सांगली :जिल्हा परिषदेतील बदल लांबणीवर 

सांगली : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींचे राजीनामे लांबणीवर पडले आहेत. येत्या शुक्रवारी सर्वसाधारण सभा आहे. या सभेनंतर ते दिले जातील, असे सांगण्यात येत असले तरी संभ्रमाचे वातावरण आहे. दरम्यान बदलासाठी आग्रही गटाने खासदार संजय पाटील यांची भेट घेत नाराजी व्यक्त केली. त्यांनी दोन दिवस ‘वेट अँड वॉच’ अशा सूचना दिल्या आहेत. 

दरम्यान, बदल झाला नाही तर टोकाचा निर्णय घेण्याचे संकेत नाराज गटातील काही सदस्यांनी दिले आहेत. मिरज तालुक्यातील काही सदस्यांनी जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देण्यासाठीचे नमुनापत्र सोबत घेतले आहे. त्यामुळे राजीनामा नाट्यावरून जिल्हा परिषदेतील सत्ताधारी भाजपमध्ये दिवाळीआधी फटाके फुटण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. खासदारांच्या या भूमिकेबाबत भाजपमधील एक गटही नाराज आहे. 

जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींना राजीनामा द्यावा, असे पत्र काढले आहे. ते मंगळवारी (ता.२६) दुपारी त्यांना मिळाले. त्यावर कुणीही थेट प्रतिक्रिया दिली नाही. काही सदस्यांनी संबंधित पदाधिकाऱ्यांनी भेटून त्यांची मते जाणून घेतली. काहींनी सर्वसाधारण सभेपर्यंत थांबा, असे सांगितले तर काहींनी आमच्या काही कामांच्या निविदा अडकल्या आहेत, असे कारण दिले. त्यामुळे बदल होणार का आणि सर्वसाधारण सभेनंतर तरी राजीनामा नाट्य संपणार का, अशी शंका निर्माण झाली आहे. 
खासदार संजय पाटील म्हणाले, ‘‘जिल्हा परिषदेत बदल करण्याचा आदेश विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार दिला आहे. त्यामुळे कुणी त्याच्या विरोधात जाण्याची शक्यता नाही. सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे, यासाठी आम्ही आग्रही आहोत.’’ 

कोअर कमिटीची 
पुन्हा बैठक होणार 

जिल्हा परिषदेत घडत असलेल्या राजीनामा नाट्यावरून कोअर कमिटी नेत्यांमध्ये गोंधळ आहे. बैठकीत एक आणि बैठक संपल्यानंतर एक अशी भूमिका काही लोक घेत आहेत का, अशी शंका उपस्थित केली जात आहे. त्यामुळे कोअर कमिटीची पुन्हा बैठक घेऊन आमने-सामने सोक्षमोक्ष लावण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

News Item ID: 
820-news_story-1635337995-awsecm-208
Mobile Device Headline: 
सांगली :जिल्हा परिषदेतील बदल लांबणीवर 
Appearance Status Tags: 
Section News
जिल्हा परिषदेतील बदल लांबणीवर  Zilla Parishad changes on extensionजिल्हा परिषदेतील बदल लांबणीवर  Zilla Parishad changes on extension
Mobile Body: 

सांगली : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींचे राजीनामे लांबणीवर पडले आहेत. येत्या शुक्रवारी सर्वसाधारण सभा आहे. या सभेनंतर ते दिले जातील, असे सांगण्यात येत असले तरी संभ्रमाचे वातावरण आहे. दरम्यान बदलासाठी आग्रही गटाने खासदार संजय पाटील यांची भेट घेत नाराजी व्यक्त केली. त्यांनी दोन दिवस ‘वेट अँड वॉच’ अशा सूचना दिल्या आहेत. 

दरम्यान, बदल झाला नाही तर टोकाचा निर्णय घेण्याचे संकेत नाराज गटातील काही सदस्यांनी दिले आहेत. मिरज तालुक्यातील काही सदस्यांनी जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देण्यासाठीचे नमुनापत्र सोबत घेतले आहे. त्यामुळे राजीनामा नाट्यावरून जिल्हा परिषदेतील सत्ताधारी भाजपमध्ये दिवाळीआधी फटाके फुटण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. खासदारांच्या या भूमिकेबाबत भाजपमधील एक गटही नाराज आहे. 

जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींना राजीनामा द्यावा, असे पत्र काढले आहे. ते मंगळवारी (ता.२६) दुपारी त्यांना मिळाले. त्यावर कुणीही थेट प्रतिक्रिया दिली नाही. काही सदस्यांनी संबंधित पदाधिकाऱ्यांनी भेटून त्यांची मते जाणून घेतली. काहींनी सर्वसाधारण सभेपर्यंत थांबा, असे सांगितले तर काहींनी आमच्या काही कामांच्या निविदा अडकल्या आहेत, असे कारण दिले. त्यामुळे बदल होणार का आणि सर्वसाधारण सभेनंतर तरी राजीनामा नाट्य संपणार का, अशी शंका निर्माण झाली आहे. 
खासदार संजय पाटील म्हणाले, ‘‘जिल्हा परिषदेत बदल करण्याचा आदेश विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार दिला आहे. त्यामुळे कुणी त्याच्या विरोधात जाण्याची शक्यता नाही. सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे, यासाठी आम्ही आग्रही आहोत.’’ 

कोअर कमिटीची 
पुन्हा बैठक होणार 

जिल्हा परिषदेत घडत असलेल्या राजीनामा नाट्यावरून कोअर कमिटी नेत्यांमध्ये गोंधळ आहे. बैठकीत एक आणि बैठक संपल्यानंतर एक अशी भूमिका काही लोक घेत आहेत का, अशी शंका उपस्थित केली जात आहे. त्यामुळे कोअर कमिटीची पुन्हा बैठक घेऊन आमने-सामने सोक्षमोक्ष लावण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

English Headline: 
Agriculture News in Marathi Zilla Parishad changes on extension
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
जिल्हा परिषद खासदार संजय पाटील sanjay patil दिवाळी चंद्रकांत पाटील chandrakant patil
Search Functional Tags: 
जिल्हा परिषद, खासदार, संजय पाटील, Sanjay Patil, दिवाळी, चंद्रकांत पाटील, Chandrakant Patil
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Zilla Parishad changes on extension
Meta Description: 
Zilla Parishad changes on extension
​सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींचे राजीनामे लांबणीवर पडले आहेत. येत्या शुक्रवारी सर्वसाधारण सभा आहे. या सभेनंतर ते दिले जातील, असे सांगण्यात येत असले तरी संभ्रमाचे वातावरण आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X