगली : दिवाळीच्या सुटीनंतर बेदाणा सौदे सुरू होण्यासाठी अवघे चारच दिवस बाकी आहेत. मात्र या सौद्यांवर ‘शून्य पेमेंट’चे सावट आहे. तासगाव बाजार समितीने सर्व अडते, व्यापाऱ्यांना दिवाळीपूर्वी विक्री झालेल्या बेदाण्याचे शेतकरी पेमेंट ‘झिरो’ करण्यासाठी इशारा दिला आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीने अद्याप पाठपुरावा केला नाही. अद्यापही ऑगस्ट व सप्टेंबरमधील कोट्यवधी रुपयांचे शेतकऱ्यांचे बेदाणा पेमेंट येणे बाकी आहे. त्यामुळे सांगलीतील सौदे १६ नोव्हेंबरला सुरू होण्याची शक्यता कमी आहे. 

सांगली-तासगाव बेदाणा व्यापारी संघटनेच्या वतीने बेदाणा व्यवहारात पारदर्शकता यावी. पेमेंटची देवाण-घेवाण योग्य वेळेत व्हावी यासाठी संघटनेच्या वतीने जवळपास १५ वर्षांपासून ‘शून्य पेमेंट’ संकल्पना दिवाळीमध्ये राबवली जाते. खरेदीदार हा वर्षभर कोट्यवधी रुपयांचा माल खरेदी करत असतो. परंतु केवळ माल खरेदी केला म्हणून व्यवहार पूर्ण होत नाही. त्याचा व्यवहार कसा आहे. त्याची आर्थिक परिस्थिती ठीक आहे की नाही, तो फिरवाफिरवीचा उद्योग करत नाही ना, याची खात्री करणे आवश्‍यक असते. कारण बऱ्याचदा खरेदीदारांकडून पेमेंट उशिराने यायला सुरुवात झाली की धाकधूक वाढते. बाजारपेठेत भीतीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे असा धोका निर्माण होऊ नये म्हणून फसव्या खरेदीदारांना अटकाव करण्यासाठी दिवाळीला येणी-देणी पूर्ण करण्याचा नियम संघटनेने अमलात आणला आहे. 

यंदा होती १६ नोव्हेंबरपर्यंत मुदत 

यंदाच्या वर्षात दिवाळीपूर्वी २५ ऑक्टोबरला सौदे बंद करण्यात आले. शून्य पेमेंटसाठी १६ नोव्हेंबरची मुदत दिली आहे. तोपर्यंत सांगली, तासगाव, पंढरपूर मार्केटमधील सौदे बंद राहणार असल्याचे संघटनेने जाहीर केले आहे. ही मुदत संपण्यास अवघे चारच दिवस बाकी आहेत. तासगाव बाजार समितीने तेथील अडते, व्यापारी यांना शेतकरी पेमेंट झिरो करणे बंधनकारक असल्याबाबत परिपत्रक काढले आहे. शेतकऱ्यांचे पेमेंट झिरो केली की नाही, याची तपासणी केली जाईल. त्यासाठी सर्व नोंदी अद्ययावत ठेवाव्यात. तसेच व्यापाऱ्यांकडून अडत दुकानांचे खरेदीचे पेमेंटही झिरो करणे आवश्‍यक आहे. याची खोटी माहिती दिल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. 

सांगलीत सौद्यांविषयी संभ्रम 
तासगाव बाजार समितीने झिरो पेमेंटबाबत दक्षता घेतली असून, सांगलीत मात्र हालचाली दिसत नाहीत. चार दिवसांवर सौदे येऊन ठेपले तरी अद्याप ऑगस्ट व सप्टेंबरमधील कोट्यवधी रुपयांचे येणे बाकी आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून येणाऱ्या चिठ्ठ्यांकडे लक्ष लागले आहे. १७ रोजीचे सौदे सुरू होण्यावर अद्यापही सावट आहे. त्यामुळे बाजार समिती काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले आहे.  

English Headline: 
Agriculture News in Marathi ‘Zero Payment’ on Sangli Currant Deal
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
दिवाळी तासगाव बाजार समिती agriculture market committee सांगली sangli उत्पन्न व्यापार वर्षा varsha पंढरपूर
Search Functional Tags: 
दिवाळी, तासगाव, बाजार समिती, agriculture Market Committee, सांगली, Sangli, उत्पन्न, व्यापार, वर्षा, Varsha, पंढरपूर
Twitter Publish: 
Meta Keyword: 
‘Zero Payment’ on Sangli Currant Deal
Meta Description: 
‘Zero Payment’ on Sangli Currant Deal

दिवाळीच्या सुटीनंतर बेदाणा सौदे सुरू होण्यासाठी अवघे चारच दिवस बाकी आहेत. मात्र या सौद्यांवर ‘शून्य पेमेंट’चे सावट आहे. तासगाव बाजार समितीने सर्व अडते, व्यापाऱ्यांना दिवाळीपूर्वी विक्री झालेल्या बेदाण्याचे शेतकरी पेमेंट ‘झिरो’ करण्यासाठी इशारा दिला आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X