Take a fresh look at your lifestyle.

सांगली जिल्हा बँक निवडणूक : अठरा जागांसाठी ४९ उमेदवार रिंगणात

0


सांगली : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत २१ पैकी तीन जागा बिनविरोध झाल्यानंतर १८ जागांवर निवडणूक लागली आहे. महाआघाडीचे सहकार पॅनेल विरुद्ध भाजपचे शेतकरी विकास पॅनेल यांच्यात थेट लढत होत आहे. बँकेच्या १८ जागांसाठी सध्या ४९ उमेदवार रिंगणात आहेत. सहकार पॅनेलचे १८ आणि शेतकरी पॅनेलचे १६ उमेदवार यांच्यात थेट लढत होईल. तर इतर मात्र लढतीकडे आणि अंतर्गत कुरघोड्यांकडे आता लक्ष लागले आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत २१ जागांसाठी ३१६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. दिवाळीच्या सुट्टीनंतर काल आणि आज माघारीचे दोन दिवस बाकी होते. काल २७ जणांनी माघार घेतली. मंगळवारी (ता.९) शेवटच्या दिवशी माघारीसाठी उमेदवारांची गर्दी झाली होती. त्यामुळे जिल्हा बँकेचा परिसर गजबजून गेला होता. दुपारी तीनपर्यंत मुदत होती. मंगळवारी (ता.९) शेवटच्या दिवशी २४० जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. एकूण २६७ जणांनी अर्ज मागे घेतले. तीन जागा बिनविरोध झाल्यामुळे उर्वरित १८ जागांसाठी ४९ उमेदवार रिंगणात आहेत. महाआघाडीच्या सहकार विकास पॅनेलचे तीन उमेदवार बिनविरोध आल्यामुळे त्यांचे १८ उमेदवार रिंगणात आहेत. भाजपच्या शेतकरी विकास पॅनेलच्या १६ उमेदवारांची प्राथमिक यादी जाहीर केली आहे. अन्य दोन उमेदवारांची नावे नंतर जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.

जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीत महाआघाडीचे सहकार पॅनेल विरुद्ध भाजपचे शेतकरी विकास पॅनेल असा सामना रंगणार आहे. त्यामुळे सर्वाचे बॅंकेच्या निवडणूकीकडे लक्ष लागून राहिले आहे. गेल्या तीन ते चार दिवसापासून निवडणूक बिनविरोध होण्यासाठी पालकमंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले. भाजपने दोन जागा घेऊन तडजोड कण्यास नकार दिला. त्यामुळे निवडणूक लागली.

महाआघाडीचे जागावाटप
महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला ७, शिवसेनेला ३ आणि राष्ट्रवादीकडे ११ जागा ठेवण्याचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला. त्यानुसार उमेदवार निश्‍चित करण्यात आले. 

News Item ID: 
820-news_story-1636605825-awsecm-616
Mobile Device Headline: 
सांगली जिल्हा बँक निवडणूक : अठरा जागांसाठी ४९ उमेदवार रिंगणात
Appearance Status Tags: 
Tajya News
सांगली जिल्हा बँक निवडणूक : अठरा जागांसाठी ४९ उमेदवार रिंगणातसांगली जिल्हा बँक निवडणूक : अठरा जागांसाठी ४९ उमेदवार रिंगणात
English Headline: 
agriculture news in marathi Sangli District Bank Election 49 candidates in the fray for 18 seatsSource link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

X